Sugarcane

ऊस

अपेक्षा

अपेक्षित काढणी

400-600  क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर 330-360 दिवसांनी

अपेक्षित खर्च (रुपये)

60,000

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

1,25,000

अनुकूल हवामान

हवामान
 • उष्ण व दमट हवामान.
 • जास्त उबदार दिवस उसामध्ये जास्त फुटवे, रस आणि सुक्रोजचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात.
तापमान

न-

 • उगवण अवस्था- 30-34°C. 
 • रोपवाढीची अवस्था- 20-30°C.
 • पक्वता- 12-15°C.
 • जास्त तापमानामध्ये (50°C) पिकाची वाढ खुंटते व कमी तापमानात (20°C) पिकाची वाढ संथ होते. 
 • काणी हा रोग उच्च तापमान म्हणजेच 25 -30°C तापमानात उसामध्ये पसरतो त्याचप्रमाणे लाल सड रोग हा 37-40°C तापमानात उसामध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो.
पिकाची पाण्याची गरज
 • पाण्याची गरज –  उसाला 1800-2200 मिमी पावसाएवढ्या पाण्याची गरज असते.
 • पिकाला दिल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी 20% पाणी वाया जाते. त्यामुळे पिकाला 1400 ते 2000 मिमी पाणी उपसा सिंचन पद्धतीने देणे पुरेसे आहे. 
 • ऊस पक्वतेच्या कालावधीत जास्त पाऊसमान नसावा. कारण त्यामुळे रसाची गुणवत्ता कमी होते, पिकाची अनावश्यक वाढ होते, पिकाला उशिरा फुटवे फुटतात व उतींमधील आद्रता वाढते.

अनुकूल मृदा

प्रकार
 • ऊसासाठी मध्यम ते भारी तसेच वाळुयुक्त पोयटा, गाळवट चिकन माती, गाळवट माती, काळी कसदार माती, लाल किंवा तांबडी मातीची निवड करावी. 
 • मातीमध्ये जास्त सेंद्रिय घटक असावेत. 
 • पाणथळ मातीमध्ये उसाचे पीक घेऊ नये.  
 • उत्तम निचरा होणारी भारी चिकन माती किंवा सिंचन प्रणालीसह हलक्या मातीमध्ये सुद्धा उसाचे पीक घेतले जाते.
सामू
 • आवश्यक सामू – 6.5-7.5 
 • जर सामू 6.5 पेक्षा कमी असेल तर मातीत चुनखडी टाकावी. 
 •  जर सामू 7.5 पेक्षा जास्त असेल तर मातीत जिप्सम टाकावे. 

लागवडीसाठी साहित्य

को- 86032
कालावधी
280 दिवस
खास वैशिष्ट्य
पाण्याचा ताण सहन करते, उत्तम खोडवा येतो.
हंगाम
रब्बी
उत्पादन
1050 क्विंटल प्रति एकर
को.एम.- 0265
कालावधी
540 दिवस
खास वैशिष्ट्य
पाण्याचा ताण व मातीचा खारवट पणा सहन करते, उत्तम खोडवा येतो.
हंगाम
रब्बी
उत्पादन
1500 क्विंटल प्रति एकर
को.सी.- 671
कालावधी
300 दिवस
खास वैशिष्ट्य
-
हंगाम
रब्बी
उत्पादन
1050 क्विंटल प्रति एकर
बियाण्यांचे प्रमाण
वाण
25-28 क्विंटल प्रति एकर (दोन डोळे असलेले)

बियाणे प्रक्रिया

 • कॉपर ऑक्झिक्लोराईड- 2 ग्रॅम+डायमेथोएट- 2 मि.ली प्रति लिटर पाण्यात मिसळून बेण्यांवर प्रक्रिया करावी.
 • 800 किलो बियाणांसाठी एका मोठ्या भांड्यात २०० लिटर पाणी घ्यावे.
 • वरील द्रावणात बियाणे कमीकमी 15-20 मिनिटांसाठी बुडवावे.  

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 1. नांगरणीची पध्दत- मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 ते 2 वेळा नांगरून घ्यावी.
 2. खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन 10 दिवस खुली ठेवावी- 
  1. शेणखत – 2 टन
  2. कम्पोस्टिंग बॅक्टरीया – 4 किलो 
 3. वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर चालवून माती भुसभुशीत करून घ्यावी.
वाफे तयार करणे
 1. गादी वाफा तयार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने 120 सेमी च्या अंतराने सरीवरंबा तयार करून घ्याव्यात.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
3.9 फूट
दोन रोपातील अंतर
1.9 फूट
रोपांची संख्या
5,555

पेरणी

 • उसाचे पीक तिन्ही हंगामात घेतले जाते.

  पूर्व हंगामी:  15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 

  आडसाली: 15 जुलै ते 15 ऑगस्ट 

  सुरु: 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी

 • पेरणीचा  कालावधी :
  • दोन डोळे असलेले बेणे वरंब्यावर 60 सेमी च्या अंताराने लावावे. मातीने बेणे झाकावे. परंतु डोळा उघडा ठेवावा.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • एकूण खतांची मात्रा- 120:56:56 एन:पी:के किग्रॅ/एकर 
 • लागवडीनंतर 15 दिवसांनी युरिया- 130 किग्रॅ , सिंगल सुपर फॉस्फेट- 172 किग्रॅ , म्यूरेट ऑफ़ पोटॅश- 48 किग्रॅ 
 • लागवडीनंतर 130 दिवसांनी युरिया- 130 किग्रॅ , सिंगल सुपर फॉस्फेट- 172 किग्रॅ , म्यूरेट ऑफ़ पोटॅश- 48 किग्रॅ

सिंचन

 • 6-8 दिवसांच्या अंतराने पाटाने पाणी द्यावे.

आंतरमशागत प्रक्रिया

 A.नांग्या भरणे- लागवडीनंतर 30 दिवसांनी जेथे बेण्याची उगवण झालेली नाही त्याठिकाणी अंकुरलेले बेणे लावावे.

B. भर देणे-

 • आंशिक भर देणे- लागवडीनंतर 45 दिवसांनी सरी फोडून माती थोड्या प्रमाणात खोडाच्या भोवती टाकावी.
 • पूर्ण भर देणे- लागवडीनंतर 120 दिवसांनी वरंब्यातील पूर्ण माती काढून उसाच्या एकाबाजूला टाकावी. 

तण व्यवस्थापन

लागवडीपूर्वी 20 दिवस
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ग्लायफोसेट (600 मि.ली./एकर)
लागवडीनंतर 3 दिवसांनी
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऍट्राझीन (600 ग्रॅम/एकर) किंवा मेट्रीब्युझीन (400 ग्रॅम/एकर)
लागवडीनंतर 21 दिवसांनी
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
2,4-डी (1 किलो/एकर)

किड आणि रोग व्यवस्थापन

White grub pest in sugarcane
हुमणी
लक्षणे
पिकाचा वरील भाग पूर्ण सुकतो रोगग्रस्त झालेले ऊस ओढल्यावर सहज मुळापासून निघू शकतात तसेच रोगग्रस्त ऊस शेतात खाली पडतो
पिक निविष्टा प्रमाण
फोरेट
10 किलो प्रति एकर
वापर
मिक्स करून मातीवर पसरवून टाका
Woolly aphid attack on sugarcane
लोकरी मावा
लक्षणे
पानाच्या खालील बाजूस पांढऱ्या रंगाचे कीटक दिसतात टोकापासून पानांच्या बाहेरील कडा पिवळ्या पडायला सुरुवात होते हे किडे जास्त प्रमाणात चिकट द्रव स्रवतात त्यामुळे पानांवर काळी काजळी तयार होते
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
300 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
तांबेरा
लक्षणे
पानांच्या दोनी बाजूस लहान व लांबसर पिवळ्या रंगाचे डाग दिसतात हे डाग कालांतराने मोठ्या आकाराचे आणि लाल-तपकिरी रंगाचे होतात
पिक निविष्टा प्रमाण
प्रोपीकोनॅझोल
600 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Internode borer pest in sugarcane farming
कांडी कीड (इंटरनोड बोरर)
लक्षणे
ऊसाच्या पेरांची वाढ होत नाही व त्यावर लहान छिद्रे दिसतात ज्यामधून चिकट द्रव स्रवला जातो हे द्रव पूर्ण संसर्ग झालेल्या भागावर दिसते
पिक निविष्टा प्रमाण
फिप्रोनील
7 किलो प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
Grassy root disease in sugarcane farming
ग्रासी शूट
लक्षणे
लवकर आणि जास्त प्रमाणात फुटवे येतात अश्या झाडांची देठे झाडावर खूप जास्त दिसतात ज्यामुळे झाड भरल्यासारखं गच्च वाटते. या रोगाचा प्रसार मावा या किडीमुळे होतो
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
300 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Wilt disease in sugarcane cultivation
मर
लक्षणे
पाने पिवळी पडतात आणि वाळतात तसेच ऊस आकसल्यासारखा दिसतो कुजल्यामुळे शेतात विशिष्ठ प्रकारचा घाण वास येतो
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
600 ग्रॅम प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
red rot disease in sugarcane farming
लाल सड
लक्षणे
झाडे कमकुवत होतात आणि सहज काढले जाऊ शकतात मुळे कुजतात ज्यामुळे दुर्गंध पसरतो खोडाजवळ छिद्र दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
400 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Prevention of termite attack in sugarcane farming
टरमाइट (वाळवी)
लक्षणे
संसर्ग झालेली पाने मुळांपासून सहज ओढली जाऊ शकतात.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बोफ्युरान
5 किलो प्रति एकर
वापर
मिक्स करून मातीवर पसरवून टाका

कापणी

कापणीचा कालावधी
कापणीचा कालावधी
लागवडी नंतर 330-360 दिवसांनी.
ऊस तोडणी
ऊस तोडणी जमिनीलगत करावी.

उत्पादन

उत्पादन
काढलेले एकूण उत्पादन
400-600 क्विंटल प्रति एकर

2 thoughts on “Sugarcane

 1. Pingback: Sugarcane - BharatAgri

 2. Pingback: गन्ने की खेती - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *