Groundnut

भुईमुग

अपेक्षा

अपेक्षित काढणी

8-12 क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर 110-120 दिवसांनी

अपेक्षित खर्च (रुपये)

27,073

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

50,000

अनुकूल हवामान

हवामान
 • उबदार आणि दमट हवामान अतिशय अनुकूल आहे.
 • थंड आणि ओले हवामान असेल तर अंकुरण आणि रोपांची उगवण सावकाश होते, त्यामुळे बियाणे कुजण्याचा आणि रोपाला रोग होण्याचा धोका वाढतो.
तापमान
 • सर्वांत जलद अंकुरणासाठी आणि रोपाच्या वाढीसाठी इष्टतम तापमान सुमारे 30°C असते.
 • 35°C पेक्षा जास्त तापमान भुईमुगाच्या वाढीला प्रतिबंध करते.
 • पेरणीच्या वेळी असलेले कमी तापमान अंकुरणाला विलंब करते आणि बियाणे तसेच रोपांना होणाऱ्या रोगांमध्ये वाढ करते.
 • परिपक्वतेच्या काळात याला सुमारे एक महिनाभर उबदार आणि कोरडे हवामान आवश्यक असते.
पिकाची पाण्याची गरज
 • जास्तीत जास्त उत्पादनासाठी आणि भुईमुगाच्या दर्जासाठी फुलोरा, आऱ्या सुटण्याची अवस्था आणि शेंगा तयार होण्याची अवस्था या सर्वांत महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. 
 • पाण्याची गरज- 600-1500 मिमी पावसाइतकी .

अनुकूल मृदा

प्रकार
 • चांगला निचरा होणारी, फिकट रंगाची, भुसभुशीत वालुकामय चिकणमाती ते वालुकामय चिकणमाती.
सामू
 • आवश्यक श्रेणी  5.5 ते 7.0
 • जर पीएच < 5.5 असेल तर चुनखडी घाला
 • जर पीएच > 7.0 असेल तर जिप्सम घाला.
 • तीव्र आम्ल असलेल्या आणि तीव्र आम्लारी असलेल्या जमिनी भुईमुगाच्या उत्पादनासाठी योग्य नाहीत.

लागवडीसाठी साहित्य

फुले प्रगती
कालावधी
85-90 दिवस
खास वैशिष्ट्य
लवकर येणारी, जास्त न पसरणाऱ्या प्रकारची (उपटी)
हंगाम
खरीप
उत्पादन
7-8 क्विंटल प्रति एकर
विक्रम( टीजी 1)
कालावधी
90-100 दिवस
खास वैशिष्ट्य
मध्यम पसरणाऱ्या प्रकारची
हंगाम
उन्हाळी
उत्पादन
8-9 क्विंटल प्रति एकर
फुले उन्नती
कालावधी
115 दिवस
खास वैशिष्ट्य
जास्त उत्पादन
हंगाम
खरीप, उन्हाळी
उत्पादन
9 क्विंटल प्रति एकर
कोकण गौरव
कालावधी
105-120 दिवस
खास वैशिष्ट्य
मध्यम पसरणाऱ्या प्रकारची
हंगाम
खरीप, उन्हाळी
उत्पादन
7-8 क्विंटल प्रति एकर
कोकण तापोरा
कालावधी
115-120 दिवस
खास वैशिष्ट्य
मोठे दाणे
हंगाम
रब्बी
उत्पादन
8-8.8 क्विंटल प्रति एकर
बियाण्यांचे प्रमाण
वाण
50 किग्रॅ/एकर
संकरीत
40 किग्रॅ/एकर

बियाणे प्रक्रिया

बियाण्याला याची प्रक्रिया करा-

 • इमिडाक्लोप्रीड – 2 मिली

सूचना- एक किलो बियाण्यासाठी वरील प्रमाण दोन लिटर पाण्यात मिसळा. बियाणे द्रावणात 10 मिनिटे बुडवा आणि नंतर सावलीत 15 मिनिटे वाळवा.

 • कार्बेन्डॅझिम – 2 ग्रॅम  

सूचना- प्रक्रिया केलेल्या बियाण्यावर पुन्हा कार्बेन्डॅझिम 2 ग्रॅम 1 किग्रॅ बियाण्यासाठी या प्रमाणात प्रक्रिया करावी. बियांवर चोळून ते बियाण्याला लावा.

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 1. नांगरणी पद्धत – मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 किंवा 2 वेळा नांगरा.
 2. खालील गोष्टी शेतात मिसळा आणि व्यवस्थित कुजण्यासाठी 10 दिवस मोकळी हवा लागू द्या –  

शेणखत – 2 टन

विघटन करणारे जीवाणू – 3 किग्रॅ

 1. वरील मिश्रण मातीवर पसरवा आणि संपूर्ण शेतावर रोटाव्हेटर फिरवा म्हणजे जमीन नांगरल्यासारखी मऊ होईल.
वाफे तयार करणे
 1. वाफे तयार करणे- ट्रॅक्टरच्या मदतीने 1 फूट किंवा 1.5 फूट अंतरावर सरी आणि वरंबे तयार करा.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
1 फूट
दोन रोपातील अंतर
0.5 फूट
रोपांची संख्या
1,12,820
संकरीत
दोन ओळीतील अंतर
1.4 फूट
दोन रोपातील अंतर
0.3 फूट
रोपांची संख्या
1,04,761

पेरणी

 • पेरणीपूर्वी एका आठवडा आधी शेंगा सोलाव्यात. मध्यम आकाराचे दाणे पेरणीसाठी वापरावेत.
 • सरीच्या बाजूने 4-5 सेमी खोलीवर बैलाच्या पाभरीच्या साहाय्याने किंवा हाताने दाणे टोकावेत. 
 • मानवी पद्धतीने बियाणे कमी लागेल आणि अंकुरण सुद्धा अधिक चांगले होईल.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • 10:20:00 एनपीके किग्रॅ/एकर. 
 • पेरणीच्या वेळी द्या-  युरिया- 22 किग्रॅ  , सिंगल सुपर फॉस्फेट- 123 किग्रॅ  ,जिप्सम- 80 किग्रॅ   
 • पेरणीनंतर 45 दिवस- जिप्सम-80 किग्रॅ  ( उत्पादन सुधारण्यासाठी जिप्सम घातले जाते).

सिंचन

 • पूर- 8-10 दिवस अंतर
 • उन्हाळी हंगाम – 5-6 दिवस अंतर
 • पहिले सिंचन पेरणीनंतर 4-5 दिवसांनी केले पाहिजे.
 • सिंचनासाठी महत्त्वाच्या अवस्था-
 • फुलोरा अवस्था (20-30 दिवस)
 • आऱ्या सुटणे (40-45 दिवस)
 • शेंगा विकसित होणे अवस्था (65-70 दिवस) 

आंतरमशागत प्रक्रिया

 1. नांग्या भरणे-  पेरणीनंतर 10-12 दिवसांनी जिथे रोपे उगवली नसतील तिथे प्रत्येक छिद्रात 1 बी याप्रमाणात बियाणे टोका आणि लगेचच पाणी द्या.
 2. मातीची भर देणे- पेरणीनंतर 40-45 दिवसांनी मातीची भर दिली जाते. त्यामुळे आऱ्या मातीत घुसण्यासाठी मदत होते आणि शेंगाचा विकास जास्त होण्यासाठी सुद्धा मदत होते. 

तण व्यवस्थापन

लागवडीनंतर 3 दिवसांनी
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
अट्राझिन (100 ग्रॅम/एकर ) किंवा पेंडीमेथालिन (400 ग्रॅम/एकर)
लागवडीनंतर 45 दिवसांनी
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
इमेझथेपीर (100 ग्रॅम/एकर) किंवा क्विझालोफॉप इथाईल (100 ग्रॅम/एकर)

संजीवके

 • फुलोरा आणि उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीनंतर 30 आणि 60 दिवसांनी  ट्रायकोनँटॅनोल @ 1.25 मिली प्रती एक लिटर या प्रमाणे फवारणी करावी .

किड आणि रोग व्यवस्थापन

White grub pest
हुमणी
लक्षणे
पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. मुळांना नुकसान पोचवतात. झाडांची पाने वाळायला सुरुवात होते.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बोफ्युरान
5 किलो प्रति एकर
वापर
मिक्स करून मातीवर पसरवून टाका
बियाणांमार्फत होणारे रोग
लक्षणे
बियाण्याची कमी उगवण किंवा बियाणे उगवून येत नाही
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
40 ग्रॅम प्रति एकर
वापर
प्रति किलो बियाण्यास चोळा
Groundnut rust
लक्षणे
पानाच्या खालील बाजूस नारंगी रंगाचे ठिपके दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
मर
लक्षणे
संसर्ग झालेली पाने मुळांपासून सहज ओढली जाऊ शकतात. सुरुवातीच्या काळात,खोडावर लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
मेटॅलिक्सिल
500 मिली प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
घाटेअळी (शेंगा पोखरणारी अळी)
लक्षणे
ह्या अळ्या फुले व कळ्या खातात
पिक निविष्टा प्रमाण
इंडोक्साकार्ब +नोवलूरॉन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
टिक्का रोग
लक्षणे
पानाच्या वरील बाजूस गडद तपकिरी रंगाचे पिवळी कडा असलेले ठिपके दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
पाने खाणारी अळी
लक्षणे
अळी पाने पोखरते, आतील रस शोषते आणि पानांवर लहान तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात
पिक निविष्टा प्रमाण
लेम्बडा- सायहॅलोथ्रीन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

कापणी

कापणीचा कालावधी
काढणीची वेळ
पेरणीनंतर 110-120 दिवस
काढणीची वेळ
परिपक्वतेच्या खुणा- जेव्हा पाने पिवळी पडतात, शेंगाचे बाह्य आवरण कडक होते तेव्हा.
काढणीची पद्धत
भुईमुगाचे पीक शेंगा खणून किंवा शेतातून रोपे उपटून काढले जाते.

उत्पादन

उत्पादन
खरीप
7- 8 क्विंटल प्रति एकर
उन्हाळी
10-12 क्विंटल प्रति एकर

2 thoughts on “Groundnut

 1. Pingback: Groundnut – LeanAgri

 2. Pingback: Groundnut – BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *