
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
👷♂ शेतकरी बंधूंनो 🌧️ पाऊसाची जोरदार बॅटिंग आता सुरू आहे आणि सोबतच आता योग्य वापश्यानंतर तुमच्या पेरणीच्या कामालाही वेग येईल. म्हणूनच 🌱 भारतअॅग्री घेऊन आली आहे, तुमच्या यंदाच्या खरीप पेरणीसाठी उपयुक्त अशी बीजप्रक्रियेबद्दलच्या स्मार्ट टिप्स. 👍
🛑 बिजप्रक्रियेचे फायदे-
🔹जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो
🔹 बियाण्याची उगवण क्षमता वाढते
🔹रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात
🔹पिकाच्या उत्पादनात वाढ होते
🔹 कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मकउपाय करून पेरणी करता येते
🛑 बिजप्रक्रिया करण्याचा क्रम-
🔹सर्वप्रथम रासायनिक बिजप्रक्रिया करावी
🔹त्यानंतर 3-4 तासांनी रायझोबिअम/अॅझोटोबॅक्टरची बिजप्रक्रिया करावी
🔹सर्वात शेवटी पी. एस.बी. ची बिजप्रक्रिया करावी
🛑 रासायनिक बिजप्रक्रिया-
🔹 कार्बेन्डाझिम 50.0% WP- 2.5 ग्राम + इमिडाक्लोप्रीड 17.8% SC- 1.0 मिली ली/प्रति किलो बियाण्यास चोळा.
🛑 जिवाणु संवर्धकाची बिजप्रकिया-
🔹5 ग्रॅम जीवाणु सवर्धक प्रति किलो बियाण्यास वापरावे.
🔹1लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळ टाकुन द्रावण तयार करावे.
🔹द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणु संवर्धन (ऍझोटोबॅक्टर,रायझोबियम, पीएसबी) टाकुन बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जीवाणु संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल व बियाण्यांचा पृष्ठभाग (साल) खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
🔹बियाणे ओलसर करुन जीवाणू संवर्धन करणारे जिवाणू बियाण्यास चोळावेत.
🔹नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे .
अशी बिजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी ताबडतोब करावी त्यामुळे जमिनीतुन सेंद्रीय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते.
🔰 या खरीप हंगामात भारतअॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअॅग्री अॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
(तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍)
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻