
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
🔰 एकात्मिक फुलव्यवस्थापनाचे उपाय ✅
⭕ संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा 🔻
🌸 डाळिंबात फुलगळ होत आहे आणि मादी कळी देखील खूप कमी आहे? अहो मग चिंता करू नका आपली भारतअॅग्री आहे ना.
🔻 खालील उपाय करा आणि निश्चिंत राहा: 🔻
- बागेमध्ये नैसर्गिक परागीकरण करण्यासाठी बागेत मधमाश्या पाळाव्यात.
- शेतातील माती परीक्षणानुसार बागेत शिफारस केलेल्या मात्रेनुसार खतपुरवठा करावा.
- बागेतील पाण्याचे नियोजन शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे.
- कीड व रोगांचे पूर्व नियोजन करावे.
- बाग नेहमी स्वच्छ ठेवावी आणि वेळोवेळी गरजेनुसार तणांचा बंदोबस्त करावा.
- छाटणी करताना रोगट ,तेलकट व अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात .
- तोडणी नंतर पुढील बहार घेण्यापूर्वी बागेला योग्य ती विश्रांती घ्यावी. ( किमान 3 ते 4 महिने.
- विश्रांती काळात असताना फक्त जगण्याइतपत पाणी झाडांना द्यावे.
- पानगळीसाठी इथरेल (इथेफॉन) ची मात्रा ही झाडाची झालेली नैसर्गिक पानगळ विचारात घेऊन ठरवावी.
(तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍)
🔻 बागेत जर कळी लागली नसेल तर खालील उपाय योजना कराव्यात- 🔻
- अमोनियम नायट्रेट 0.5 टक्के प्रमाणात फवारावे किंवा
- NAA 10 पीपीएम या प्रमाणात फवारावे. ( NAA ची फवारणी करण्यासाठी त्यास इथेनॉल (70 टक्के) मध्ये मिसळावे. कारण ते पाण्यामध्ये द्रवणशील नाही. ते इथेनॉलमध्ये विरघळल्यानंतरच त्यामध्ये आणखी पाणी घालून 10 pmm चे द्रावण तयार करावे.) किंवा
- जमिनीमध्ये ओल असताना 10 ते 12 दिवसांनी 2.5 मिली प्लॉनोफिक्स प्रति 10 लिटर या प्रमाणामध्ये 2 फवारण्या घ्याव्यात.
🔰 या खरीप हंगामात भारतअॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअॅग्री अॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻