लाखोंच्या मनामनातलं भारतॲग्री!

आपलं भारतॲग्री ॲप आता लाखमोलाचं झालं आहे. होय आपल्या ॲपचे 1 लाख डाउनलोड नुकतेच पूर्ण झाले असून आता दिवसेंदिवस हा आकडा वाढतानाच दिसत आहे. या 1 लाख डाऊनलोडमधून शेतकऱ्यांचा भारतॲग्रीवर असलेला सार्थ विश्वास दिसून येत आहे. भारतॲग्री सोबत या प्रगतीच्या वाटेवर आता आणखी शेतकरी जोडले जात असून सर्वांनाच सोबत घेऊन आपल्याला ही वाट चालायची आहे.

आनंदी शेतकरी हेच आमचे खरे समाधान आहे. आज सुमारे 1 लाख डाउनलोड पूर्ण होताना
हजारो शेतकऱ्यांच्या आनंदाचे कारण भारतॲग्री आहे ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. 
या प्रवासात आमच्यासोबत आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे, डिलर्सचे आणि गुंतवणूकदारांचे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या या प्रवासात सोबत असलेल्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद!

भारतॲग्रीबद्दल आता नव्याने सांगण्याची खरंतर काहीच गरज उरली नाही. विश्वासार्हतेचे दुसरे नाव म्हणजे भारतॲग्री हे जणू समीकरणच झालं आहे. केवळ शेतकऱ्यांनीच नव्हे तर डीलर्सदेखील भारतॲग्रीलाच पसंती देताना दिसत आहेत. फक्त पैसे कमविण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करणारे डीलर्स हे शेतकऱ्यांना आवर्जून भारतॲग्रीची सेवा घ्यायला सांगतात. कमी खर्चात जास्त नफा होत असल्याने शेतकरीदेखील या प्रगतीच्या वाटेवर येण्यास तयार होतातच.

आता ज्यांना अजूनही भारतॲग्री म्हणजे काय हे माहित नाही त्यांच्यासाठी; भारतॲग्री हे कृषी आणि तंत्रज्ञानामधील अत्यंत महत्वाचा दुवा आहे. भारतॲग्री ॲपद्वारे शेतकऱ्यांना विविध सेवा पुरविल्या जातात, या सेवांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होतो आणि जमिनीचा पोतही वाढतो. भारतॲग्री ॲपद्वारे शेतकऱ्यांना विविध सेवा पुरविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, पाणी परीक्षण, हवामानावर आधारित गतिमान सल्ले, फार्म मॅपिंग आणि कृषिडॉक्टरांची प्रत्यक्ष शेताला भेट आणि ‘भारतॲग्री कृषिदर्शिका’ म्हणजेच तुमच्या शेताचे व्यक्तिगत पीक कॅलेंडर आदींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे कुशलतेने उगवा, अधिक उगवा! भारतॲग्रीचे ब्रीदवाक्य असून ही सेवा घेतलेला प्रत्येक शेतकरी समाधानी आणि आनंदी आयुष्य जगत आहे. लाखो शेतकऱ्यांनी भारतॲग्रीला दर्शविलेली पसंती हीच खरी आमच्या कामाची पोचपावती आहे. यापुढेही भारतॲग्री तुम्हाला अशाच लाखमोलाच्या सुविधा देत राहील अशी ग्वाही आज आम्ही देत आहोत.

ही लाखमोलाची वाटचाल आमच्या संपूर्ण टीमसाठी खूप खास आहे आणि त्याहून आनंद आहे तो तुम्ही आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाचा! पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांचे, डिलर्सचे आणि गुंतवणूकदारांचे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या या प्रवासात सोबत असलेल्या प्रत्येकाचे खूप खूप धन्यवाद! चला तर मग भारतॲग्रीसह कुशलतेने उगवा, अधिक उगवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *