Cabbage

कोबी

अपेक्षा

अपेक्षित काढणी

100-120 क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर 90-180 दिवस

अपेक्षित खर्च (रुपये)

55,450

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

1,10,000

अनुकूल हवामान

हवामान
 • थंड आणि दमट हवामानात चांगले वाढते.
 • गड्डा तयार होताना जास्त पाऊस, ढगाळ हवामान घातक आहे कारण त्यामुळे गड्ड्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
तापमान
 • जास्त तापमानामुळे गड्डे पिवळे होतात.
 • 15-21°C श्रेणीतील तापमान गड्डे तयार होण्यासाठी आणि वाढीसाठी इष्टतम मानले जाते. 
पिकाची पाण्याची गरज
 • पाण्याची गरज- 350-500 मिमी पावसाइतकी .

अनुकूल मृदा

प्रकार
 • वालुकामय माती ते चिकणमाती. 
सामू
 • आवश्यक श्रेणी- 5.5 ते  6.5
 • पीएच 8 पेक्षा जास्त असलेल्या जमिनीत रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो.
 • जर पीएच < 5.5 असेल तर चुनखडी घाला
 • जर पीएच > 6.5 असेल तर जिप्सम घाला.

लागवडीसाठी साहित्य

गोल्डन एकर
कालावधी
60-65 दिवस
खास वैशिष्ट्य
सुधारीत वाण, लवकर परिपक्व होणारे वाण, लहान गोलाकार गड्डे, पानांचा रंग बाहेरून फिकट हिरवा आणि आतून गडद हिरवा
हंगाम
रब्बी
उत्पादन
72-88 क्विंटल प्रति एकर
प्राईड ऑफ इंडिया
कालावधी
70-80 दिवस
खास वैशिष्ट्य
लवकर परिपक्व होणारे वाण, मध्यम-मोठे आकाराचे 1-1.5 किग्रॅ वजनाचे गड्डे
हंगाम
रब्बी
उत्पादन
72-100 क्विंटल प्रति एकर
सप्टेंबर अर्ली
कालावधी
105-110 दिवस
खास वैशिष्ट्य
मध्य हंगामातील वाण, निलगिरी भागात लोकप्रिय, गड्डा घट्ट, चपटा, लांबट आणि निळसर हिरवी पाने, वजन 4-6 किग्रॅ.
हंगाम
रब्बी
उत्पादन
144-180 क्विंटल प्रति एकर
पुसा ड्रमहेड
कालावधी
100-110 दिवस
खास वैशिष्ट्य
उशिरा हंगाम असलेले वाण गड्डे मोठे, चपटे, काहीसे सैल आणि ड्रमच्या आकाराचे. प्रत्येक गड्ड्याचे वजन 3-5 किग्रॅ बाहेरची पाने फिकट हिरवी आणि ठळक मध्यरेषा. चांगल्या पिकासाठी दीर्घकाळ हिवाळ्याची गरज असते, काळ्या बुरशी रोगाला प्रतिकारक्षम
हंगाम
रब्बी
उत्पादन
180-195 क्विंटल प्रति एकर
उशिरा मोठे ड्रमच्या आकाराचे गड्डे
कालावधी
100-105 दिवस
खास वैशिष्ट्य
उशिरा परिपक्व होणारे घट्ट, चपटे आणि एकसारख्या आकाराचे गड्डे असलेले वाण.
हंगाम
रब्बी
उत्पादन
70-108 क्विंटल प्रति एकर

रोपवाटिका तयार करणे

रोपवाटिका तयार करणे

पद्धत- 1

 • 100 चौ.मी. रोपवाटिका क्षेत्र एक एकरातील लागवडीसाठी पुरेसे आहे. 
 • 3 मी. लांब आणि 0.6 मी. रुंद आणि 10-15 सेमी उंचीचे वाफे तयार करा.
 • दोन वाफ्यांमध्ये 60 सेमी अंतर ठेवा.
 • बारीक मातीचा थर असलेल्या आणि दोन ओळीत 10 सेमी अंतर असलेल्या गादी वाफ्यांवर 1-2  सेमी खोलीवर बी पेरा आणि नंतर झारीने हलके पाणी द्या.
 • नंतर तापमान आणि आर्द्रता टिकवण्यासाठी वाळलेले गवत किंवा ऊसाच्या पाचटाने वाफे झाका.
 • अंकुरण पूर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार झारीने पाणी द्या.
 • पुनर्लागवडीपूर्वी दहा दिवस आधी वाफ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करा म्हणजे रोपे मजबूत होतील.
 • रोपांचे मर ह्या रोगा पासून संरक्षण होण्यासाठी रोगापासून बियांचे अंकुरण झाल्यावर 3 दिवसांनंतर रीडोमिल @ 15-20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घालून बियाण्याच्या वाफ्याची आळवणी करा. 
 • 19:19:19 @ 5 ग्रॅम + थायमेथोक्झाम  @ 0.25 ग्रॅम 1 लिटर पाण्यात घालून पेरणीपूर्वी 25 दिवस फवारा.

पद्धत-2

 • प्रती ट्रे 1.2 किग्रॅ कोकोपीट घालून प्रो ट्रे भरा. 
 • प्रो ट्रेमध्ये प्रत्येक खड्ड्यात 1 याप्रमाणात प्रक्रिया केलेले बी पेरा.
 • बी कोकोपीटने आच्छादित करा आणि ट्रे एकावर एक ठेवा आणि अंकुरण सुरू होईपर्यंत पॉलीथिन कागद घालून झाकून ठेवा (पेरणीनंतर 5 दिवस).
 • 6 दिवसांनंतर, अंकुरीत झालेल्या बिया असलेले प्रो ट्रे वेगवेगळे करून शेड नेटमध्ये ठेवा.
रोपवाटिका कालावधी
 • कालावधी- 45 दिवस 
 • जेव्हा 3-4 पाने येतील आणि खोड जाड होईल, तेव्हा रोपे पुनर्लागवडीसाठी तयार असतील.
बियाण्यांचे प्रमाण
वाण
240-300 ग्रॅम/एकर
संकरीत
100-120 ग्रॅम/एकर

बियाणे प्रक्रिया

बियाण्याला याची प्रक्रिया करा

 • इमिडाक्लोप्रीड – 4 मिली

सूचना– एक किलो बियाण्यासाठी वरील प्रमाण दोन लिटर पाण्यात मिसळा. बियाणे द्रावणात 10 मिनिटे बुडवा आणि नंतर सावलीत 15 मिनिटे वाळवा.

 • कार्बेन्डॅझिम – 2 ग्रॅम

सूचना– प्रक्रिया केलेल्या बियाण्यावर पुन्हा 2 ग्रॅम कार्बेन्डॅझिम 1 किग्रॅ बियाण्यासाठी या प्रमाणात प्रक्रिया करावी. 

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 1. नांगरणी पद्धत – मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 किंवा 2 वेळा नांगरा.
 2. खालील गोष्टी शेतात मिसळा आणि व्यवस्थित कुजण्यासाठी 10 दिवस मोकळी हवा लागू द्या –  

               शेणखत – 2 टन

              विघटन करणारे जीवाणू – 3 किग्रॅ

           3. वरील मिश्रण मातीवर पसरवा आणि संपूर्ण शेतावर रोटाव्हेटर फिरवा म्हणजे जमीन नांगरल्यासारखी मऊ होईल.

वाफे तयार करणे
 1. वाफे तयार करणे-  ट्रॅक्टरच्या मदतीने 45 फूट अंतरावर सरी आणि वरंबे तयार करा.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
1.4 फूट
दोन रोपातील अंतर
1 फूट
रोपांची संख्या
31,428

मुळे बुडवणे प्रक्रिया

 • एका सपाट भांड्यात  20 लिटर पाणी घ्या.
 • 40 ग्रॅम कार्बेंडॅझिम + 40 मिली इमिडाक्लोप्रीड मिसळा. 
 • पुनर्लागवडीपूर्वी मुळे द्रावणात बुडवा.
 • प्रो ट्रेतील रोपांसाठी – प्रो ट्रे 5 मिनिटे भांड्यात  बुडवा. 

पुनर्लागवड

 • वरंब्यावर 30 सेमी अंतरावर रोपांची पुनर्लागवड करा.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • 60:30:30 एन:पी:के किग्रॅ/एकर. 
 • पेरणीच्या वेळी द्या- 

               युरिया- 64 किग्रॅ

               सिंगल सुपर फॉस्फेट- 184 किग्रॅ 

               म्युरेट ऑफ पोटॅश- 50 किग्रॅ

 • 30 दिवस पुनर्लागवडीनंतर-

              युरिया- 64 किग्रॅ

सिंचन

 • ठिबक – एक दिवस आड
 • पाटाने पाणी देणे- 8-10 दिवस अंतराने

आंतरमशागत प्रक्रिया

 • नांग्या भरणे – लागवडीला 20 दिवस झाल्यावर रोपांची संख्या कायम ठेवण्यासाठी आणि एकसारख्या वाढीसाठी नांग्या भराव्यात. 
 • लागवडीनंतर 30 व्या आणि 45 व्या दिवशी कोळपणी करता येईल.

तण व्यवस्थापन

पुनर्लागवडीनंतर 3 दिवसांनी
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऑक्झीफ्लुरोफेन (100 मिली/एकर) किंवा पेंडीमेथालिन (400 मिली/एकर) किंवा आयसोप्रोट्युरॉन (200 मिली/एकर)
पुनर्लागवडीनंतर 25 दिवसांनी
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
अलाक्लोर (500 ग्रॅम/एकर) किंवा आयसोप्रोट्युरॉन (1 किग्रॅ/एकर)

किड आणि रोग व्यवस्थापन

पानावरील भुंगे
लक्षणे
हि अळी लहान पाने व देठ खाते
पिक निविष्टा प्रमाण
बिव्हेरिया बॅसियाना
1 किलो प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
मुळांवरील गाठी
लक्षणे
मुळांमध्ये गाठी येतात नवीन रोपं कमकुवत होतात, सहजपणे ओढली जातात आणि मुळे डॅमेज होतात
पिक निविष्टा प्रमाण
ट्रायकोडर्मा व्हिरीडी
1 किलो प्रति एकर
वापर
पाण्यासोबत ठिबक सिंचनाने घालावे.
रसशोषक किडी
लक्षणे
पानांवर किंवा देठावर लहान कीटक दिसतात हे किडे पानातील रस शोषतात त्यामुळे रोप कमकुवत होते
पिक निविष्टा प्रमाण
पिवळे चिकट सापळे
10 सापळे प्रति एकर
वापर
शेतामध्ये लावा.
मातीद्वारे प्रसारित होणारे रोग
लक्षणे
पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. मुळांना नुकसान पोचवतात. झाडांची पाने वाळायला सुरुवात होते.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
40 ग्रॅम प्रति एकर
वापर
लागवडीआधी मुळे मिश्रणामध्ये बुडवून घ्या.
कोबी फ्लॉवर वरील अळी
लक्षणे
अळी पाने कुरतडते आणि पानांवर लहान छिद्रे करते, याप्रमाणे संपूर्ण पान उध्वस्त करते
पिक निविष्टा प्रमाण
इंडोक्साकार्ब + नोवलूरॉन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
पानांवरील ठिपके
लक्षणे
पानांवर लहान गडद रंगाचे ठिपके दिसून येतात, नंतर हे ठिपके मोठे होतात व एकत्र येतात त्यामुळे पानांवर मोठे करपल्यासारखे डाग दिसून येतात
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
कोबी फ्लॉवर वरील अळी
लक्षणे
फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे) प्रौढ कीटकांना आकर्षित करतात
पिक निविष्टा प्रमाण
फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे)
5 सापळे प्रति एकर
वापर
शेतामध्ये लावा.
मर रोग
लक्षणे
चिकट द्रव स्रवतात ज्यामुळे विशिष्ठ प्रकारची काळी बुरशी तयार होते
पिक निविष्टा प्रमाण
मेटॅलिक्सिल
250 मिली प्रति एकर
वापर
पाण्यासोबत ठिबक सिंचनाने घालावे.

कापणी

कापणीचा कालावधी
कापणीचा कालावधी
70-75 दिवस पुनर्लागवडीनंतर

उत्पादन

उत्पादन
काढलेले एकूण उत्पादन
100-120 क्विंटल प्रति एकर

2 thoughts on “Cabbage

 1. Pingback: Cabbage – LeanAgri

 2. Pingback: Cabbage - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *