Ginger

How to do ginger farming

अदरक/आले

अपेक्षा

अपेक्षित काढणी

60-80 क्विंटल प्रति एकर 

अपेक्षित कालावधी

लागवडीच्या 250-260 दिवसानंतर 

अपेक्षित खर्च (रुपये)

60,000

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

2,10,000

अनुकूल हवामान

हवामान
 • आले ह्या पिकास उष्ण व दमट हवामान मानवते. 
 • थंड व कोरडे हवामान जमिनीतील कंद उत्तम प्रकारे पोसण्यासाठी अनुकूल असते.
तापमान
 • आले ह्या पिकाच्या उगवणीसाठी 19-28°C तापमानाची आवश्यकता असते.
पिकाची पाण्याची गरज
 • 1000-1200 मिमी दरम्यान वार्षिक पाऊस असलेल्या भागात आले चांगल्याप्रकारे वाढते.

अनुकूल मृदा

प्रकार
 •  वाळूयुक्त ते गाळवट चिकन माती व उत्तम निचरा होणारी माती निवडावी. सेंद्रिय घटकाचे प्रमाण जास्त असलेल्या मातीची निवड करावी. 
 • पिकात पाणी साठून राहणे ह्या पिकास नुकसानकारक असते.
सामू
 • आवश्यक सामू- 6.0-6.5
 • जास्त क्षारयुक्त माती मध्ये आल्याचे पीक घेतले जात नाही. 
 • सामू 6.0 पेक्षा कमी असल्यास मातीत चुनखडी टाकावी. 
 • सामू 6.5 पेक्षा जास्त असल्यास मातीत जिप्सम टाकावे.

लागवडीसाठी साहित्य

आय.आय.एस.आर. - वरदा
कालावधी
200
खास वैशिष्ट्य
उत्तम प्रतीचे वाण , अधिक उत्‍पादन, साठवणुक केलेल्या सुक्या आल्यावर किडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो.
उत्पादन
88 क्विंटल प्रति एकर
आय.आय.एस.आर. - महिमा
कालावधी
200
खास वैशिष्ट्य
गड्डे जाड व उत्तम तंतूचे प्रमाण, सूत्रकृमींना प्रतिकार करते.
उत्पादन
89 क्विंटल प्रति एकर
आय.आय.एस.आर. - रीजाथा
कालावधी
200
खास वैशिष्ट्य
गड्डे जाड व गोलाकार व जास्त प्रमाणात असतात.
उत्पादन
89 क्विंटल प्रति एकर

बियाणे

 • 600-700 किलो/एकर 
 • पेरणीसाठी कंद वापरले जाते. 
 • योग्यरीत्या साठवलेले व चांगल्या प्रतीचे निरोगी कंदाचे 2.5-5.0 सेमी लांबी व अंदाजे 20-25 ग्रॅम वजनाचे व प्रत्येकी 1-2 डोळे असलेले लहान तुकडे कापून घ्यावे.

बियाणे प्रक्रिया

 • मॅंकोझेब 3 मिली + डायमेथोएट 2 मिली प्रत्येकी 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचे द्रावण बीजप्रक्रियेसाठी वापरावे.
 • त्याचप्रमाणे 800 किलो बेण्यासाठी 200 लिटर पाण्याचे द्रावण मोठ्या भांड्यात तयार करून घ्यावे.
 • बियाणे 15-20 मिनिटे द्रावणात बुडवून ठेवावे.
 • बीजप्रक्रियेनंतर बेणे 3-4 तासांसाठी सावलीत वाळवावे.

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

 • नांगरणीची पध्दत– मातीच्या प्रकारानुसार जमीन 1-2 वेळा नांगरून घ्यावी.
 • खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन 10 दिवस खुली ठेवावी .

                शेणखत- 4 टन

                कम्पोस्टिंग बॅक्टरीया- 3 किलो 

 • वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर फिरवावे व माती भुसभुशीत करून घ्यावी.
वाफे तयार करणे
 • गादी वाफा तयार करण्यासाठी-  1 मीटर रूंदीचा व 30 सेमी उंचीचा गादी वाफा तयार करावा व दोन गादी वाफ्यांमध्ये 50 सेंमीचे अंतर ठेवावे.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
0.8 फूट
दोन रोपातील अंतर
0.6 फूट
रोपांची संख्या
91,666

पेरणी

 • पेरणीची वेळ:
 • मे च्या पहिल्या आठवड्यात (कोरडवाहू क्षेत्रासाठी)
 • फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते मार्चपर्यंत (ओलिताखालील क्षेत्रासाठी)
 • पेरणीची पद्धत – गादी वाफ्यावर 0.6 फूट अंतराने छोटे खड्डे तयार करून घ्यावेत व प्रत्येक खड्यात बेणे 4-5 सेमी खोल लावून ते मातीने झाकावे.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • 48:30:30 एन:पी:के किलो प्रति एकर
 • लागवड  करतेवेळी 

                सिंगल सुपर फॉस्फेट- 185 किलो

                म्युरेट ऑफ पोटॅश- 50 किलो  

 • लागवडीनंतर 45 दिवसांनी

               युरिया- 35 किलो 

 • लागवडीनंतर 75 दिवसांनी

               युरिया- 35 किलो 

 • लागवडीनंतर 105 दिवसांनी

               युरिया- 35 किलो 

सिंचन

            सिंचनसाठी महत्वाचे कालावधी-

 • कंद उगवणीचा कालावधी
 • फुटवे फुटण्याचा कालावधी (लागवडीनंतर 90 दिवसांनी )
 • कंद वाढीचा कालावधी (लागवडीनंतर 135 दिवसांनी).
 • पाटाने पाणी देणे – 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाटाने पाणी द्यावे. (पावसावर अवलंबून)
 • ठिबक सिंचनएक दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. (पावसावर अवलंबून)

आंतरमशागत प्रक्रिया

 • नांग्या भरणे जिथे  बीजांकुरण झालेले नसेल त्या ठिकाणी लागवडीनंतर 20 दिवसांनी परत बेणे लावावे.
 • मल्चिंग– लागवडीनंतर लगेच 4.5 टन प्रति एकर याप्रमाणे शेत हिरव्या पालापाचोळाने झाकून टाकावे. लागवडीनंतर पुन्हा 50 आणि 100 दिवसांनी मल्चिंग करावे.
 • भर टाकणे– लागवडीनंतर 2 वेळा म्हणजेच  पहिल्यांदा 45 दिवसांनी व दुसऱ्यांदा 90 दिवसांनी  हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्‍या ओळीच्‍या दोन्‍ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

तण व्यवस्थापन

सूचना  – पानांवर तणनाशक योग्यरीत्या पसरण्यासाठी त्यात स्टिकर टाकावे.

3 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऍट्राझीन
तणनाशकाचे प्रमाण
200 ग्रॅम प्रति एकर
30 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऑक्सिफ्लूरोफेन
तणनाशकाचे प्रमाण
100 ग्रॅम प्रति एकर

किड आणि रोग व्यवस्थापन

पाने गुंडाळणारी अळी
लक्षणे
अळी पाने कुरतडते व त्यामुळे पाने गुंडाळली जातात.
पिक निविष्टा प्रमाण
लेम्बडा- सायहॅलोथ्रीन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
Rhizome scale in ginger farming
खवले कीड
लक्षणे
गड्ड्याना जास्त प्रादुर्भाव होतो तेव्हा ते वाळतात व अंकुचन पावतात.
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
250 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
Ginger shoot borer
खोड पोखरणारी अळी
लक्षणे
झाडाच्या खोडांवर शेध होतात ज्यामधून द्रव्य शोषण होते.
पिक निविष्टा प्रमाण
नीम तेल
600 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
seed borne diseases of ginger
बियाणांमार्फत होणारे रोग
लक्षणे
उशिरा उगवण होते किंवा होत नाही.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम + इमिडाक्लोप्रिड
400 ग्रॅम + 400 मिली प्रति एकर बियाण्यांसाठी
वापर
बीजप्रक्रिया
White grub pest
हुमणी
लक्षणे
हुमणी मुळे झाडे कमजोर होतात व सहज मुळांपासून ओढली जाऊ शकतात.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बोफ्युरान
5 किलो ग्रॅम प्रति एकर
वापर
मिक्स करून मातीवर पसरवून टाका.
leaf spot disease in ginger farming
पानांवरील ठिपके
लक्षणे
पानांवर तपकिरी रंगाचे स्पॉट दिसतात आणि त्यांचा मध्य भाग राखाडी रंगाचा असतो. संसर्ग झालेली पाने गळून पडतात ज्यामुळे झाडाला फळे येण्याचे प्रमाण कमी होते.
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
500 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
बॅक्टरील विल्ट
लक्षणे
पाने कोमेजून जातात. फळे वेळेआधी पिकतात आणि मग पिवळसर होतात. हा रोग जास्त तापमान असेल तेव्हा आढळतो तसेच Ph जास्त असलेल्या जागेत देखील आढळतो.
पिक निविष्टा प्रमाण
स्ट्रेप्टोसायक्लीन
0.5 किलोग्रॅम प्रति एकर
वापर
प्रति किलो बियाण्यास चोळा.
rhizome rot disease
कंदकुज (मुळकूज)
लक्षणे
रायझोम कुजतात.
पिक निविष्टा प्रमाण
सुडोमोनास फ्लुरोसन्स
1 किलोग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यासोबत ठिबक सिंचनाने घालावे.

कापणी

 • काढणीच्या 20 दिवसआधी पिकाला पाणी देणे बंद करावे. 
 • लागवडीनंतर 250-260 दिवसांनी (जातीवर अवलंबून)
 • आले काढणी योग्य वेळ म्हणजे पाने पिवळी पडून वाळू लागतात.
 • कुदळीने खोदून आल्याच्या गड्डयांची काढणी करतात काढणीनंतर कंद 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. 
 • काढणीनंतर 2-3 दिवस आले सावलीत वाळवावे.

उत्पादन

उत्पादन
काढलेले एकूण उत्पादन
60-80 क्विंटल प्रति एकर

3 thoughts on “Ginger

 1. Pingback: Ginger - BharatAgri

 2. Pingback: Ginger Farming: Complete guide on growing ginger - BharatAgri

 3. Pingback: अदरक की खेती: आधुनिक विधि से प्रति एकर ज़्यादा उपज लें - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *