
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
🔰 हुमणी कीड नियंत्रण वाटते तितके सोपे नाही… पण तज्ज्ञांच्या सल्याने उपाययोजना केल्यास हे सहजशक्य होते. आज आपल्याला डॉ. पांडूरंग बा. मोहिते प्राध्यापक, कृषी किटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर हे हुमणी कीड नियंत्रणाच्या काही स्मार्ट पद्धती सांगत आहेत.
तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
हुमणी अळीचे नियंत्रण
या पद्धतींचा वापर करा आणि तुमचे शेत कीडमुक्त ठेवा: –
- नुकसानीचे स्वरूप लक्षात घेता, ऊभा ऊस किंवा खोडव्यामध्ये पहारीने ऊसाच्या बुंध्यालगत खड्डा काढून त्यात हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागताच. फ्ल्युबेंडाअमाएउ 200 मिली., क्लोमायोनिडीन 250 ग्रॅम, रेनाक्झीपायर 200 मिली. लॅसेंटा 250 ग्रॅम किंवा क्लोरोपायरीफॉस 1 लि. हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून पंपाचे नोझल काढून कच्च्या घातीवर पहारीने नाळे मारून आळवणी करावी.
- वरील सर्व उपाय सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. किंवा फोरेट, 10 जी किंवा फीप्रोनिल दाणेदार 10 किलो समप्रमाणात मातीत मिसळून कच्या घातीवर टाकावे.
- नुसते सरीतून औषध टाकून हुमणीचा बंदोबस्त होणार नाही. कारण हुमणी बोधात आहे.
- किटक शास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे हुमणीच्या जैविक नियंत्रणाविषयी प्रयोग झालेले आहेत. त्यामध्ये असे निष्कर्ष आहेत की मेटारायझम ऑनिसोफिली किंवा बिव्हेरिया बुरशी 50 ग्रॅम 10 लि. पाण्यात मिसळून त्यात थोडे अर्धा कप दूध टाकून पहारीने केलेल्या खड्ड्यात आळवणी करावी.
- वळवाचा पाऊस पडल्यानंतर (मार्च पासून मे पर्यंत) हुमणीचे भुंगे एकाचवेळी बाहेर पडतात आणि बाभूळ, कडूनिंब झाडावर जमा होतात. ते भुंगे काठीच्या सहाय्याने फांद्या हलवून गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत.
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻