
🔰 हळद/ आले पिकाची लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पिकांची गड्डे भरण्याची अवस्था सुरु झाली आहे. अशातच सध्या नाशिक, यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद या अद्रक/ हळद लागवडीखालील विभागांमध्ये सध्या पावसाने थैमान घातले आहे. 😱
👉 यामुळे झाडाच्या खोडाच्या बुंध्याजवळ किंवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालणाऱ्या कंदमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा दिसून येण्यास सुरुवात झाली आहे.
🌱 बाहेर पडलेल्या अळ्या कंदात घुसतात त्यामुळे कंद मऊ होऊन त्यांना पाणी सुटते आणि कुजतात. त्यांचे योग्य वेळीच व्यवस्थापन केल्यास पुढील नुकसान टाळता येते. ✌️
👉 ही माहिती आवडली तर ⬆️ अपवोट करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
🛡️ असे करा व्यवस्थापन: 🔽
⭕ किडीची लक्षणे –
🔹 नवीन फुटव्यांची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात.
🔸 खोडाचा रंग तपकिरी काळपट होऊन व तो प्रादुर्भावग्रस्त फुटवा हाताने ओढल्यास सहज हातात उपटून येतो.
🔹 उपटून आलेल्या कंदामध्ये अळ्या दिसून येतात तसेच कंदातून घाण वास येतो.
✅ उपाय –
🔹 सप्टेंबर महिन्यामध्ये क्विनॉलफॉस २५% (धानुका- धानुलक्स) ३० मिली प्रति १५ ली पंप या प्रमाणात फवारणी करावी.
🔸 उघडे पडलेले कंद झाकले जाण्यासाठी जमीनची वाफसा येताच भरणी करावी.
🔹 कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच कार्बेन्डाझिम ५०% (बाविस्टीन) ५०० ग्राम किंवा कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब (साफ) -५०० ग्राम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ४०० ग्राम प्रति एकर २०० ली पाणी या प्रमाणात आळवणी करावी. व त्यानंतर ५-६ दिवसांनी ह्यूमिक ऍसिड ५०० मिली प्रति एकर या प्रमाणात आळवणी करावी.
▶️ (टीप – ह्या आळवण्या करताना जमिनीमध्ये वाफसा असणे गरजेचे आहे.)
👉 ही माहिती आवडली तर ⬆️ अपवोट करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻