Green Chilli

मिरची

अपेक्षा

अपेक्षित काढणी

30 क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर १८०-२०० दिवस

अपेक्षित खर्च (रुपये)

६१,८०५

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

१,४२,५००

अनुकूल हवामान

हवामान
 • पावसाळ्यात जास्‍त पाऊस व ढगाळ वातावरण असल्‍यास फूलांची व फळांची गळ जास्‍त होते. 
 •  वातावरणात जास्त दमटपणा असल्यास फळे कुजतात. 
 • प्रकाशाच्या उच्च तीव्रतेमुळे फळांना रंग येण्यास विलंब होतो.
तापमान
 • तापमान १० अंश डिग्री सेल्सिअसच्या खाली असल्यास मिरचीच्या झाडाची वाढ थांबते. 
 • पीक वाढीच्या सुरवातीच्या काळात तापमान ३० अंश डिग्री सेल्सिअस किंवा जास्त  असल्यास पिकाच्या मूळांची वाढ थांबते. 
 • जर तापमान ३७ अंश डिग्री सेल्सिअस किंवा जास्त असल्यास त्याचा परिणाम फळांच्या वाढीवर होतो. 
 • मिरचीच्‍या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते.
 •  
पिकाची पाण्याची गरज
 • मिरचीचे पीक हे शक्यतो सिंचन क्षेत्रात घेतले जाते. 
 • मिरचीच्या झाडाला फळे व फुले येण्याच्या सुमारास पाणी देणे अत्यंत महत्वाचे आहे.  
 • पाण्याची गरज –  मिरची पिकाला 800-1200 मिमी पावसा एवढ्या  पाण्याची गरज असते.

अनुकूल मृदा

प्रकार
 • मिरचीसाठी वाळुयुक्त पोयटा माती व पाणी धरून ठेवणारी माती  निवडावी.
सामू
 • आवश्यक सामू – 6.0-7.0
 • जास्त आम्लधर्मी व क्षारयुक्त माती मध्ये मिरचीचे पीक घेतले जात नाही.  .
 • जर सामू 6.0 पेक्षा कमी असल्यास तर मातीत चुनखडी टाकावी. 
 • जर सामू 7.0 पेक्षा जास्त  असल्यास तर मातीत जिप्सम टाकावे.

लागवडीसाठी साहित्य

सुपर महा ज्वाला (संकरित )
कालावधी
७०-७५ दिवस
खास वैशिष्ट्य
अधिक उत्‍पादन, जास्त दिवसांसाठी साठवणूकी साठी उपयुक्त, लांब अंतरावरील वाहतुकीसाठी उपयुक्त, व रसशोषक किडीला प्रतिकार करते.
हंगाम
खरीप रब्बी व उन्हाळी
उत्पादन
१००-१२० क्विंटल
नवल(संकरित )
कालावधी
७५ दिवस
खास वैशिष्ट्य
ग्रीन हाऊस व संरक्षित शेड नेट साठी उपयुक्त वाण उत्तम गुणवत्तेचे फळ
हंगाम
खरीप रब्बी
उत्पादन
८०-१०० क्विंटल क्विंटल

रोपवाटिका तयार करणे

रोपवाटिका तयार करणे

पद्धत- 1

 • पुर्नलागवडी साठी  1 एकर क्षेत्रा मध्ये 0.08 एकर (3 गुंठा) ची रोपवाटिका असावी. 
 • रोपवाटिका तयार करण्यासाठी 7.5 मीटर लांब, 1.2 मीटर रुंद, 10 सेमी. उंच या आकारमानाचे  सहा गादीवाफे तयार करावेत. 
 • बियाणाची मातीत सरळ रेषेत 7.5 सेमी. च्या अंतराने पेरणी करावी व ते मातीने झाकावे.
 • रोपांना रोपवाटिकेमध्ये उगवण होईपर्यंत दिवसभरात दोन वेळा पाणी द्यावे व उगवून आल्यानंतर एक वेळा द्यावे. 
 • रोपांना मजबुती देण्यासाठी   पुर्नलागवड करण्याच्या 10 दिवस आधी रोपांना पाणी देण्याचे प्रमाण कमी करावे. व रोप काढणीच्या १ दिवस आधी थोड्याप्रमाणात पाणी द्यावे.
 •  बियाणे अंकुरित झाल्यानंतर  नंतर ३ दिवसांनी मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी  १० लिटर पाण्‍यात २० ग्रॅम रिडोमिल द्रावण गादी वाफ्यावर  किंवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.
 • १ लिटर पाण्यामध्ये 19:19:19 (5 ग्रॅम) व थीअमेथिओक्साम (0.25) ग्रॅम  मिश्रण एकत्रित करून पेरणीनंतर २५ दिवसांनी फवारावे. 

पद्धत- 2

 • प्रत्येक ट्रे मध्ये १.२ किलो याप्रमाणे कोकोपीट भरावे.  
 •  ट्रेच्या प्रत्येक कप्प्यात १ याप्रमाणे बीजप्रक्रिया केलेल्या बियाणाची पेरणी करावी. 
 •  पेरणीनंतर बियाणे कोकोपीट ने झाकावे व ट्रे एकावर एक ठेवून बियाणांची उगवण होईपर्यंत  पॉलीथिन पेपर ने झाकावे. ( ५ दिवस )
 • ६ दिवसांनंतर, अंकुरित झालेल्या बियाणांसहित ट्रे गादीवाफ्यावर स्वतंत्ररित्या शेड नेट मध्ये ठेवावे. 
रोपवाटिका कालावधी
 • कालावधी – 35 दिवस
 • रोपाचे देठ मजबूत झाल्यानंतर व पाने गडद हिरवी झाल्यावर रोपांची पूर्नलागवड करावी.
बियाण्यांचे प्रमाण
सुधारित वाण
१ एकर क्षेत्र पूर्नलागवडीसाठी 400 ग्रॅम बियाणे.
संकरीत
१ एकर क्षेत्र पूर्नलागवडीसाठी 100 ग्रॅम बियाणे.

बियाणे प्रक्रिया

 • इमिडाक्लोप्रिड – 4 मिली
 • सूचना  – वरील घटक प्रति १ किलो बियाणे याप्रमाणे २ लिटर पाण्यात मिसळुन तयार झालेल्या द्रावणात बियाणे 10 मिनिटासाठी बुडवावेत व नंतर 15 मिनिटासाठी सावलीत वाळवावेत. 
 •  मॅन्कोझेब   – 2 ग्रॅम
 • सूचना – बीजप्रक्रिया केलेले बियाणे परत  2 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे बियाणांना चोळावे. 

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 • नांगरणीची पध्दत –  मातीच्या प्रकारानुसार जमीन १ ते २ वेळा नांगरून घ्यावी.
 • खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन १० दिवस खुली ठेवावी.   – 
  1. शेणखत – 2 टन
  2. कम्पोस्टिंग बॅक्टरीया – 3 किलो 
 • वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर चालवून माती भुसभुशीत करून घ्यावी.
वाफे तयार करणे
 • गादी वाफा तयार करण्यासाठी  ट्रॅक्टरच्या साहाय्याने 75 सेमी किंवा  60 सेमी च्या अंतराने सरीवरंबा तयार करून घ्याव्यात.

अंतर आणि रोपांची संख्या

संकरित वाण
दोन ओळीतील अंतर
२.४ फूट
दोन रोपातील अंतर
१.९ फूट
रोपांची संख्या
८८८८
सुधारित वाण
दोन ओळीतील अंतर
१.९ फूट
दोन रोपातील अंतर
१.९ फूट
रोपांची संख्या
१११११

मुळे बुडवणे प्रक्रिया

 • एका सपाट भांड्यात 20 लिटर पाणी घ्यावे. 
 • त्यामध्ये कार्बनडॅझीम  ( 40 ग्रॅम ) व इमिडाक्लोप्रिड( 40 मिली ) एकत्रित करावे.
 • रोपांची मुळे पुर्नलागवडी पूर्वी ह्या द्रावणात 5 मिनिट बुडवावीत.
 • जर रोपे प्रो ट्रे मध्ये असतील तर रोपांसहित प्रो ट्रे भांड्यात 5 मिनिटासाठी बुडवावा. 

पुनर्लागवड

 • पुर्नलागवड करताना 60 सेमी.च्या अंतरावर  सरी तयार करून रोपांची लागवड करावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • प्रति एकर 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश द्यावे . 
 • पुर्नलागवड करताना  (प्रति एकर)- 
 • युरिया – 29 किलो
 • सिंगल सुपर फॉस्फेट– 122 किलो
 • म्यूरेट ऑफ़ पोटॅश– 34 किलो
 • पुर्नलागवडीनंतर 30 दिवसांनी 22 किलो युरिया टाकावा.
 • पुर्नलागवडीनंतर 45 दिवसांनी 22 किलो युरिया टाकावा.

सिंचन

 • ठिबक सिंचन- एक दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • आठवड्यातून एकदा पाटाने पाणी द्यावे (पावसावर अवलंबून)
 • उन्‍हाळयात 5 ते 6 दिवसांच्‍या अंतराने पिकाला पाणी दयावे.
 • मिरचीच्या प्रत्येक तोडणी नंतर एकदा पाणी द्यावे.

आंतरमशागत प्रक्रिया

तण व्यवस्थापन

सूचना – पानांवर तणनाशक योग्यरीत्या पसरण्यासाठी त्यात स्टिकर टाकावे. 

3 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऍट्राझीन किंवा पेंडीमिथॅलीन
तणनाशकाचे प्रमाण
100 ग्रॅम प्रति एकर 400 ग्रॅम प्रति एकर
30 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ओक्सीफ्लूरोफेन
तणनाशकाचे प्रमाण
400 ग्रॅम प्रति एकर

संजीवके

 • फुलांची लागण वाढवण्यासाठी ट्रायकॉन्टेनॉल 1.25 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित करून   पुर्नलागवडी नंतर 20, 40, 60 व्या दिवशी फवारणी करावी. 
 • फुलांची गळ थांबण्यासाठी व फळ लागण वाढवण्यासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड 2 मिलीग्राम  प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित करून पुर्नलागवडी नंतर ६० आणि ९० व्या दिवशी फवारणी करावी.

किड आणि रोग व्यवस्थापन

Damping off disease in chilli plant
मर रोग
लक्षणे
 • झाडे कमकुवत होतात आणि वाळतात
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
250.0 ग्रॅम प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
रसशोषक किडी-तुडतुडे, पांढरी माशी, मावा
लक्षणे
 • पाने पिवळी पडतात व दुमडतात.
पिक निविष्टा प्रमाण
थायोमीथाक्साम
100 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
पांढरी भुरी
लक्षणे
 • पांढरी भुरी हा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग झाल्यावर पानांवर पांढरा रंग दिसतो. हा रोग खूप लवकर पानांवर आणि देठांवर पसरतो.
पिक निविष्टा प्रमाण
सल्फर
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
fusarium wilt disease in chilli farming
मर रोग
लक्षणे
 • हि लक्षणे झाडातील खालच्या बाजूच्या पानांमध्ये जास्त दिसतात. रोग जेव्हा जास्त होतो तेव्हा वरील पानांवर देखील पसरतो. बरेच वेळा फक्त एक फांदीवर हा रोग दिसतो किंवा झाडाच्या एकाच बाजूला दिसतो.
पिक निविष्टा प्रमाण
मेटॅलॅक्सिल + मॅंकोझेब
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यासोबत ठिबक सिंचनाने घालावे
Fruit borer of chilli
फळे पोखरणारी अळी
लक्षणे
 • फळे पोखरणारी अळी - अंड्यातून बाहेर आल्यावर अळी विकसित होणाऱ्या फळात भोक पाडते आणि त्यामधून मधून विकसित होणारे बीज खाते. प्रभावित फळांची नंतर बुरशी आणि रोगांच्या सूक्ष्म जंतूंमुळे कूज होते. नुकसानीचे लक्षण म्हणजे आक्रमक वास, प्रवेश छिद्रांमधून येणारे अळीचे उत्सर्जन व छिद्रांच्या आसपास जमलेला कचरा.
पिक निविष्टा प्रमाण
थायोमेथाक्साम + लेम्बडा सायहॅलोथ्रीन
100 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
फळसड
लक्षणे
 • फळ सड - हा एक बुरशीजन्य रोग आहे. फळांवर तपकिरी-काळे ठिपके दिसून येतात नंतर फळे सडून फळ गळती होते
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
कापणीचा कालावधी
70 to 150 दिवसांनी
एकूण काढण्यांची संख्या
8 to 10 वेळा होते.
काढणीतील अंतर
10 दिवस

उत्पादन

उत्पादन
प्रत्येक काढणीचे प्रमाण
५-८ क्विंटल प्रति एकर
काढलेले एकूण उत्पादन
४०-५० क्विंटल प्रति एकर

3 thoughts on “Green Chilli

 1. Pingback: Green Chilli - BharatAgri

 2. Pingback: मिर्च की खेती : आधुनिक विधि से लें ज्यादा ज्यादा से ज्यादा उपज - BharatAgri

 3. Pingback: मिर्च की खेती : आधुनिक विधि से लें ज्यादा से ज्यादा उपज - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *