Mango

आंबा

अपेक्षा

अपेक्षित काढणी

300-500 फळ/झाड (9 वर्षानंतर )

अपेक्षित कालावधी

30-40 वर्षे 

अपेक्षित खर्च (रुपये)

37,447 

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

1,60,000

अनुकूल हवामान

हवामान
 • अतिशय हिम असेल तर विशेषत: झाड कमी वयाचे असताना आंबा ते सहन करू शकत नाही.
 • भरपूर मोहोर येण्यासाठी मोहोरापूर्वी कोरडी हवा चांगली असते. 
 • मोहोराच्यावेळी पाऊस आला तर तो पिकासाठी घातक ठरतो कारण त्यामुळे परागीभवनात अडथळा येतो. पण फळांच्या विकासाच्या काळात आलेला पाऊस चांगला असतो मात्र जोरदार पाऊस झाल्यास त्यामुळे पिकणाऱ्या फळांचे नुकसान होते.
 • फळधारणेच्या काळात जोरदार वारे आणि वादळे यामुळे भरपूर फळे गळू शकतात. 
तापमान
 • वाढीच्या हंगामात आंब्यासाठी जास्त आर्द्रता आणि तापमान 24-30°C हे आदर्श हवामान आहे,. 
 • जास्त तापमान हे आंब्यासाठी फारसे हानिकारक नाही, पण अशा तापमानात कमी आर्द्रता आणि जास्त वारे असल्यास, त्याचा झाडावर विपरीत परिणाम होतो.
 • हिवाळ्यात सरासरी किमान तापमान 5°C पेक्षा जास्त असलेले चांगले.
 • झाडे पूर्ण बहरात असताना तापमान कमी असेल तर त्यामुळे फळे लहान येतात आणि ती पिवळी पडतात. अशाप्रकारची फळे बरीच असल्यास त्यामुळे उत्पादनात घट येते.
 • अतिशय जास्त तापमान (45°C) असलेल्या भागात आंब्याची झाडे चांगली वाढतात आणि चांगले उत्पादन देतात. पण जेव्हा तापमान 46°C च्या पुढे जाते तेव्हा शाखीय वाढ थांबते, विशेषत: अशा तापमानात कमी आर्द्रता सुद्धा असेल तर. 
पिकाची पाण्याची गरज
 • पाण्याची गरज- 900-1100 मिमी पावसाइतकी .

अनुकूल मृदा

प्रकार
 • लोम, गाळाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी, हवा खेळती असलेली आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध खोल जमीन (2-2.5 मी) आंब्याच्या लागवडीसाठी आदर्श आहे. 
 • हलक्या जमिनीत व्यवस्थित खते घातली तर लागवड करता येते. 
 • आम्लारीधर्मीय आणि क्षारयुक्त जमिनी टाळाव्यात. 
 • जमिनीत मिठाचे प्रमाण जास्त असेल तर आंबा ते सहन करू शकत नाही. 
सामू
 • आवश्यक श्रेणी- 5.5-7.5
 • जर पीएच < 5.5 असेल तर चुनखडी घाला
 • जर पीएच > 7.5 असेल तर जिप्सम घाला.

लागवडीसाठी साहित्य

अल्फान्सो (हापूस)
कालावधी
नियमित फलधारणा
खास वैशिष्ट्य
उत्कृष्ट चव, रंग आणि टिकाऊपणा, हंगामात लवकर फळे, निर्यातीसाठी अधिक चांगला, एक आड एक वर्ष फळधारणा, प्रक्रियेनंतरसुद्धा फळाचा सुगंध कायम राहतो, स्पॉन्जी टिश्यूला संवेदनशील
उत्पादन
150-250 फळे/झाड
रत्ना
कालावधी
नियमित फलधारणा
खास वैशिष्ट्य
दरवर्षी मोठी फळे येतात
उत्पादन
250-300 फळे/झाड
सिंधू
कालावधी
नियमित फलधारणा
खास वैशिष्ट्य
जास्त गर, प्रत्येक वर्षी फळधारणा, फळाच्या सालीवर आकर्षक लाल छटा, मध्यम आकाराची फळे, स्पॉन्जी टिश्यूपासून मुक्त
उत्पादन
200-250 फळे/झाड
केसर
कालावधी
नियमित फलधारणा
खास वैशिष्ट्य
जास्त उत्पादन, हापूसपेक्षा जास्त उत्पादन, खाण्यासाठी चांगला
उत्पादन
400-500 फळे/झाड
पायरी
कालावधी
एकआडएक वर्ष फळधारणा
खास वैशिष्ट्य
रसासाठी चांगला, टिकवणक्षमता कमी, एक आड एक वर्ष फळधारणा
उत्पादन
250-300 फळे/झाड
सुवर्णा
कालावधी
नियमित फलधारणा
खास वैशिष्ट्य
दरवर्षी फळधारणा होते, सारख्याच आकाराची फळे, खाण्यासाठी योग्य, लवकर परिपक्व होणारे वाण, स्पॉन्जी टिश्यूपासून मुक्त
उत्पादन
250 फळे/झाड

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 • आधीच्या पिकाचा कचरा काढून शेत स्वच्छ करा.
 • पाऊस सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात 1 x 1 x 1 मीटर आकाराचा खड्डा करा.
 • 2 टन शेणखत आणि 3 किग्रॅ विघटनकारी जीवाणू एकत्र करा आणि ते दोन्ही खड्ड्यात निम्मे निम्मे घाला. ( प्रत्येक खड्ड्यात 5 किग्रॅ)

अंतर आणि रोपांची संख्या

भारी जमीन
दोन ओळीतील अंतर
32 फूट
दोन रोपातील अंतर
32 फूट
रोपांची संख्या
40
हलकी जमीन
दोन ओळीतील अंतर
26 फूट
दोन रोपातील अंतर
26 फूट
रोपांची संख्या
62
आम्रपाली जास्त घनतेची लागवड
दोन ओळीतील अंतर
16 फूट
दोन रोपातील अंतर
16 फूट
रोपांची संख्या
250

लागवड

 • आंब्याची लागवड कोय लावून किंवा फांदी लावून करता येते.
 • सामान्यपणे कलम करण्यासारखी तंत्रे वापरून रोपांची शाखीय लागवड केली जाते.
 • पावसाळा सुरू झाल्यावर तयार कलम खड्ड्यात लावा.
 • मुख्य शेतात (खड्डा) लावण्यापूर्वी प्लास्टिकची पिशवी काढून टाका.
 • रासायनिक प्रक्रिया: रोपाचे वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी 100 ग्रॅम 2% मिथाईल पॅराथियॉन  किंवा 10% कार्बाईल पावडर मिसळून पुनर्लागवडीच्या वेळी खड्ड्यात घाला.
 • लागवडीची वेळी: जून ते सप्टेंबर

मुळे बुडवणे प्रक्रिया

 • सपाट भांड्यात 30 लिटर पाणी घ्या
 • 60 ग्रॅम कार्बेंडॅझिम + 60 मिली इमिडाक्लोप्रीड मिसळा. 
 • पुनर्लागवडीपूर्वी मुळे द्रावणात बुडवा.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • पहिले वर्ष – शेणखत – 1 किग्रॅ + 120:150:50 एन:पी:के ग्रॅम/रोप . युरिया-  260 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 920 ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 85  ग्रॅम
 • दुसरे वर्ष – शेणखत – 2 किग्रॅ + 240:300:100 एन:पी:के ग्रॅम/रोप . युरिया-  520 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 1845  ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 167 ग्रॅम
 • तिसरे वर्ष – शेणखत – 3 किग्रॅ + 360:450:150 एन:पी:के ग्रॅम/रोप . युरिया-  780 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 2767 ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 250  ग्रॅम
 • चौथे वर्ष – शेणखत – 4 किग्रॅ + 480:600:200 एन:पी:के ग्रॅम/रोप ,युरिया-  1040 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 3690  ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 334  ग्रॅम
 • पाचवे वर्ष – शेणखत – 5 किग्रॅ + 600:750:250 एन:पी:के ग्रॅम/रोप . युरिया-  1300 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 4612  ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 418  ग्रॅम
 • सहावे वर्ष – शेणखत – 6 किग्रॅ + 720:900:300 एन:पी:के ग्रॅम/रोप , युरिया-  1560 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 5535  ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 500  ग्रॅम
 • सातवे वर्ष – शेणखत – 7 किग्रॅ + 840:1050:359 एन:पी:के ग्रॅम/रोप , युरिया-  1830 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 6460  ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 600 ग्रॅम
 • आठवे वर्ष – शेणखत – 8 किग्रॅ + 960:1200:400 एन:पी:के ग्रॅम/रोप , युरिया-  2085 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 7380  ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 668  ग्रॅम
 • नववे वर्ष – शेणखत – 9 किग्रॅ + 1080:1350:450 एन:पी:के ग्रॅम/रोप , युरिया-  2345 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 8300  ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 750 ग्रॅम
 • दहावे वर्ष आणि त्यापासून पुढे – शेणखत 10 किग्रॅ + 1200:1500:500 एन:पी:के ग्रॅम/रोप , युरिया-  2600 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट – 9225  ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश- 835  ग्रॅम
 • टीप: वरील संपूर्ण शेणखत आणि एनपीकेची  निम्मी मात्रा पावसाच्या सुरुवातीला द्यावी आणि एनपीकेची उरलेली मात्रा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये द्यावी.

सिंचन

 

1 वर्ष

कोरड्या हंगामात  2-3 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

2-5 वर्षे

सिंचनातील अंतर- 4-5 दिवस.

5-8/ फळ धारणा ते परिपक्वता

दर 10-15  दिवसांनी पाणी दिले जाते

पूर्ण धारणा अवस्था

फळधारणेनंतर 2-3 वेळा पाणी

आंतरमशागत प्रक्रिया

 • उन्हाळ्यात बोर्डो पेस्ट रोपाच्या खोडाला लावून जास्त उष्णतेपासून रोपाचे संरक्षण करावे.
 • खते देण्यापूर्वी तण काढावे

तण व्यवस्थापन

लागवडीपूर्वी 10 दिवस
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ग्लायफॉस्फेट (500 मिली प्रती एकर)
लागवडीनंतर 30 दिवस
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
पॅराक्वाट(500 ग्रॅम प्रती एकर) किंवा अट्राझिन (400 ग्रॅम प्रती एकर)

संजीवके

 • फुलोऱ्याच्या वेळी फळे टिकण्यासाठी नाफथ्यालिन ऍसिटिक ऍसिड @ 20 पीपीएम फवारले जाते.
 • फेब्रुवारीमध्ये जर झाडांना मोहोर आला नाही तर फुलोऱ्याला चालना देण्यासाठी 0.5% युरीया (5 ग्रॅम/लिटर) किंवा 1% पोटॅशियम नायट्रेट (10 ग्रॅम/लिटर) फवारावे. 
 • मोहरीएवढी फळे असताना 2% पोटॅशियम नायट्रेट फवारल्यास फळधारणा वाढेल आणि फळे टिकतील.
 • फळे न येणाऱ्या झाडांना फळे न येणाऱ्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पाक्लोब्युट्राझोल  @ 10 ग्रॅम प्रती वृक्ष दिल्यास मोहोर येईल आणि फळधारणा होईल. 

किड आणि रोग व्यवस्थापन

फळसड
लक्षणे
कच्च्या फळांची टोके काळी पडतात आणि कठीण होतात
पिक निविष्टा प्रमाण
बोरॅक्स
300 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
फळ गळ
लक्षणे
अकाली फळगळ- लहान फळे खाली गळून पडतात
पिक निविष्टा प्रमाण
नॅपथॅलीन ऍसिटिक ऍसिड
300 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
फुसीरियम विल्ट आणि मर
लक्षणे
फुले वेडीवाकडी होतात आणि काळी पडतात
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
300 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
मर रोग
लक्षणे
झाडाच्या फांद्या वरून खालील बाजूस सुकायला सुरूवा होते, त्यानंतर पाने देखील सुकतात, शक्यतो जुन्या झाडांमध्ये प्रादुर्भाव दिसतो
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
450 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
लाल तांबेरा
लक्षणे
सुरुवातीच्या काळात गोल, किंचित उंच तांबेरा रोगाचे ठिपके पानांवर दिसतात, ते नंतर एकत्र येतात आणि अनियमित आकाराचे डाग पानांवर दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
बोर्डो मिक्सचर
300 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
अँथ्रॅक्नोज
लक्षणे
पानांवर अनियमित आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात नवीन फांद्या टोकापासून सुकायला सुरुवात होते मोहोरावर तसेच साठवणुकीदरम्यान फळांवर काळे डाग दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
300 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
पांढरी भुरी
लक्षणे
पानांवर तसेच सर्व भागांवर पावडर सारख्या पांढऱ्या भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो प्रभावित झालेली फुले संपूर्ण उघडत नाहीत आणि बऱ्याच वेळा अकाली खाली गळून पडतात
पिक निविष्टा प्रमाण
सल्फर
300 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
फुलकिडे
लक्षणे
प्रभावित झालेल्या पानांवर सोनेरी छटा दिसतात आणि विष्ठेचे लहान ठिपके दिसतात अळी तसेच प्रौढ कीटक पासुनच पृष्ठभाग कुरतडतात आणि पानांमधील द्रव शोषतात
पिक निविष्टा प्रमाण
थायोमीथाक्साम
300 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
पानावर जाळी करणारी अळी
लक्षणे
सुरुवातीच्या काळात अळ्या जास्त प्रमाणात पाने कुरतडून खातात नंतर त्या नवीन फांद्या आणि पानांवर एकत्रित जाळी तयार करतात आणि त्याच्या आत राहतात
पिक निविष्टा प्रमाण
क्विनालफॉस
300 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
फळ माशी
लक्षणे
फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे) प्रौढ कीटकांना आकर्षित करतात अळी फळांचा आतील भाग खाते त्यामुळे फळे सडतात
पिक निविष्टा प्रमाण
फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे)
5 सापळे प्रति एकर
वापर
शेतामध्ये लावा
आंब्यावरील मिलीबग
लक्षणे
चिकट द्रव स्रवतात ज्यामुळे विशिष्ठ प्रकारची काळी बुरशी तयार होते कीटक झाडांवर चढतात आणि मोहोरावर राहतात यामुळे फुलगळ होते आणि फळ लागणीवर परिणाम होतो
पिक निविष्टा प्रमाण
क्लोरपायरीफॉस
0.5 मिली प्रति एकर
वापर
झाडाच्या बाजूने खड्डा (रिंग) करून त्यामध्ये टाकावे
तुडतुडे
लक्षणे
किडे होल करतात ज्यामुळे चिकट द्रव स्रावाला जातो यामुळे प्रभावित झालेली पाने गुंडाळले जातात आणि सुकतात
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
450 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
काढणी अवस्था
परिपक्व-हिरवे झाल्यावर आंब्याच्या फळाची काढणी केली जाते.
काढणीचा कालावधी
एप्रिल-जून

उत्पादन

उत्पादन
5-8 वर्षाच्या झाडाला
200-300 फळे/झाड
9 वर्षाच्या झाडाला आणि त्यापुढे
300-500 फळे/झाड

2 thoughts on “Mango

 1. Pingback: Mango – LeanAgri

 2. Pingback: Mango – BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *