Paddy

भात

अपेक्षा

अपेक्षित काढणी

12-16 क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

 लागवडीनंतर 160 दिवसांनी

अपेक्षित खर्च (रुपये)

14,915

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

24,000

अनुकूल हवामान

हवामान
 • या पिकाला उष्ण  आणि दमट हवामान आवश्यक असते तसेच दीर्घकाळ सूर्यप्रकाश आणि भरपूर पाणी असलेल्या भागात भाताचे पीक घेतले जाते .
 • 65 ते 75 % इतकी आर्द्रता भातासाठी चांगली असते.
तापमान
 • भात पिकाला सरासरी 21 ते  35°C तापमान आवश्यक असते 
 • जास्तीत जास्त 40 ते  42°C तापमान ते सहन करू शकते.
 • असे आढळले आहे की लागवडीच्या प्रक्रियेतील प्रत्येक अवस्थेत  वेगवेगळ्या तापमान श्रेणीची गरज असते उदा. अंकुरण (10°C), फुलोरा ( 23°C ), बहर (26-29°C), दाणे निर्मिती (21 °C)  आणि पक्वता ( 20-25 °C). 
पिकाची पाण्याची गरज
 • वाढीच्या हंगामात पुरेसा आणि योग्यप्रकारे वितरीत झालेला पाऊस जास्तीत जास्त उत्पादन आणि भाताच्या गुणवत्तेसाठी आवश्यक आहे. 
 • ज्या भागात 800 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात भात लागवड केली जाते. 

अनुकूल मृदा

प्रकार
 • सर्व प्रकारची माती आणि मध्यम क्षारांना सहन करू शकते.
सामू
 1. आम्लयुक्त ते थोडेसे आम्लारीयुक्तपर्यंत वेगवेगळ्या श्रेणीच्या सामू मध्ये भाताची लागवड केली जाते. 
 2. आवश्यक श्रेणी  5.0 ते 8.0
 3. जर सामू  < 5.0 असेल तर चुनखडी घाला.
 4. जर सामू > 8.0 असेल तर जिप्सम घाला.

लागवडीसाठी साहित्य

इंद्रायणी
कालावधी
135-140 दिवस
खास वैशिष्ट्य
लांब आणि नाजूक दाणे
उत्पादन
16-18 क्विंटल प्रति एकर
फुले मावळ
कालावधी
125-130 दिवस
खास वैशिष्ट्य
लांब आणि जाड, रूंद दाणे
उत्पादन
18-20 क्विंटल प्रति एकर
सुगंधा
कालावधी
110-115 दिवस
खास वैशिष्ट्य
लांब धान्य, सुगंध
उत्पादन
16-18 क्विंटल प्रति एकर
सह्याद्री-1
कालावधी
130-135 दिवस
खास वैशिष्ट्य
लांब आणि नाजूक दाणे असलेले जास्त उत्पादन देणारे संकरीत वाण
उत्पादन
26-28 क्विंटल प्रति एकर

रोपवाटिका तयार करणे

रोपवाटिका तयार करणे
 • 1 एकर क्षेत्रफळात पुनर्लागवड करण्यासाठी, 0.1 एकर (4 गुंठा) रोपवाटिका आवश्यक आहे 
 • 1.25 मी रूंदी आणि 10 सेमी उंची आणि आपल्या सोयीप्रमाणे लांबीचे गादी वाफे तयार करा 
 • लागवडीपूर्वी 250  किग्रॅ शेणखत, 1 किग्रॅ युरिया द्या.
रोपवाटिका कालावधी

रोपवाटिका कालावधी

 • कालावधी – 30 ते 40 दिवस 
बियाण्यांचे प्रमाण
मोठ्या बियाण्याचे वाण
22 किग्रॅ प्रति एकर
लहान बियाण्याचे वाण
16 किग्रॅ प्रति एकर
संकरीत
8 किग्रॅ प्रति एकर

बियाणे प्रक्रिया

बियाण्याला याची प्रक्रिया करा-

 • क्लोरपायरीफॉस- 4 मिली

सूचना- दोन किलो बियाण्यासाठी वरील प्रमाणात दोन लिटर पाण्यात मिसळा. बियाणे द्रावणात 10 मिनिटे बुडवा आणि नंतर सावलीत 15 मिनिटे वाळवा.

 • कार्बेन्डॅझिम – 2 ग्रॅम  

सूचना- प्रक्रिया केलेल्या बियाण्यावर पुन्हा कार्बेन्डॅझिम 2 ग्रॅम 1 किग्रॅ बियाण्यासाठी या प्रमाणात प्रक्रिया करावी. बियांवर चोळून ते बियाण्याला लावा.

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 1. नांगरणी पद्धत – मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 किंवा 2 वेळा नांगरा.
 2. खालील गोष्टी शेतात मिसळा आणि व्यवस्थित कुजण्यासाठी 10 दिवस मोकळी हवा लागू द्या –  
  1. शेणखत – 2 टन
  2. कुजवणारे जीवाणू – 2 किग्रॅ
 3. वरील मिश्रण मातीवर पसरवा आणि संपूर्ण शेतावर रोटाव्हेटर फिरवा म्हणजे जमीन नांगरल्यासारखी मऊ होईल.
 4. आवश्यक अंतरावर पुनर्लागवड करायला मदत होण्यासाठी मार्कर्स वापरा ( गाठी मारलेली दोरी)

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
0.6 फूट
दोन रोपातील अंतर
0.4 फूट
रोपांची संख्या
1,83,333
संकरीत
दोन ओळीतील अंतर
0.6 फूट
दोन रोपातील अंतर
0.6 फूट
रोपांची संख्या
1,22,222

पुनर्लागवड

 • रोपे 30 ते 40 दिवसांची झाली की पुनर्लागवड केली जाते.
 • रोपांची उंची 12 ते 15 सेमी
 • दोन रोपे एका बोदावर ठेवा आणि संकरीत भातासाठी 1 रोप एका बोदावर ठेवा.
 • रोपांची मुळे तुटू न देता एकेका रोपाची त्याला बीजकोष जोडलेला असतानाच पुनर्लागवड केली पाहिजे. रोपे मातीत खूप खोल लावू नयेत तर लागवडीसाठी आखलेल्या चौकटीत  जमिनीपासून 1-2 सेमी अंतरावर लावावीत. 
 • जलद वाढीसाठी एकेका रोपाची एल-आकारात लागवड करावी. ( आडव्या आणि उभ्या रेषांच्या छेदन बिंदूंच्यावर 1 इंच अंतरावर सुरुवात करा आणि तर्जनी वापरून हळूवारपणे खाली दाबा.  अंगठा आणि तर्जनी वापरून मातीसह रोप घेतले जाते.)

अन्नद्रव्य व्यवस्थापन

अ-संकरीत भातासाठी

एकूण गरज: 100:50:50 किग्रॅ एनपीके प्रती एकर. एनपीके किग्रॅ/एकर.

 • पेरणीच्या वेळी द्या – 109  किग्रॅ युरीया + 312 किग्रॅ एसएसपी +  83 किग्रॅ एमओपी  
 • पेरणीनंतर 30 दिवस – 54.5  किग्रॅ युरीया 
 • पेरणीनंतर 60 दिवस – 54.5  किग्रॅ युरीया 

संकरीत भातासाठी

एकूण गरज: 120:50:50 किग्रॅ एनपीके प्रती एकर. 

 • पेरणीच्या वेळी द्या – 130  किग्रॅ युरीया + 312 किग्रॅ एसएसपी +  83 किग्रॅ एमओपी  
 • पेरणीनंतर 30 दिवस – 65  किग्रॅ युरीया 
 • पेरणीनंतर 60 दिवस – 65  किग्रॅ युरीया 

सिंचन

 • पूर- शाखीय वाढीच्या अवस्थेत पाणी साचवून ठेवा.

 

आंतरमशागत प्रक्रिया

विरळणी आणि नांग्या भरणे

पेरणीनंतर 10-12 दिवस

नांग्या भरणे: जिथे बियाणे अंकुरले नसेल तिथे 

तण व्यवस्थापन 

पुनर्लागवडीनंतर तणाची वाढ कमी करण्यासाठी पाण्याची 5 ते 6 सेमी पातळी कायम ठेवा.

तण व्यवस्थापन

3-5 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
अट्राझिन (100 ग्रॅम प्रती एकर) किंवा पेंडीमेथालिन (300 ग्रॅम प्रती एकर)
45 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
2,4- डी (400 ग्रॅम प्रती एकर)

संजीवके

 1. उत्पादन वाढवण्यासाठी 1  किग्रॅ झिंक सल्फेट + 400 मिली बोरीक आम्ल प्रती एकर पेरणीनंतर 50 दिवसांनी पुनर्लागवडीनंतर फवारावे. 
 2. जास्त उत्पादनासाठी प्रारंभिक मात्रेबरोबर सिलिकॉन द्या.

किड आणि रोग व्यवस्थापन

फुलकिडे
लक्षणे
पानांवर राखाडी रंगाच्या छटा दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
गादमाशी
लक्षणे
कीड वाढणाऱ्या रोपांचा जमिनीलगतचा भाग खाते त्यामुळे कांद्याच्या पातीसारखे गोलाकार पान होते प्रभावित झालेल्या रोपांना कणसे लागत नाहीत
पिक निविष्टा प्रमाण
क्लोरपायरीफॉस
40 मिली प्रति एकर
वापर
लावणीआधी मुळे मिश्रणामध्ये बुडवून घ्या
तपकिरी स्पॉट
लक्षणे
पानांवर, दाण्यांवर तपकिरी स्पॉट दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
ट्रायकोडर्मा व्हिरीडी
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
प्रति किलो बियाण्यास चोळा
करपा
लक्षणे
संपूर्ण झाड जळल्यासारखे दिसते.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
खोड पोखरणारी अळी
लक्षणे
केंद्रीयअंकुर सुकायला सुरुवात होते.
पिक निविष्टा प्रमाण
थायोमीथाक्साम
100 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
कापणीचा कालावधी
110 ते 140 दिवस
कापणीची वेळ
दाण्याचा रंग बदलून हिरव्याचा सोनेरी होतो आणि पोत कडक होतो.
कापणी
विळ्याच्या साहाय्याने कापणी केली जाते आणि रोपे जमिनीच्या पातळीला कापली जातात

उत्पादन

उत्पादन
अ-संकरीत
12-16 क्विंटल प्रति एकर
संकरीत
25 क्विंटल प्रति एकर

2 thoughts on “Paddy

 1. Pingback: Paddy – LeanAgri

 2. Pingback: Paddy – BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *