Potato

बटाटा

अपेक्षा

अपेक्षित काढणी

100-180 क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर 100-110 दिवसांनी

अपेक्षित खर्च (रुपये)

45,000

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

1,68,000

अनुकूल हवामान

हवामान
 • बटाटा ह्या पिकाला वाढीच्या काळात थंड हवामान आवश्यक असते.  
तापमान
 • बटाट्याला वाढीच्या काळात 24°C तापमान व कंद वाढीच्या काळात 20°C अनुकूल असते.
 • या पिकास सरासरी 20 ते 25°C तापमान लागते.
पिकाची पाण्याची गरज
 • उगवण अवस्था, फांद्यांचा व कंदाचा विकास ह्या महत्वाच्या अवस्था आहेत. या अवस्थांच्या काळात पाण्याची जास्त गरज असते. 
 • बटाटा ह्या  पिकाला 500-700 मिमी पावसाएवढ्या पाण्याची गरज असते.

अनुकूल मृदा

प्रकार
 • क्षारयुक्त व खारवट माती सोडून बटाटा हे पीक सर्व प्रकारच्या मातीवर घेतले जाते.
 • वाळुयुक्त पोयटा, गाळवट पोयटा, गाळवट माती, चिकन माती निवडावी (माती भुसभुशीत असावी).
सामू
 • आवश्यक सामू – 5.0-6.5 (किंचित आम्ल युक्त माती)
 • जास्त क्षारयुक्त माती मध्ये बबटाट्याचे पीक घेतले जात नाही. 
 • जर सामू 5.0 पेक्षा कमी असल्यास तर मातीत चुनखडी टाकावी. 
 •  जर सामू 6.5 पेक्षा जास्त असल्यास तर मातीत जिप्सम  टाकावे. 

लागवडीसाठी साहित्य

बियाण्यांचे प्रमाण
वाण
600-800 किग्रॅ प्रति एकर (कोंब आलेल्या बटाट्याचे छोटे छोटे भाग करावे व प्रत्येक कापलेल्या भागाला २ डोळे असावे.(बियाणांचे वजन:40- 50 ग्रॅम) )

बियाणे प्रक्रिया

खालील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

मोठ्या पिंपामध्ये 200 लिटर पाण्यात 4 किग्रॅ ऍझोटोबॅक्टर 800 किग्रॅ बियाणांसाठी एकत्रित करून वापरावे व ह्या द्रावणात 30 मिनिटासाठी बियाणे  बुडवून ठेवावे व पेरणी साठी वापरावे.

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 1. नांगरणीची पध्दत –  मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 ते 2 वेळा नांगरून घ्यावी.
 2. खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन 10 दिवस खुली ठेवावी.   – 
  1. शेणखत – 2 टन
  2. कम्पोस्टिंग बॅक्टरीया – 3 किग्रॅ 
 3. वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर फिरवावे व माती भुसभुशीत करून घ्यावी.
वाफे तयार करणे
 1. गादी वाफा तयार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने 60 सेमी च्या अंतराने सरीवरंबा तयार करून घ्याव्यात.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
1.9 फूट
दोन रोपातील अंतर
0.3 फूट
रोपांची संख्या
33,333

पेरणी

 • बटाट्याची लागवड सरींवर 20 सेमी. च्या अंतरावर करावी. 
 • कोंब फुटलेले बियाणे वरंभ्यामध्ये ठेवावे व कोंबाचे तोंड वरच्या बाजूस येईल असे ठेवावे. कोंबचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.  

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • एकूण खतांची मात्रा- 40:55:40 एन:पी:के किग्रॅ/एकर 
 • लागवड करतेवेळी  युरिया – 43 किग्रॅ , सिंगल सुपर फॉस्फेट- 338 किग्रॅ, म्यूरेट ऑफ़ पोटाश- 67 किग्रॅ , मॅग्नेशियम सल्फेट-२५ किग्रॅ
 • लागवडीनंतर 30 दिवसांनी  युरिया- 22 किग्रॅ
 • लागवडीनंतर 45 दिवसांनी  युरिया- 22 किग्रॅ

सिंचन

 • ठिबक सिंचन-  3 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • पहिले पाणी पाठाने हलके द्यावे. पेरणीनंतर 5 -7 दिवसांनी हवामानाच्या व मातीच्या प्रकारानुसार  7-15 दिवसांच्या अंतराने पाठाने पाणी द्यावे.

आंतरमशागत प्रक्रिया

 • भर देणे-  लागवडीनंतर 2 वेळा म्हणजेच 30 दिवसांनी व दुसऱ्यांदा 60 दिवसांनी  हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्‍या ओळीच्‍या दोन्‍ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

तण व्यवस्थापन

लागवडीनंतर 3 दिवसांनी
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
मेट्रीब्यून्झीन (300 ग्रॅम/एकर) किंवा पेंडीमिथॅलीन (200 ग्रॅम/एकर)
लागवडीनंतर 45 दिवसांनी
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ओक्सीफ्लूरोफेन (1 लिटर/ एकर)

संजीवके

 • कंदाचे उत्पादन वाढवण्यासाठी इथेफॉन 100  ग्रॅम किंवा जिब्रालिक ऍसिड 200 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात एकत्रित करून लागवडीनंतर 30 व 70 दिवसांनी पानांवर फवारणी करावी.

किड आणि रोग व्यवस्थापन

बटाटा- जिवाणूजन्य मर
लक्षणे
रोगग्रस्त रोपं सुकतात, पानाच्या टोकापासून सुकायला सुरुवात होते पाने देठाजवळ पिवळी पडतात आणि नंतर संपूर्ण रोप सुकते आणि मरते
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
500 ग्रॅम प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
लवकर येणार करपा
लक्षणे
रोगग्रस्त पानांवर लहान गडद तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात त्यांचा कालांतराने आकार मोठा होतो, त्यामुळे पाने मरतात
पिक निविष्टा प्रमाण
क्लोरोथॅलोनील
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
पाने कुरतडणारे भुंगे
लक्षणे
पानांवर लहान छिद्र दिसतात प्रौढ किडे आणि काळे स्पॉट असलेली लाल अळी बटाट्याची पाने खाते या किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात जास्त प्रमाणात घट होते
पिक निविष्टा प्रमाण
इमिडाक्लोप्रीड
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
उशिरा येणारा करपा
लक्षणे
रोगामुळे संपूर्ण झाड सुकते, कुजते आणि खाली पडते, देठ कुजतो आणि झाड खाली पडते
पिक निविष्टा प्रमाण
क्लोरोथॅलोनील
300 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
बियाण्यामार्फत होणारे रोग
लक्षणे
बटाटे आतून काळे पडतात प्रभावित झालेले बटाटे खराब होऊ लागतात
पिक निविष्टा प्रमाण
स्ट्रेप्टोसायक्लीन
200 मिली प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
रसशोषक किडी
लक्षणे
पाने पिवळी पडतात व लहान आकाराची राहतात, पानांच्या कडा सुकतात आणि आतील बाजूस वळतात, तसेच पान देठापासून तुटते पाने लहान आकाराची राहतात
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
कापणीचा कालावधी
लागवडीनंतर 100 ते 110 दिवसांनी

उत्पादन

उत्पादन
काढलेले एकूण उत्पादन
100-180 क्विंटल प्रति एकर

2 thoughts on “Potato

 1. Pingback: Potato - BharatAgri

 2. Pingback: Potato - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *