Sweet Corn

CROP Title

अपेक्षा

अपेक्षित काढणी

20-30 क्विंट्टल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

70-105 दिवसानंतर 

अपेक्षित खर्च (रुपये)

25,000

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

48,000

अनुकूल हवामान

हवामान
 • मधुमका ह्या पिकासाठी उबदार हवामान आवश्यक आहे.
 • परंतु सर्व प्रकारच्या वातावरणात हे  पीक घेतले जाऊ शकते.
 • फुले व फळ धारणेच्या कालावधीत जास्त पाऊस नसावा.
तापमान
 • मधुमका ह्या पिकाची वाढ 20-32°C ला चांगली होते. 
 • बियाणाची चांगली उगवण 20-25℃ तापमानात होते.
 • मधुमका हे पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत दव सहन करू शकत नाही ज्यामुळे बियाणाची उगवण क्षमता कमी होते, पिकाची व कणसाची वाढ खुंटते व अति थंडी मुळे पीक कोमेजून मरू शकते. 
पिकाची पाण्याची गरज
 • पाण्याची गरज – मधुमका ह्या  पिकाला 500 – 800 मिमी पावसाएवढ्या पाण्याची गरज असते.
 • रोपावस्था व कणसे उगवण्याचा कालावधी उगवण्याच्या कालावधीत मधुमका ह्या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता असते.

अनुकूल मृदा

प्रकार
 • कसदार व उत्तम निचऱ्याची वाळुयुक्त पोयटा व गाळवट माती निवडावी.  
सामू
 • आवश्यक सामू  6.0-7.5
 • सामू 6.0 पेक्षा कमी असल्यास मातीत चुनखडी टाकावी. 
 • सामू 7.5 पेक्षा जास्त असल्यास मातीत जिप्सम टाकावे. 

लागवडीसाठी साहित्य

माधुरी
कालावधी
70-75
खास वैशिष्ट्य
कमी कालावधीची जात
हंगाम
खरीप
उत्पादन
7 क्विंटल प्रति एकर
प्रिया
कालावधी
80-85
खास वैशिष्ट्य
कमी कालावधीची जात
हंगाम
रब्बी
उत्पादन
10 क्विंटल प्रति एकर
मंजिरी
कालावधी
100-105
खास वैशिष्ट्य
मध्यम कालावधीची जात
हंगाम
खरीप
उत्पादन
20 क्विंटल प्रति एकर
शुगर 75
कालावधी
75-80
खास वैशिष्ट्य
कमी कालावधीची जात
हंगाम
सर्व हंगामात
उत्पादन
30 क्विंटल प्रति एकर
बियाण्यांचे प्रमाण
वाण
4-5 किलो प्रति एकर
संकरीत
4-5 किलो प्रति एकर
 • शुगर – 75  ह्या जाती साठी बियाणांचे प्रमाण  2-2.5 किलो प्रति एकर. 

बियाणे प्रक्रिया

 • इमिडाक्लोप्रिड – 4 मिली
 • सूचना – वरील घटक प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे 2 लिटर पाण्यात मिसळुन तयार झालेल्या द्रावणात बियाणे 10 मिनिटासाठी बुडवावेत व नंतर 15 मिनिटासाठी सावलीत वाळवावेत.   
 •  कार्बेन्डाझिम – 2 ग्रॅम
 • सूचना – बीजप्रक्रिया केलेले बियाणे परत 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे बियाणांना चोळावे. 

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 • नांगरणीची पध्दत –  मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 ते 2 वेळा नांगरून घ्यावी.
 • खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन १० दिवस खुली ठेवावी.  –
  • शेणखत – 2 टन
  • कम्पोस्टिंग बॅक्टरीया – 3 किलो 
 • वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर फिरवाव व माती भुसभुशीत करून घ्यावी.
वाफे तयार करणे
 • गादी वाफा तयार करण्याची पध्दत – ट्रॅक्टरच्या साहाय्याने 60 सेमी च्या अंतराने सरीवरंबा तयार करून घ्याव्यात.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
1.9 फूट
दोन रोपातील अंतर
0.9 फूट
रोपांची संख्या
25,730

लागवड

 • टोकंन  पद्धतीने 4 सेमी खोल वरंब्यावर  बियाणे लावावीत .व लागवडीनंतर २५ दिवसांनी त्यात खते टाकून मातीने  झाकावे.
 • प्रत्येक वरंब्यावर  2 बियाणे लावावी कारण त्याची उगवण क्षमता कमी असते.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • मधुमका या पिकास जास्त प्रमाणात रासायनिक खाद्यपदार्थांची आवश्यकता असते. 
 • प्रति एकर 48 किलो नत्र, 24 किलो स्फुरद, 16 किलो पालाश द्यावे. 
 • लागवड करतेवेळी-

युरिया- 35 किलो

सिंगल सुपर फॉस्फेट- 150 किलो

म्यूरेट ऑफ़ पोटाश- 27 किलो

 • लागवडीनंतर 30 दिवसांनी-

युरिया- 35 किलो 

 • लागवडीनंतर 45 दिवसांनी-

युरिया- 35 किलो

सिंचन

 • आठवड्यातून एकदा पाठाने पाणी द्यावे.

आंतरमशागत प्रक्रिया

 • विरळणी व नांग्या भरणे 
 • लागवडी नंतर 10 ते 12 दिवसांनी 
 1. विरळणी- जिथे दोन बियाणांची लागवड केली आहे त्याठिकाणचे निरोगी व योग्यरीत्या वाढ झालेले रोप ठेवावे व दुसरे रोप काढून टाकावे. 
 2. नांग्या भरणे – जेथे बियाणाची उगवण झालेली नाही त्याठिकाणी टोकन पध्दतीने बियाणाची पेरणी करावी व वरंब्यावर दोन बियाणे लाऊन त्याला लगेच पाणी द्यावे.

तण व्यवस्थापन

3-5 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऍट्राझीन किंवा पेंडीमिथिलिन
तणनाशकाचे प्रमाण
100 ग्रॅम प्रति एकर किंवा 300 ग्रॅम प्रति एकर
45 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
2,4-डी
तणनाशकाचे प्रमाण
400 ग्रॅम प्रति एकर

किड आणि रोग व्यवस्थापन

मर रोग
लक्षणे
हि लक्षणे झाडातील खालच्या बाजूच्या पानांमध्ये जास्त दिसतात. रोग जेव्हा जास्त होतो तेव्हा वरील पानांवर देखील पसरतो. बरेच वेळा फक्त एक फांदीवर हा रोग दिसतो किंवा झाडाच्या एकाच बाजूला दिसतो.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Corn borer pest
मका खाणारी अळी
लक्षणे
मका पिकावर छिद्र दिसतील.
पिक निविष्टा प्रमाण
मॅलाथिऑन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
लष्करी अळी
लक्षणे
पानांमध्ये शेध झालेले दिसतील.
पिक निविष्टा प्रमाण
थायोमीथाक्साम
100 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
तांबेरा
लक्षणे
पिकाच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागावर विखुरलेले गडद, लालसर तपकिरी रंगाचे स्पॉट विकसित होतात, हा रोग सहज ओळखला जाऊ शकतो.
पिक निविष्टा प्रमाण
क्लोरोथॅलोनील
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
पानावरील करपा
लक्षणे
"पानांवरील ठिपके-पानांवर तपकिरी रंगाचे स्पॉट दिसतात आणि त्यांचा मध्य भाग राखाडी रंगाचा असतो. संसर्ग झालेली पाने गळून पडतात ज्यामुळे झाडाला फळे येण्याचे प्रमाण कमी होते. पानावरील करपा-पानावर स्पॉट दिसतात जे नंतर संपूर्ण पने खराब करतात."
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Maize plant with leaves showing chlorotic striping caused by Philippine downy mildew
डाऊनी मिल्डयू
लक्षणे
पानांच्या दोन्ही बाजूस पांढऱ्या रंगाची कापसासारखी वाढ झालेली दिसते. ह्यामुळे वनस्पती अनुत्पादक बनते.
पिक निविष्टा प्रमाण
फॉस्टल-अल
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
खोड पोखरणारी अळी
लक्षणे
झाडांची खोडे वळतात. नोडस् जवळ फांदीवर दृश्यमान भोक राहतात
पिक निविष्टा प्रमाण
इंडोक्साकार्ब + नोवलूरॉन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
पाने खाणारी अळी
लक्षणे
अनुवांशिक पद्धतीने पानांवर लहान छिद्र. नंतर ओळीमध्ये पाने कापतात
पिक निविष्टा प्रमाण
इंडोक्साकार्ब + नोवलूरॉन
100 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
कापणीचा कालावधी
लागवडी नंतर 70-105 दिवसांनी

उत्पादन

उत्पादन
काढलेले एकूण उत्पादन
20-30 क्विंटल प्रति एकर

2 thoughts on “Sweet Corn

 1. Pingback: Sweet Corn - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *