बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळणार?

कर्जमाफी

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी आधी 15 हजार कोटी रुपये आणि आता 7 हजार कोटी रुपये अशी आत्तापर्यंत एकूण 22 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आतापर्यंत 9 हजार 35 कोटी रुपयांची रक्कम वितरित झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत कर्ज 2 लाखांहून अधिक असेल, तर अधिकची रक्कम भरल्यास 2 लाख रुपये कर्जमाफी मिळेल. तसंच, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

(सरकारच्या कर्जमाफीबाबतच्या आणखी एक विशेष निर्णय पाहण्यासाठी आत्ताच भारतॲग्री ॲपला भेट द्या. 

https://app.bharatagri.co/notification ॲपमधील नोटिफिकेशन्समधून तुम्ही संबंधित बातमी पाहू शकता.) 

कृषीपंप शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच लाख सौर कृषीपंप बसवण्यात येतील. या योजनेसाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी 2020-21 च्या अर्थसंकल्पात 670 कोटींचा निधी प्रस्तावित आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना
ही केंद्राची अनेक त्रुटी असलेली योजना आहे. त्यामुळे नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही, यावर मात करण्यासाठी मंत्रिगटाचा एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई करता येईल का, याचाही विचार हा अभ्यासगट करणार आहे.

रेशीम उद्योग
रेशीम उद्योगाला मनरेगातून तुतीची लागवड समावेशासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार, एक कोटीच्या रेशीम धाग्याच्या मशिनसाठी अनुदान देण्यात येईल.

 

ऊस उत्पादक शेतकरी
ऊसासह इतर पिकांसाठी ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान देण्यात येत आहे. सध्या ठराविक तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत असूनआता ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. 

 

समृद्धी महामार्गावर कृषी समृद्धी केंद्र

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र बांधणार असून, त्यापैकी 4 केंद्र मूर्त स्वरुपात आकारात येतील. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सहकार्य केलं आहे. 

सिंचनाचे प्रकल्प
राज्यातील
313 सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 10 हजार कोटींचा निधी जलसंपदा विभागाला देण्यात आला आहे. तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री जलसंधारण योजनाराबवली जाणार आहे.

कोकणातील काजू प्रकल्प कोकणातील काजू प्रकल्पांसाठी 15 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *