Cauliflower

फ्लॉवर

अपेक्षा

अपेक्षित काढणी


८०-१०० क्विंटल  प्रति एकर

अपेक्षित कालावधी

१००-१२० दिवसांनी 

अपेक्षित खर्च (रुपये)

४५,००० 

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

८१,०००

अनुकूल हवामान

हवामान
 • गड्डे तयार होताना जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास त्याचा परिणाम फ्लॉवरच्या गुणवत्तेवर होतो. 
तापमान
 •  तापमान जास्त असल्यास फ्लॉवर पिवळे पडतात. 
 • 15-21°C तापमान गड्डे तयार होण्यासाठी व फ्लॉवरच्या वाढी साठी अनुकूल आहे.
पिकाची पाण्याची गरज
 • फ्लॉवरच्या पिकाला 350-500 मिमी पावसाएवढ्या पाण्याची गरज असते.

अनुकूल मृदा

प्रकार
 • वाळुयुक्त पोयटा व चिकन माती
सामू
 • आवश्यक सामू – 5.5 to 6.5
 • सामू जर 8 पेक्षा जास्त असेल तर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
 • जर सामू 5.5 पेक्षा कमी असल्यास तर मातीत चुनखडी टाकावी. 
 •  जर सामू 7.5 पेक्षा जास्त  असल्यास तर मातीत जिप्सम टाकावे. 

लागवडीसाठी साहित्य

बसंत-956
कालावधी
५५-६० दिवस
खास वैशिष्ट्य
लवकर पिकणारी जात, उच्च तापमानात चांगले उत्पादन
हंगाम
खरीप
उत्पादन
रिमझिम
कालावधी
५५-६५ दिवस
खास वैशिष्ट्य
उच्च आर्द्रता व तापमानात चांगले उत्पादन
हंगाम
खरीप
उत्पादन
सि. एफ. एल.-1522
कालावधी
७५ दिवस
खास वैशिष्ट्य
उत्तम गुणवत्ता व पांढरे गड्डे
हंगाम
उन्हाळी
उत्पादन
१२
टेट्रिस
कालावधी
७०दिवस
खास वैशिष्ट्य
लांबच्या वाहतुकीसाठी उपयुक्त जात
हंगाम
रब्बी
उत्पादन
१२

रोपवाटिका तयार करणे

रोपवाटिका तयार करणे
 •  पद्धत- 1
 • एक एकर क्षेत्रात पीक घेण्यासाठी 100 चौरस मीटर रोपवाटिकेचे क्षेत्र पुरेसे आहे.
 • रोपवाटिका तयार करण्यासाठी 3 मीटर लांब, 0.6 मीटर रुंद , 10-15 सेमी. उंच या आकारमानाचे  गादीवाफे तयार करावेत. 
 • दोन गादी वाफ्यांमध्ये 60 सेमीचे अंतर ठेवावे.
 • बियाणाची पेरणी १-२ सेमी खोल मातीत 10 सेमी.च्या अंतराने  तयार गादी वाफ्यावर करावी व ते मातीने झाकून झाऱ्याने पाणी द्यावे. 
 • तापमान व जमिनीतील ओलावा नियंत्रित ठेवण्यासाठी गादी वाफे ऊसाची पाने , गवत किंवा गवताची पेंड टाकून झाकावे. 
 • बियाणाची उगवण होईपर्यंत गरजेनुसार रोपाला झाऱ्याने पाणी द्यावे. 
 • रोपांना मजबुती देण्यासाठी  पुनर्लागवड करण्याच्या 10 दिवस आधी पाणी देण्याचे प्रमाण कमी करावे व रोप काढणीच्या १ दिवस आधी थोड्या प्रमाणात पाणी द्यावे.
 • बियाणे अंकुरित झाल्यानंतर ३ दिवसांनी मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी १० लिटर पाण्‍यात २० ग्रॅम रिडोमिल द्रावण गादी वाफ्यावर  किंवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.
 • पद्धत- 2

 • प्रत्येक ट्रे मध्ये १.२ किलो याप्रमाणे कोकोपीट भरावे.

 • ट्रेच्या प्रत्येक कप्प्यात १ याप्रमाणे बीजप्रक्रिया केलेल्या बियाणाची पेरणी करावी.

 • पेरणीनंतर बियाणे कोकोपीट ने झाकावे व ट्रे एकावर एक ठेवून बियाणांची उगवण होईपर्यंत  पॉलीथिन पेपरने झाकावे. (५ दिवस )

 • ६ दिवसांनंतर, अंकुरित झालेल्या बियाणांसहित ट्रे गादीवाफ्यावर स्वतंत्ररित्या शेड नेट मध्ये ठेवावे.

रोपवाटिका कालावधी
 • कालावधी – 40 दिवस
 • रोपांची लागवड करण्यासाठी रोपांवर  3-4 पाने दिसायला लागल्यानंतर आणि खोड जाड झाल्यानंतर करावी.

बियाण्यांचे प्रमाण
सुधारित वाण
१ एकर क्षेत्र पूर्नलागवडीसाठी 180-200 ग्रॅम बियाणे
संकरित वाण
१ एकर क्षेत्र पूर्नलागवडीसाठी 100-120 ग्रॅम बियाणे

बियाणे प्रक्रिया

 • इमिडाक्लोप्रिड – 4 मिली
 • सूचना  – वरील घटक प्रति १ किलो बियाणे याप्रमाणे २ लिटर पाण्यात मिसळुन तयार झालेल्या द्रावणात बियाणे 10 मिनिटासाठी बुडवावेत व नंतर 15 मिनिटासाठी सावलीत वाळवावेत.
 • कॅर्बोन्डाझीम   – 2 ग्रॅम
 • सूचना – बीजप्रक्रिया केलेले बियाणे परत  2 ग्रॅम कॅर्बोन्डाझीम प्रति १ किलो बियाणे याप्रमाणे बियाणांना चोळावे. 
 •  

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 • नांगरणीची पध्दत –  मातीच्या प्रकारानुसार जमीन १ ते २ वेळा नांगरून घ्यावी.
 • खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन १० दिवस खुली ठेवावी. 
  1. शेणखत – 2 टन
  2. कम्पोस्टिंग बॅक्टरीया – 3 किलो 
 • वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर फिरवावे व माती भुसभुशीत करून घ्यावी.
वाफे तयार करणे
 • गादी वाफा तयार करण्यासाठी  60 सेमी रूंदीचा व 10 सेमी उंचीचा गादी वाफा तयार करावा व दोन गादी वाफ्यांमध्ये 30 सेंमी चे अंतर ठेवावे.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
1.9 फूट
दोन रोपातील अंतर
1.5 फूट
रोपांची संख्या
14800
संकरीत
दोन ओळीतील अंतर
1.5 फूट
दोन रोपातील अंतर
1.5 फूट
रोपांची संख्या
19750

मुळे बुडवणे प्रक्रिया

 • एका सपाट भांड्यात 20 लिटर पाणी घ्यावे. 
 • त्यामध्ये कार्बनडॅझीम (40 ग्रॅम) व इमिडाक्लोप्रिड (40 मिली) एकत्रित करावे.
 • रोपांची मुळे पुर्नलागवडी पूर्वी या द्रावणात 5 मिनिट बुडवावीत.
 • जर रोपे प्रो ट्रे मध्ये असतील तर रोपांसहित प्रो ट्रे भांड्यात 5 मिनिटासाठी बुडवावा.

पुनर्लागवड

 • पुर्नलागवड करताना 45 सेमीच्या अंतरावर  सरी तयार करून रोपांची लागवड करावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • एकूण खतांची मात्रा- 60:30:30 एन:पी:के किग्रॅ/एकर 
 • पुर्नलागवड करतेवेळी
 • युरिया- 64 किग्रॅ 
 • सिंगल सुपर फॉस्फेट- 184 किग्रॅ 

 • म्यूरेट ऑफ़ पोटॅश- 50 किग्रॅ 

 • पुर्नलागवडीनंतर 30 दिवसांनी

 • युरिया- 64 किग्रॅ

सिंचन

 • ठिबक सिंचन- एक दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • 8-10 दिवसांच्या अंतराने पाटाने पाणी द्यावे.

आंतरमशागत प्रक्रिया

नांग्या भरणे – एकरी रोपांची संख्या राखण्यासाठी व रोपांची वाढ एकसमान ठेवण्यासाठी  लागवडीनंतर १० दिवसांनी नांग्या भराव्यात.

तण व्यवस्थापन

3 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ओक्सीफ्लूरोफेन किंवा पेंडीमिथॅलीन किंवा आयसोप्रोटेयुरोन
तणनाशकाचे प्रमाण
100 मिली/एकर 400 मिली/एकर 200 मिली/एकर
25 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
एलाक्लॉर किंवा आयसोप्रोटेयुरोन
तणनाशकाचे प्रमाण
500 ग्रॅम/एकर 1 किलो/ एकर

किड आणि रोग व्यवस्थापन

मर रोग
लक्षणे
झाडे कमकुवत होतात आणि वाळतात
पिक निविष्टा प्रमाण
मेटॅलिक्सिल
250.0 ग्राम प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
कोबी फ्लॉवर वरील अळी
लक्षणे
अळी पाने कुरतडते आणि पानांवर लहान छिद्रे करते, याप्रमाणे संपूर्ण पान उध्वस्त करते. पाने पिवळी पडतात व दुमडतात.
पिक निविष्टा प्रमाण
लेम्बडा- सायहॅलोथ्रीन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
तपकिरी डाग
लक्षणे
फुलगोभी मध्ये येणार हा सामान्य रोग आहे. ह्या रोगामुळे खोड पोकळ होते आणि फ्लॉवर कला पडतो आणि चवीला कडू लागतो. बॉरॉन च्या कमतरतेमुळे हा रोग होतो.
पिक निविष्टा प्रमाण
बोरॅक्स
500 मिली ग्राम एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
व्हीपटेल
लक्षणे
ह्या रोगामुळे पानांची टोके नीट वाढत नाहीत. ह्यामुळे वाढ कमी होते व हवा तसा बाजारभाव मिळत नाही. हा रोग मॉलिब्डेनम च्या कमतरतेमुळे कोबी मध्ये आढळतो. हा रोग ऍसिडिक मातीमध्ये म्हणजे ४-५ PH असणाऱ्या मातीमध्ये आढळतो.
पिक निविष्टा प्रमाण
सोडियम मॉलीब्डेट
1 किलो ग्राम एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
पानांवरील ठिपके
लक्षणे
पानांवर तपकिरी रंगाचे स्पॉट दिसतात आणि त्यांचा मध्य भाग राखाडी रंगाचा असतो. संसर्ग झालेली पाने गळून पडतात ज्यामुळे झाडाला फळे येण्याचे प्रमाण कमी होते.
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
200 ग्राम एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
मुळांवरील गाठी
लक्षणे
कोबीच्या क्षेत्रात रोपाची पाने सुकून पिवळी पडतात तसेच रोपाच्या मुळांवर गाठी येतात.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
250 ग्राम एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
रसशोषक किडी
लक्षणे
पाने पिवळी पडतात व दुमडतात.
पिक निविष्टा प्रमाण
थायोमीथाक्साम
100 ग्राम एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
काढणीचा कालावधी
पेरणीनंतर 70-80 दिवसांनी

उत्पादन

उत्पादन
काढलेले एकूण उत्पादन
8-10 टन प्रति एकर

1 thought on “Cauliflower

 1. Pingback: Cauliflower - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *