Red Chilli

लाल मिरची

अपेक्षा

अपेक्षित काढणी

15-20  क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर  200-220 दिवसांनी

अपेक्षित खर्च (रुपये)

74,977

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

1,75,000

अनुकूल हवामान

हवामान
 • भोंगी मिरचीपेक्षा लाल मिरचीला उष्ण हवामान जास्त अनुकूल आहे. 
 • मिरच्या प्रकाशाच्या कालावधीला संवेदनशील नसतात (दिवसाच्या लांबीचा फुलोऱ्यावर किंवा फळ धारणेवर परिणाम होत नाही)
तापमान
 • मिरचीच्या वाढीसाठी  20 ते 30°C च्या दरम्यानचे दिवसाचे तापमान सुयोग्य आहे.
 • जेव्हा रात्रीचे तापमान 24°C पेक्षा जास्त असते तेव्हा फळे व्यवस्थित लागत नाहीत. 
 • जेव्हा बराच काल तापमान 15°C पेक्षा कमी असते किंवा 32°C पेक्षा जास्त असते, तेव्हा सामान्यपणे वाढ आणि उत्पादन कमी होते.
पिकाची पाण्याची गरज
 • सामान्यपणे बागायती क्षेत्रात लागवड केली जाते.
 • मिरचीतील फुलोरा आणि फळांचा विकास या सर्वांत महत्त्वाच्या अवस्था आहेत. या अवस्थांमध्ये पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. 
 • पाण्याची गरज- 800-1200 मिमी पावसाइतकी .

अनुकूल मृदा

प्रकार
 • मिरची पाणी धारण करण्याची चांगली क्षमता असलेल्या लोम किंवा चिकण लोम मातीमध्ये सर्वांत चांगली वाढते, पण मातीत पाण्याचा निचरा चांगला असेल तर ती विविध प्रकारच्या मातीत चांगली वाढू शकते. 
सामू
 • आवश्यक श्रेणी – मातीचा पीएच  5.5 आणि 6.8 च्या दरम्यान असला पाहिजे.
 • तीव्र आम्ल असलेल्या आणि तीव्र आम्लारी असलेल्या जमिनी मिरचीच्या उत्पादनासाठी योग्य नाहीत.
 • जर पीएच < 5.5 असेल तर चुनखडी घाला.
 • जर पीएच > 6.8 असेल तर जिप्सम घाला.

लागवडीसाठी साहित्य

एल्लाचीपूर सनम-एस4 प्रकार
कालावधी
150-200 दिवस
खास वैशिष्ट्य
महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात लागवड केली जाते. लालसर रंग आणि अतिशय तिखट. कॅप्सिसीन-0.2%
हंगाम
खरीप
उत्पादन
2-2.5 क्विंटल प्रति एकर
गुंटूर सन्नम - एस4 प्रकार
कालावधी
200 दिवस
खास वैशिष्ट्य
आंध्र प्रदेशातील गुंटूर, वारंगल, खम्मम जिल्ह्यात लागवड केली जाते. जाड साल, तिखट आणि लाल. कॅप्सिसीन-0.226%
हंगाम
खरीप
उत्पादन
25 क्विंटल प्रति एकर
ब्याडगी (कड्डी)
कालावधी
150 दिवस
खास वैशिष्ट्य
धारवाड, कर्नाटकात लागवड केली जाते. लाल रंग, कमी तिखटपणा किंवा तिखटपणा नाही. काढणी हंगाम- जानेवारी ते मे
हंगाम
खरीप
उत्पादन
8-10 क्विंटल प्रति एकर
मध्य प्रदेश जी.टी.सन्नम
कालावधी
150-200 दिवस
खास वैशिष्ट्य
मध्य प्रदेशातील इंदूर, मलकापूर चिखली आणि एलीचपूर भागात लागवड केली जाते. लाल रंग आणि तिखटपणा काढणी हंगाम- जानेवारी ते मार्च
हंगाम
खरीप
उत्पादन
5-7 क्विंटल प्रति एकर

रोपवाटिका तयार करणे

रोपवाटिका तयार करणे

पद्धत- 1

 • 1 एकर क्षेत्रफळात पुनर्लागवड करण्यासाठी, 0.08 एकर (3 गुंठा) रोपवाटिका आवश्यक आहे
 • 7.5 मी लांबी X 1.2 मी रुंदी X 10 सेमी उंचीचे सहा वाफे तयार करा.
 • एका ओळीत 7.5 सेमी अंतरावर बिया पेरा आणि मातीने झाकून टाका.
 • रोपवाटिकेतील रोपांना अंकुरण होईपर्यंत दिवसातून दोनदा  आणि अंकुरण झाल्यावर दिवसातून एकदा पाणी घाला.
 • पुनर्लागवडीपूर्वी दहा दिवस आधी वाफ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करा म्हणजे रोपे मजबूत होतील.
 • रोपांचे ओली मर रोगापासून संरक्षण होण्यासाठी बियांचे अंकुरण झाल्यावर 3 दिवसांनंतर रीडोमिल @ 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घालून बियाण्याच्या वाफ्याची आळवणी करा.
 • 19:19:19 @ 5 ग्रॅम + थायमेथोक्झाम  @ 0.25 ग्रॅम 1 लिटर पाण्यात घालून पेरणीनंतर 25 दिवस फवारा.

पद्धत – 2

 • प्रत्येक ट्रेमध्ये प्रती ट्रे @ 1.2 किग्रॅ कोकोपीट घालून प्रो ट्रे भरा. 
 • प्रो ट्रेमध्ये प्रत्येक खड्ड्यात @ 1 या प्रमाणात प्रक्रिया केलेले बी पेरा.
 • बी कोकोपीटने आच्छादित करा आणि ट्रे एकावर एक ठेवा आणि अंकुरण सुरू होईपर्यंत पॉलीथिन कागद घालून झाकून ठेवा (5 दिवस).
 • 6 दिवसांनंतर, अंकुरीत झालेल्या बिया असलेले प्रोट्रे वेगवेगळे करून शेडनेटमध्ये गादी वाफ्यांवर ठेवा.
रोपवाटिका कालावधी
 • कालावधी- 35 दिवस 
 • जेव्हा पाने गडद हिरव्या रंगाची होतील आणि खोड जाड होईल, तेव्हा रोपे पुनर्लागवडीसाठी तयार असतील. 
बियाण्यांचे प्रमाण
वाण
380.0 - 400.0 gram/acre
संकरीत
High Yeilding, Execellent

बियाणे प्रक्रिया

बियाण्याला याची प्रक्रिया करा 

 • इमिडाक्लोप्रीड – 4 मिली

सूचना- एक किलो बियाण्यासाठी वरील प्रमाणात दोन लिटर पाण्यात मिसळा. बियाणे द्रावणात 10 मिनिटे बुडवा आणि नंतर सावलीत 15 मिनिटे वाळवा.

 • कार्बेन्डॅझिम – 2 ग्रॅम  

सूचना– प्रक्रिया केलेल्या बियाण्यावर पुन्हा 2 ग्रॅम कार्बेन्डॅझिम 1 किग्रॅ बियाण्यासाठी या प्रमाणात प्रक्रिया करावी. बियांवर चोळून ते बियाण्याला लावा.

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 1. नांगरणी पद्धत – मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 किंवा 2 वेळा नांगरा.
 2. खालील गोष्टी शेतात मिसळा आणि व्यवस्थित कुजण्यासाठी 10 दिवस मोकळी हवा लागू द्या –  
  1. शेणखत – 2 टन
  2. विघटन करणारे जीवाणू – 3 किग्रॅ
 3. वरील मिश्रण मातीवर पसरवा आणि संपूर्ण शेतावर रोटाव्हेटर फिरवा म्हणजे जमीन नांगरल्यासारखी मऊ होईल.
वाफे तयार करणे
 1. वाफे तयार करणे-  ट्रॅक्टरच्या मदतीने 75 सेमी किंवा 60 सेमी अंतरावर सरी आणि वरंबे तयार करा.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
1.9 फूट
दोन रोपातील अंतर
1.9 फूट
रोपांची संख्या
200
संकरीत
दोन ओळीतील अंतर
1.9 फूट
दोन रोपातील अंतर
1.9 फूट
रोपांची संख्या
200

मुळे बुडवणे प्रक्रिया

 • सपाट भांड्यात 20 लिटर पाणी घ्या.
 • 40 ग्रॅम कार्बेंडॅझिम + 40 मिली इमिडाक्लोप्रीड मिसळा.
 • पुनर्लागवडीपूर्वी मुळे द्रावणात 5 मिनिटे बुडवा.
 • प्रोट्रेतील रोपांसाठी – प्रोट्रे 5 मिनिटे डब्यात बुडवा. 

पुनर्लागवड

 • वरंब्यावर 60 सेमी अंतरावर रोपांची पुनर्लागवड करा. 

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • 40:20:20 एनपीके किग्रॅ प्रती एकर. 
 • पेरणीच्या वेळी द्या- (प्रती एकर)  युरीया- 44 किग्रॅ, सिंगल सुपर फॉस्फेट – 122 किग्रॅ, म्यूरेट ऑफ पोटॅश – 34 किग्रॅ
 • पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांनी –  युरिया- 22 किग्रॅ 
 • पुनर्लागवडीनंतर 45 दिवसांनी –  युरिया- 22 किग्रॅ 

सिंचन

 • ठिबक – एक दिवस आड
 • पूर- आठवड्यातून एकदा (पावसानुसार)
 • उन्हाळी हंगाम – 5-6 दिवस अंतर
 • मिरचीच्या प्रत्येक काढणीनंतर एक सिंचन दिले पाहिजे. जर वरून सिंचन वापरावे लागणार असेल तर दिवसातील लवकरच्या भागात करावे म्हणजे रात्र पडण्यापूर्वी पाने कोरडी होतील.

आंतरमशागत प्रक्रिया

 • प्रती एकर 2 टन भाताचा भुसा वापरा. मुळाच्या भागातील तापमान कमी करण्यासाठी प्लास्टिक आच्छादन गवताने झाका.
 • आधार देणे – उपटली जाऊ नयेत म्हणून विशेषत: जास्त फळे असताना रोपांना आधार दिला पाहिजे. फुलोऱ्याच्या अवस्थेच्या आधी प्रत्येक रोपाला आधार दिला पाहिजे.
 • पेरणीनंतर 30-40 दिवसांनी विरळणी आणि नांग्या भरणे केले पाहिजे. 

तण व्यवस्थापन

पुनर्लागवडीनंतर 3 दिवस
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
अट्राझिन 50 डब्ल्यूपी (100 ग्रॅम प्रती एकर) किंवा पेंडीमेथालिन (400 मिली प्रती एकर)
पुनर्लागवडीनंतर 30 दिवस
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऑक्झीफ्लुरोफेन (100 मिली प्रती एकर)

संजीवके

 • फुलोरा वाढवण्यासाठी पेरणीनंतर 20, 40 आणि 60 दिवसांनी  ट्रायकोनँटॅनोल @ 1.25 मिली प्रती एक लिटर पाणी द्या. 
 • फूलगळ कमी करण्यासाठी आणि फळधारणा वाढवण्यासाठी नॅफथ्यालिन ऍसिटिक ऍसिड 2 मिली प्रती 1 लिटर पाण्यात घालून पुनर्लागवडीनंतर 60 व्या आणि 90 व्या दिवशी फवारा.

किड आणि रोग व्यवस्थापन

मातीद्वारे प्रसारित होणारे रोग
लक्षणे
रोपं लगेच मान टाकतात आणि सुकतात बियाण्याची कमी उगवण किंवा बियाणे उगवून येत नाही बियाणे खराब होतात नवीन रोपांना तसेच वाढ झालेल्या झाडांवर प्रादुर्भाव करतात
पिक निविष्टा प्रमाण
ट्रायकोडर्मा व्हिरीडी
40 ग्रॅम प्रति एकर
वापर
लावणीआधी मुळे मिश्रणामध्ये बुडवून घ्या
रसशोषक किडी
लक्षणे
पाने गुंडाळली जातात पानांवर राखाडी रंगाच्या छटा दिसतात पाने वरील बाजूस दुमडतात पानांवर किंवा देठावर लहान कीटक दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
थायोमीथाक्साम
100 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
मर रोग
लक्षणे
पाने टोकापासून पिवळी पडायला आणि सुकायला सुरुवात होते फळ सडणे आणि सुकणे झाडाचा प्रभावित झालेला भाग तपकिरी पडतो आणि सुकतो
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
400 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
पांढरी भुरी
लक्षणे
हा रोग झाल्यावर पानांवर पांढरा रंग दिसतो. हा रोग खूप लवकर पानांवर आणि देठांवर पसरतो. राखाड़ी भुकटी पानाच्या वरील व खालील बाजूस दिसून येते.
पिक निविष्टा प्रमाण
सल्फर
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
मर रोग
लक्षणे
सुरुवातीच्या काळात रोपं पिवळी पडतात आणि वरील बाजूची पाने सुकतात नंतर संपूर्ण रोपं सुकते आणि पाने वरील व आतील बाजूस दुमडली जातात पाने पिवळी पडतात आणि मरतात
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
Fruit borer of chilli
फळे पोखरणारी अळी
लक्षणे
फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे) प्रौढ कीटकांना आकर्षित करतात फळांवर लहान छिद्रे दिसतात देठावर आणि फळांवर अळीने केलेले छिद्र दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
थायोमेथाक्साम + लेम्बडा सायहॅलोथ्रीन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
पिकाचा कालावधी
200-220 दिवस (वाणावर अवलंबून)
एकूण काढण्यांची संख्या
5 ते 6
काढणीतील अंतर
10 दिवस

उत्पादन

उत्पादन
प्रत्येक काढणीचे प्रमाण
1.5-2 क्विंटल प्रति एकर
काढलेले एकूण उत्पादन
7.5-10 क्विंटल प्रति एकर

2 thoughts on “Red Chilli

 1. Pingback: Red Chilli – LeanAgri

 2. Pingback: Red Chilli – BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *