भारतॲग्री म्हणजे काय रे भाऊ?

गेले काही दिवस सगळीकडे या नावाचा बोलबाला आहे. नाक्यावर, पारावर, चंदूच्या टपरीवर सगळीकडे भारतॲग्रीचीच चर्चा… कोण म्हणतोय मला लै फायदा झाला… कोण म्हणतोय माझं पीक बहरलं… कोण म्हणतंय आमच्या बापजाद्यात कधी अशी शेती पाहिली नव्हती अन केली ही नव्हती… कोण म्हणतंय पोत्याने खत घालून जे होत नव्हतं ते आता निम्या पोत्यापेक्षाही कमीत होतंय… अरे अरे अरे… हे चालय तरी काय?

हे भारतॲग्री म्हणजे नक्की काय आहे रे भाऊ?

भारतॲग्री हे कृषी आणि तंत्रज्ञानामधील अत्यंत महत्वाचा दुवा आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना विविध सेवा पुरविल्या जातात आणि या सेवांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होतो आणि जमिनीचा पोत वाढण्यासही मदत होते. विशेष म्हणजे ”कुशलतेने उगवा, अधिक उगवा!” हे भारतॲग्रीचे ब्रीदवाक्य असून ही सेवा घेतलेला प्रत्येक शेतकरी हा समाधानी आणि आनंदी आयुष्य जगत आहे.

हो बरोबरय तुमचं… हे सगळं शक्य असलं तरी प्रश्न उरतो की भारतॲग्री नक्की काय करते… चला तर मग आज शेतकरी दिनाच्या निमित्ताने याच प्रश्नाचं उत्तर शोधुयात…

शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात… बियाण्यांच्या निवडीपासून सुरु झालेली प्रक्रिया शेतमाल बाजारात नेऊन विक्रीस जाईपर्यंत सुरूच असते. यात रोगराई, पाणी व्यवस्थापन, हवामान आदी अनेक घटकांचा समावेश असतो. काही घटक हे नियंत्रित असतात पण काही घटकांवर नियंत्रण ठेवणे अशक्य असते जसे की हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, इत्यादी. अशावेळी शेतकऱ्याला जर तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतकरी या अडीअडचणींवर मात करून पुढे जाऊ शकतो. तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यामधला दुवा म्हणून भारतॲग्री काम करते.

भारतॲग्री ॲपद्वारे शेतकऱ्यांना विविध सेवा पुरविल्या जातात यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, पाणी परीक्षण, हवामानावर आधारित गतिमान सल्ले, फार्म मॅपिंग आणि कृषिडॉक्टरांची प्रत्यक्ष शेताला भेट आदींचा समावेश आहे. या सर्व सेवांची माहिती आपण विस्ताराने पाहू आणि त्यामुळे होणारे फायदेही जाणून घेऊ.

माती परीक्षण: यामुळे तुम्हाला तुमच्या मातीची नव्याने ओळख होते, मातीतील पोषक घटक आणि मातीचा पोत कळाल्यामुळे त्यात कोणते पीक घेता येईल हे कळण्यास मदत होते.

 

पाणी परीक्षण: तुम्ही शेतजमिनीला देत असलेल्या पाण्याच्या चाचणीतून पाण्यातील क्षारांचे प्रमाण आणि अन्य घटकद्रव्यांचे प्रमाण समजते.

 

 

हवामानावर आधारित गतिमान सल्ला: तुमच्या शेतातील हवामानाचा अचूक अंदाज मिळाल्याने तुम्ही राहता अपडेट. पुढील ३ दिवसांच्या तापमानाच्या अंदाजामुळे पिकाची सुरक्षा करणे होते सोपे.

 

फार्म मॅपिंग: यामुळे आपल्याला मिळते अचूक लागवडीयोग्य शेतजमीन ज्यामुळे खर्च होतो कमी आणि नफा फायदा होतो जास्त.

 

 

कृषिडॉक्टर भेट: आमचे कृषिडॉक्टर स्वतः तुमच्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊन देतात उपाय ज्यामुळे तुमच्या शंकांचे निरसन आणि समाधान होते आणि उत्पादनातही वाढ होते.

 

भारतॲग्री कृषिदर्शिका: म्हणजेच तुमच्या शेताचे व्यक्तिगत पीक कॅलेंडर जे तुम्हाला देते पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या सर्व आवश्यक कार्यांची माहिती. ज्यामुळे तुमची शेती होते समृद्ध आणि उत्पादन होते दुप्पट. 

 

 

तर मग आता आणखी विचार कसला करताय आजच भारतॲग्री ॲप
डाऊनलोड करा किंवा तुमच्या जवळच्या भारतॲग्री डीलरला भेट द्या.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही पुढील क्यूआर कोड स्कॅन करू शकता किंवा
9075 9077 33 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ॲप डाउनलोड करण्याची लिंक मिळवू शकता.

सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


भारतॲग्रीसोबत कुशलतेने उगवा, अधिक उगवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *