Turmeric

हळद

अपेक्षा

अपेक्षित काढणी

120-150 क्विंट्टल प्रति एकर 

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर 250-270 दिवस

अपेक्षित खर्च (रुपये)

77,000

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

2,75,000

अनुकूल हवामान

हवामान
 • पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थांमध्ये जास्त  पाऊस आणि आर्द्र हवामान आवश्यक आहे.
तापमान
 • 25-35°C
पिकाची पाण्याची गरज
 • हळदीच्या पिकाला 1500 मिमी पावसाएवढ्या पाण्याची गरज असते.

अनुकूल मृदा

प्रकार
 • वाळूयुक्त ते पोयटा माती व पाणी धरून ठेवणारी माती  निवडावी.

 •  पाणथळ टाळण्यासाठी चांगली उतार असलेली जमीन निवडली पाहिजे.

 • पाणथळ असलेल्या मातीत हळदीचे पीक घेतले जात नाही.

सामू
 • आवश्यक सामू – 4.5- 7.5 (आम्लयुक्त – सर्वसाधारण)
 • सामू 4.5 पेक्षा कमी असल्यास तर मातीत चुनखडी टाकावी. 
 • सामू 7.5 पेक्षा जास्त असल्यास तर मातीत जिप्सम टाकावे. 
सेलम
कालावधी
270 दिवस
खास वैशिष्ट्य
ह्या जातीचे बियाणे सर्वसाधारण पणे सर्वत्र वापरले जाते. ह्याचे बाह्य आवरण आणि आकार आकर्षक आहे. ह्यात कुरकुमीन चे प्रमाण कमी आहे (2-3%).
हंगाम
लागवड जुन महिन्यात केली जाते.
उत्पादन
12 क्विंटल प्रति एकर

लागवडीसाठी साहित्य

प्रतिभा
कालावधी
270 दिवस
खास वैशिष्ट्य
हि एक अधिक उत्पादन देणारी जात आहे. ह्या जातीच्या पिकाची उंची ५ फुट असून ह्यात कुरकुमीन चे प्रमाण जास्त असते (6%).
हंगाम
लागवड जुन महिन्यात केली जाते.
उत्पादन
15-20 क्विंटल प्रति एकर
प्रगती
कालावधी
180 दिवस
खास वैशिष्ट्य
ह्या जातीचे वाण बुटके आहे. पिकाची उंची 4 फुटांपेक्षा जास्त नसते. हि जात सहा महिन्याची असून ह्यात कुरकुमीन चे प्रमाण जास्त असते (5%). मुळांच्या गाठीवर येणाऱ्या सुत्रकृमींना प्रतिरोध करतात.
हंगाम
लागवड जुन महिन्यात केली जाते.
उत्पादन
12-15 क्विंटल प्रति एकर
बियाण्यांचे प्रमाण
वाण
800-900 किलो प्रति एकर

बियाणे प्रक्रिया

 • कॉपर ऑक्झिक्लोराईड (2 ग्रॅम) + डायमेथोएट (2 मिली)  प्रत्येकी 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचे द्रावण बीजप्रक्रियेसाठी  वापरावे.
 • त्याचप्रमाणे 800 किलो बियाणासाठी 200 लिटर पाण्याचे द्रावण वापरावे.
 • मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यावे.
 • बियाणे 15-20 लिटर द्रावणात बुडवावे.

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 • नांगरणीची पध्दत – मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 ते 2 वेळा नांगरून घ्यावी.
 • खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन 10 दिवस खुली ठेवावी.   – 
  1. शेणखत – 4 टन
  2. कम्पोस्टिंग बॅक्टरीया – 3 किलो 
 • वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर फिरवावे व माती भुसभुशीत करून घ्यावी.
वाफे तयार करणे
 • गादी वाफा तयार करण्यासाठी 1 मीटर रूंदीचा व 30 सेमी उंचीचा गादी वाफा तयार करावा. व दोन गादी वाफ्यांमध्ये 50 सेंमी चे अंतर ठेवावे.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
1.6 फूट
दोन रोपातील अंतर
0.9 फूट
रोपांची संख्या
30,555

पेरणी

 • पेरणीची वेळ:15 मे – जूनचा पहिला आठवडा 
 • दोन ओळींमध्ये रोपांची लागवड करावी म्हणजेच ३० सेमी च्या अंतराने छोटे खड्डे सपाट गादी वाफ्यावर तयार करुन त्यात बेणे टाकावे व मातीने झाकावे.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • खतांची मात्रा – 80:40:40 एन:पी:के किलो/एकर
 • लागवड करतेवेळी-

                सिंगल सुपर फॉस्फेट- 246 किलो

                म्युरेट ऑफ पोटॅश- 66 किलो 

 • लागवडीनंतर 45 दिवसांनी-

                युरिया- 86 किलो

 • लागवडीनंतर 75 दिवसांनी-

                युरिया- 86 किलो

 •  

सिंचन

 • 8 ते 10  दिवसांच्या अंतराने पाटाने पाणी द्यावे (पावसावर अवलंबून)
 • ठिबक सिंचन- एक दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. (पावसावर अवलंबून)

आंतरमशागत प्रक्रिया

 • नांग्या भरणे – जिथे  बीजांकुरण झालेले नसेल त्या ठिकाणी लागवडीनंतर 20 दिवसांनी परत बेणे  टाकावे. 
 • मल्चिंग – लागवडीनंतर लगेच 4.5 टन प्रति एकर याप्रमाणे शेत हिरव्या पाल्या पाचोळ्याने झाकून टाकावे.

तण व्यवस्थापन

3 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऍट्राझीन किंवा पेंडीमिथॅलीन
तणनाशकाचे प्रमाण
200 ग्रॅम प्रति एकर किंवा 600 मिली प्रति एकर
45 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
पेंडीमिथॅलीन
तणनाशकाचे प्रमाण
600 मिली प्रति एकर

किड आणि रोग व्यवस्थापन

rhizome rot disease in turmeric farmingrhizome rot disease in turmeric farming
कंदकुज (मुळकूज)
लक्षणे
कंद कुजतात.
पिक निविष्टा प्रमाण
मेटॅलिक्सिल
250 ग्राम प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा.
white grub pest in turmeric plants
हुमणी
लक्षणे
हुमणी मुळे झाडे कमजोर होतात व सहज मुळांपासून ओढली जाऊ शकतात.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बोफ्युरान
5 किलो प्रति एकर
वापर
मिक्स करून मातीवर पसरवून टाका.
Shoot borer
खोड पोखरणारी अळी
लक्षणे
झाडाच्या खोडांवर शेध होतात ज्यामधून द्रव्य शोषण होते.
पिक निविष्टा प्रमाण
नीम तेल
600 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
Rhizome scale
खवले कीड
लक्षणे
गड्ड्याना जास्त प्रादुर्भाव होतो तेव्हा ते वाळतात व अंकुचन पावतात.
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
250 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
leaf blotch disease in turmeric farming
लीफ ब्लॉच
लक्षणे
पानांच्या दोन्ही बाजूंवर अनियमित आकाराचे स्पॉट दिसतात आणि पाने पिवळी पडतात.
पिक निविष्टा प्रमाण
ऍझोक्सिस्ट्रॉबीन + डायफेनकोनाझोल
300 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
leaf roller pest in turmeric
पाने गुंडाळणारी अळी
लक्षणे
अळी पाने कुरतडते व त्यामुळे पाने गुंडाळली जातात.
पिक निविष्टा प्रमाण
लेम्बडा- सायहॅलोथ्रीन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
Leaf eating caterpillar on turmeric plant
पाने खाणारी अळी
लक्षणे
अनुवांशिक पद्धतीने पानांवर लहान छिद्र. नंतर ओळीमध्ये पाने कापतात.
पिक निविष्टा प्रमाण
इंडोक्साकार्ब +नोवलूरॉन
250 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
Leaf spot disease and its prevention
पानांवरील ठिपके
लक्षणे
पानांवर तपकिरी रंगाचे स्पॉट दिसतात आणि त्यांचा मध्य भाग राखाडी रंगाचा असतो. अनुवांशिक पद्धतीने पानांवर लहान छिद्र व नंतर ओळीमध्ये पाने कापतात.
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.

कापणी

कापणीचा कालावधी
काढणीचा कालावधी
जानेवारी- मार्च
काढणीची वेळ
लागवडीनंतर 250-270 दिवसांनी (जातीवर अवलंबून)

उत्पादन

उत्पादन
ओल्या हळदीचे
120 - 150 क्विंटल प्रति एकर
वाळलेल्या हळदीचे
25-30 क्विंटल प्रति एकर

काढणी पश्चात तंत्रज्ञान

 • हळद शिजवणे – हळद शिजवण्याची प्रक्रिया काढणीच्या 3-4 दिवसांनी करावी. कांड्या व गड्डे वेगवेगळे  शिजवावे. कांड्या 45 ते 60 मिनिटं शिजवावे व गड्डे 90 मिनिट शिजवावे.  
 • वाळवणे – शिजवलेली हळद वाळवण्यासाठी उन्हात 10-15 दिवस जमिनीवर 5-7 सेमी जाड थर लावून पसरवावी.
 • पॉलिश करणे –  हळदीचे बाहेरील आवरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याला यंत्राच्या साहाय्याने पॉलिश करावे. 

2 thoughts on “Turmeric

 1. Pingback: Turmeric - BharatAgri

 2. Pingback: Turmeric farming guide for maximum yield of turmeric - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *