Soybean

Complete information on soybean farming

सोयाबीन

अपेक्षा

अपेक्षित काढणी

10 क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर 90- 110 दिवसांनी

अपेक्षित खर्च (रुपये)

25,298

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

35,430

अनुकूल हवामान

हवामान
 • सोयाबीन विविध प्रकारच्या हवामानात घेतले जाऊ  शकते.
 • तथापि, शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या कालावधीत कोरड्या हवामानाची आवश्यकता असते.
तापमान
 • बियाणाची चांगली उगवण होण्यासाठी मातीचे तापमान 15°C पेक्षा जास्त असले पाहिजे आणि पीक वाढीसाठी 26-30°C असले पाहिजे.
पिकाची पाण्याची गरज
 • सोयाबीन कमी पाण्यातही तग धरू शकते. 
 • बियाणांची उगवण, फुले येण्याच्या आणि शेंग भरण्याच्या अवस्थेत (3 -4 महिने) जमिनीत ओलावा टिकून राहणे आवश्यक आहे.
 • पाण्याची गरज – सोयाबीन पिकाला 400 मिमी पावसाएवढ्या पाण्याची गरज असते.

अनुकूल मृदा

प्रकार
 • मध्यम ते भारी जमीन, गाळवट व पाणी धरून ठेवणारी माती निवडावी.
सामू
 • आवश्यक सामू  6.0-7.5 
 • जर सामू 6.0 पेक्षा कमी असेल तर मातीत चुनखडी टाकावी. 
 • जर सामू 7.5 पेक्षा जास्त असेल तर मातीत जिप्सम टाकावे. 

लागवडीसाठी साहित्य

बियाण्यांचे प्रमाण
वाण
30 किग्रॅ प्रति एकर (सुधारित जाती व संकरित वाण दोन्हीसाठी).

बियाणे प्रक्रिया

खालील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी

 • इमिडाक्लोप्रिड – 4 मिली

सूचना  – वरील घटक प्रति १किग्रॅ  बियाणे याप्रमाणे २ लिटर पाण्यात मिसळुन तयार झालेल्या द्रावणात बियाणे 10 मिनिटासाठी बुडवावेत व नंतर 15 मिनिटासाठी सावलीत वाळवावेत. 

 • कार्बेन्डाझिम – 2 ग्रॅम 

सूचना – बीजप्रक्रिया केलेले बियाणे परत  2 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १किग्रॅ बियाणे याप्रमाणे बियाणांना चोळावे. 

 

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 1. नांगरणीची पध्दत –  मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 ते 2 वेळा नांगरून घ्यावी.
 2. खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन १० दिवस खुली ठेवावी. 
  1. शेणखत – 2 टन
  2. कंपोस्टींग बॅक्टरीया – 3किग्रॅ  
 3. वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर फिरवावे व माती भुसभुशीत करून घ्यावी.
वाफे तयार करणे
 1. गादी वाफा तयार करण्याची पध्दत – ट्रॅक्टरच्या साहाय्याने 45 सेमी च्या अंतराने सरीवरंबा तयार करून घ्याव्यात.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
1.4 फूट
दोन रोपातील अंतर
0.3 फूट
रोपांची संख्या
1,04,761

पेरणी

 • पेरणीची वेळ:  जूनचा पहिला आठवडा 
 • टोकंन पद्धतीने 4 सेमी खोल वरंब्यावर  बियाणे लावावे. प्रत्येक वरंब्यावर 2 बियाणे लावावे.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • एकूण खतांची मात्रा- 50:75:45 एन:पी:के किग्रॅ/एकर 
 • लागवड करतेवेळी –युरिया- 110 किग्रॅ , सिंगल सुपर फॉस्फेट- 460 किग्रॅ 
 • लागवडीनंतर 30 दिवसांनी म्यूरेट ऑफ़ पोटाश- 75 किग्रॅ 

सिंचन

 • १० दिवसांच्या अंतराने पाटाने पाणी द्यावे.

आंतरमशागत प्रक्रिया

विरळणी व नांग्या भरणे- लागवडी नंतर 12 ते 15 दिवसांनी 

 • विरळणी- जिथे दोन बियाणांची लागवड केली आहे त्याठिकाणचे निरोगी व योग्यरीत्या वाढ झालेले रोप ठेवावे व दुसरे रोप काढून टाकावे.
 • नांग्या भरणे – जेथे बियाणाची उगवण झालेली नाही त्याठिकाणी टोकन पध्दतीने बियाणाची पेरणी करावी व वरंब्यावर दोन बियाणे लाऊन त्याला लगेच पाणी द्यावे.
 • भर देणे–  लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी  हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्‍या ओळीच्‍या दोन्‍ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

तण व्यवस्थापन

3 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऍट्राझीन (100 ग्रॅम प्रति एकर) किंवा पेंडीमिथॅलीन (300 मिली प्रति एकर)
21 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
इमाझेथापिर (400 ग्रॅम प्रति एकर)

संजीवके

 • नॅपथॅलिन ऍसिटिक ऍसिड 40 मिग्रॅ + सॅलिसिलिक ऍसिड 100  मिग्रॅ प्रति 1 लिटर पाण्यामध्ये एकत्र करून पानांवर फवारणी घ्यावी व दुसरी फवारणी त्यानंतर 15 दिवसांनी घ्यावी.

किड आणि रोग व्यवस्थापन

Remedy of aphid attacks in soybean farming
सोयाबीन मोसॅक व्हायरस (व्हेक्टर - ऍफिडस् )
लक्षणे
प्रत्येक पानावर फिकट आणि गडद हिरव्या रंगाचे पॅचेस दिसतात पाने चुरघरल्यासारखी होतात आणि खालील बाजूस गुंडाळतात
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Soybean rust - Symptoms and prevention
सोयाबीन रस्ट
लक्षणे
सोयाबीन रस्ट- लालसर स्पॉट्स पानांच्या आतील बाजूस दिसतात व कालांतराने हे स्पॉट शेंगांवर आणि इतर भागांवर देखील दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
हेक्साकोनॅझोल
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Soybean pod borer pest in soybean farming
शेंग पोखरणारी अळी
लक्षणे
किडीने केलेली छिद्रे हरभऱ्यावर आणि देठावर देखील दिसतात शेंगांमध्ये अळ्या असतात
पिक निविष्टा प्रमाण
लेम्बडा- सायहॅलोथ्रीन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
prevention and cure of powdery mildew disease in soybean farming
पांढरी भुरी
लक्षणे
हा रोग झाल्यावर पानांवर पांढरा रंग दिसतो. हा रोग खूप लवकर पानांवर आणि देठांवर पसरतो. झाडावरच्या खालच्या आणि मधल्या बाजूच्या पानांमध्ये जास्त प्रभाव दिसतोलच्या आणि मधल्या बाजूच्या पानांमध्ये जास्त प्रभाव दिसतो
पिक निविष्टा प्रमाण
सल्फर
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Prevention of thrips in soybean farming
रसशोषक किडी
लक्षणे
पाने गुंडाळली जातात पानांवर राखाडी रंगाच्या छटा दिसतात पाने वरील बाजूस दुमडतात पानांवर किंवा देठावर लहान कीटक दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
थायोमीथाक्साम
100 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Anthracnose disease of soybean and its cure
अँथ्रॅक्नोज
लक्षणे
शेंगांवर आणि देठांवर तपकिरी स्पॉट्स दिसतात.
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
कापणीचा कालावधी
लागवडी नंतर 90-110 दिवसांनी.
काढणी
काढणी करताना सोयाबीनचे पीक जमीनलगत कापावे.

उत्पादन

उत्पादन
काढलेले एकूण उत्पादन
10 क्विंटल प्रति एकर

2 thoughts on “Soybean

 1. Pingback: Soybean - BharatAgri

 2. Pingback: सोयाबीन की खेती - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *