Maize

मका

अपेक्षा

अपेक्षित काढणी

28-40  क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर 100-120 दिवसांनी

अपेक्षित खर्च (रुपये)

26,017

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

44,200

अनुकूल हवामान

हवामान
 • मका विविध प्रकारच्या हवामान स्थितीत चांगला वाढतो.
 • हे विशेषत: उबदार हवामानातील पीक आहे.
 • पण हे पीक सर्व अवस्थांमध्ये हिमाला बळी पडते.
तापमान
 • 22-30℃ तापमानाला पीक वाढते, पण ते 35℃ इतके जास्त तापमान सुद्धा सहन करू शकते.
 • फुलोरा आणि फळधारणेच्या वेळेला जास्त पाऊस आला तर नुकसान होते.
पिकाची पाण्याची गरज
 • पाण्याची गरज- 500-800 मिमी पावसाइतकी .
 • फुलोऱ्याच्या काळात आणि दाणे भरण्याच्या काळात मातीत पुरेसा ओलावा नसेल तर उत्पादन लक्षणीयरीत्या कमी होते.

अनुकूल मृदा

प्रकार
 • या पिकाच्या लागवडीसाठी आदर्श जमीन म्हणजे सुपीक असलेली लोम आणि वालुकामय लोम जमीन.
 • रोप अवस्था क्षारतेला आणि पाणी साठण्याला जास्त बळी पडू शकते.
सामू
 • आवश्यक श्रेणी- 5.5 ते 8.0 
 • जर पीएच < 5.5 असेल तर चुनखडी घाला.
 • जर पीएच > 8.0 असेल तर जिप्सम घाला. 

लागवडीसाठी साहित्य

एनके-6240
कालावधी
खास वैशिष्ट्य
केशरी पिवळे थोडे दाबलेले ठसठशीत दाणे, उत्कृष्ट टोक
हंगाम
उत्पादन
एनके-30
कालावधी
खास वैशिष्ट्य
विषुववृत्तीय जिरायती, जास्त ताण/ दुष्काळजन्य परिस्थितीसाठी अनुकूल, गडद केशरी दाणे
हंगाम
उत्पादन
विवेक-9
कालावधी
80-90 दिवस
खास वैशिष्ट्य
कमी कालावधीचे वाण सुधारीत वाण, लायसिन आणि ट्रीप्टोफॅनने तसेच प्रो-व्हिटमिन एने समृद्ध
हंगाम
रब्बी
उत्पादन
20-28 क्विंटल प्रति एकर
संकरीत एएच 58
कालावधी
78-83 दिवस
खास वैशिष्ट्य
लवकर परिपक्व होणारे, मोठे पिवळे दाणे, उष्णतेच्या ताणाला प्रतिबंधक
हंगाम
खरीप
उत्पादन
20 क्विंटल प्रति एकर
गंगा सफेद-2
कालावधी
95-100 दिवस
खास वैशिष्ट्य
संकरीत मका, पानाखालील भूरीला मध्यम प्रतिकारक्षम ,तांबेरा, पोखर अळी आणि कणीस तुटण्याला मध्यम प्रतिकारक्षम, दाणे मध्यम गोलाकार, पांढरे आणि फ्लिंटीश दाणे
हंगाम
रब्बी
उत्पादन
20-22 क्विंटल प्रति एकर
बियाण्यांचे प्रमाण
वाण
6-8 किग्रॅ/एकर

बियाणे प्रक्रिया

बियाण्याला याची प्रक्रिया करा-

 • इमिडाक्लोप्रीड – 4 मिली

सूचना- एक किलो बियाण्यासाठी वरील प्रमाणात दोन लिटर पाण्यात मिसळा. बियाणे द्रावणात 10 मिनिटे बुडवा आणि नंतर सावलीत 15 मिनिटे वाळवा.

 • कार्बेन्डॅझिम – 2 ग्रॅम  

सूचना- प्रक्रिया केलेल्या बियाण्यावर पुन्हा 2 ग्रॅम कार्बेन्डॅझिम 1 किग्रॅ बियाण्यासाठी या प्रमाणात प्रक्रिया करावी. बियांवर चोळून ते बियाण्याला लावा.

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 • नांगरणी पद्धत – मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 किंवा 2 वेळा नांगरा.
 • खालील गोष्टी शेतात मिसळा आणि व्यवस्थित कुजण्यासाठी 10 दिवस मोकळी हवा लागू द्या –  

शेणखत – 2 टन

विघटन करणारे जीवाणू – 3 किग्रॅ

 • वरील मिश्रण मातीवर पसरवा आणि संपूर्ण शेतावर रोटाव्हेटर फिरवा म्हणजे जमीन नांगरल्यासारखी मऊ होईल.
वाफे तयार करणे
 • वाफे तयार करणे-  ट्रॅक्टरच्या मदतीने 1.5 फूट अंतरावर सरी आणि वरंबे तयार करा.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
1.5 फूट
दोन रोपातील अंतर
0.8 फूट
रोपांची संख्या
36,666

पेरणी

 • सरीच्या (ज्यात खत टाकून मातीने आच्छादित केले असेल) बाजूने 4 सेमी खोलीवर बियाणे टोकण करून लावा. 
 • वाणांचे अंकुरण कमी असण्याची शक्यता असल्यामुळे एका खड्यात 2 बिया लावा. 

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • एकूण आवश्यकता: 16:24:16 किग्रॅ एनपीके/एकर 
 • पेरणीच्या वेळी द्या-  युरीया- 35 किग्रॅ, सिंगल सुपर फॉस्फेट – 150 किग्रॅ, म्युरेट ऑफ पोटॅश- 27 किग्रॅ
 • पेरणीनंतर 30 दिवस –युरीया- 35 किग्रॅ
 • पेरणीनंतर 45 दिवस- युरीया- 35 किग्रॅ

सिंचन

 • वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था – फुलोरा आणि कणीस विकास अवस्था
 • पाटपाणी-  पेरणीनंतर पहिले सिंचन, दुसरे सिंचन पेरणीला 3 दिवस झाल्यावर आणि त्या पुढचे एका आठवड्याच्या अंतराने

आंतरमशागत प्रक्रिया

 1. विरळणी: जर दोन बिया लावल्या असतील, तर प्रत्येक छिद्रातील फक्त एक निरोगी आणि जोमदार रोप ठेवा आणि दुसरे काढून टाका. 
 2. नांग्या भरणे: जिथे रोपे उगवली नसतील तिथे प्रत्येक छिद्रात 2 बी या प्रमाणात बियाणे टोका आणि लगेचच पाणी द्या.

तण व्यवस्थापन

पेरणीनंतर 3 दिवस
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
अट्राझिन (100 ग्रॅम प्रती एकर) किंवा पेंडीमेथालिन (1 लिटर प्रती एकर)
पेरणीनंतर 30 दिवस
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऑक्झीफ्लुरोफेन (100 ग्रॅम प्रती एकर)

किड आणि रोग व्यवस्थापन

पानावरील करपा
लक्षणे
पानाच्या मार्जिनला तपकिरी स्पॉट दिसतात प्रभावित झालेल्या पानांवर आणि टर्फ्लावर स्पॉट दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
सूत्रकृमि
लक्षणे
झाडाची वाढ खुंटते, अनियमित वाढ, पाने पिवळी पडतात आणि कणसाचा आकार लहान राहतो
पिक निविष्टा प्रमाण
नीम केक
100 किलो प्रति एकर
वापर
मिक्स करून मातीवर पसरवून टाका
Corn borer pest
मका खाणारी अळी
लक्षणे
फळांवर लहान छिद्रे दिसतात नोडस् जवळ स्टेम वर दृश्यमान भोक राहील
पिक निविष्टा प्रमाण
मॅलाथिऑन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
तांबेरा
लक्षणे
पिकाच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागावर विखुरलेले गडद, लालसर तपकिरी रंगाचे स्पॉट विकसित होतात,हा रोग सहज ओळखला जाऊ शकतो.
पिक निविष्टा प्रमाण
क्लोरोथॅलोनील
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
खोड पोखरणारी अळी
लक्षणे
पानांवर लहान छिद्रे दिसून येतात, पाने कुरतडल्यासारखी दिसतात आणि खोडामध्ये हिरवी अळी दिसते
पिक निविष्टा प्रमाण
स्पिनोसॅड
100 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
डाऊनी मिल्डयू
लक्षणे
झाडांमधे मर होते पाने चुरगळतात त्यावर पिवळसर डाग आणि पांढऱ्या रेषा दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
फॉस्टल-अल
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
मर रोग
लक्षणे
पातीची टोके पूर्ण वाळतात, पात पिवळी पडते व मान टाकते जसे रोग वाढतो तसतसे लहान पाने देखील प्रभावित होतील आणि शेवटी वनस्पती मरतात.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
2 ग्रॅम प्रति एकर
वापर
बीजप्रक्रिया
Armyworm symptoms and cure
लष्करी अळी
लक्षणे
पानांमध्ये शेध झालेले दिसतील.
पिक निविष्टा प्रमाण
स्पिनेटोरॅम
80 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
कापणी अवस्था
जेव्हा काड्या आणि पाने काहीशी हिरवी असतात पण बीचे बाहेरचे आवरण वाळते आणि तपकिरी होते तेव्हा मका कापणीसाठी तयार असतो.
कापणीची वेळ
पेरणीनंतर 70-105 दिवस

उत्पादन

उत्पादन
खरीप
28-30 क्विंटल प्रति एकर
रब्बी
38-40 क्विंटल प्रति एकर

3 thoughts on “Maize

 1. Pingback: Maize – LeanAgri

 2. Pingback: Maize Crop: This advance technique of maize cultivation will boost your profits - BharatAgri

 3. Pingback: Maize Crop: Advance technique of maize cultivation for high profit - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *