Cotton

कापूस

अपेक्षा

अपेक्षित काढणी

१०-१२ क्विंट्टल प्रति एकर 

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर १३०-१८० दिवसानंतर 

अपेक्षित खर्च (रुपये)

४०,५५८ 

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

८६,३३०

अनुकूल हवामान

हवामान
 • जेथे कोठे ही कमीतकमी 180-200 दंव विरहित दिवस असतील त्या ठिकाणी कापसाचे पीक घेतले जाऊ शकते.
 • तापमानात उच्च आर्द्रता असल्यास कापसाचे पीक कुजते. 
 • प्रकाशाच्या उच्च तीव्रतेमुळे कापसाच्या रंगावर परिणाम  होतो.
तापमान
 • कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी 20-30°C इतक्या तापमानाची आवश्यकता असते. जर तापमान 18°C पेक्षा कमी असल्यास बियाणाची उगवण उशिरा होते.
 • मातीत पुरेसा ओलावा असल्यास, कापसाचे पीक  43-45°C उच्च तापमान थोड्या कालावधीसाठी  सहन करू शकते.
 •  
पिकाची पाण्याची गरज
 • मूलतः कापूस हे खरीप पीक आहे, परंतु रोप वाढीच्या काळात मध्यम स्वरूचा पाऊस चांगला असतो आणि नंतरच्या काळात जोरदार पावसामुळे कापसच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
 • पाण्याची गरज – कापसाच्या पिकाला 650-750 मिमी पावसाएवढ्या पाण्याची गरज असते.

अनुकूल मृदा

प्रकार
 • काळी कसदार माती व पाणी धरून ठेवणारी माती निवडावी.
 • मातीत जास्त प्रमाणात ओलावा व जमीन पाणथळ असल्यास त्याचा कापसाच्या पिकावर परिणाम होतो.
सामू
 • आवश्यक सामू – 7.0-8.5
 • जर सामू 7.0 पेक्षा कमी असल्यास तर मातीत चुनखडी टाकावी. 
 •  जर सामू 8.5 पेक्षा जास्त  असल्यास तर मातीत जिप्सम टाकावे. 

एकरी बियाणे

 • वाण: 4-5 किलो  प्रति एकर 
 • संकरित वाण: 800-900  ग्रॅम प्रति एकर 
 • (बियाणाची उगवण क्षमता कमी असल्यामुळे एकरी बियाणांचे प्रमाण जास्त टाकावे).

बियाणे प्रक्रिया

 • इमिडाक्लोप्रिड – 4 मिली
 • सूचना  – वरील घटक प्रति १ किलो बियाणे याप्रमाणे २ लिटर पाण्यात मिसळुन तयार झालेल्या द्रावणात बियाणे 10 मिनिटासाठी बुडवावेत व नंतर 15 मिनिटासाठी सावलीत वाळवावेत.
 • कार्बेन्डाझिम  – 2 ग्रॅम
 • सूचना – वरील बीजप्रक्रिया केलेले बियाणे परत  2 ग्रॅम कार्बेन्डाझिम  प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे बियाणांना चोळावे. 

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 • नांगरणीची पध्दत –  मातीच्या प्रकारानुसार जमीन १ ते २ वेळा नांगरून घ्यावी.
 • खालील खते जमिनीत मिसळून त्याचे जमिनीत योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन १० दिवस खुली ठेवावी – 
  1. शेणखत – 2 टन
  2. कम्पोस्टिंग बॅक्टरीया – 3 किलो 
 • वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर फिरवावे व माती भुसभुशीत करून घ्यावी.
वाफे तयार करणे
 • गादी वाफा तयार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने 90 सेमी च्या अंतराने सरीवरंबा तयार करून घ्याव्यात.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
2.9 फूट
दोन रोपातील अंतर
1.9 फूट
रोपांची संख्या
7,985
संकरीत
दोन ओळीतील अंतर
2.9 फूट
दोन रोपातील अंतर
2.9 फूट
रोपांची संख्या
5,231

पेरणी

 • पेरणीची वेळ: एप्रिल ते मे च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 
 • सरींवर २-३ सेमी च्या अंतराने बियाणांची लागवड करावी व नंतर ते मातीने झाकावे. 

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • वाण  (प्रति एकर)- खतांची मात्रा-  प्रति एकर 20किलो नत्र, 10 किलो स्फुरद व 10 किलो पालाश द्यावे.
 • लागवड करतेवेळी-
 • युरिया- 22 किलो 
 • सिंगल सुपर फॉस्फेट- 62 किलो
 • म्यूरेट ऑफ़ पोटॅश- 17 किलो  
 • लागवडीनंतर 30 दिवसांनी
 • युरिया- 11 किलो 
 • लागवडीनंतर 45 दिवसांनी
 • युरिया- 11 किलो
 • संकरित वाण (प्रति एकर)– खतांची मात्रा- प्रति एकर 32 किलो नत्र, 16 किलो स्फुरद व 16 किलो पालाश द्यावे. 
 • लागवड  करतेवेळी-
 • युरिया- 35 किलो 
 • सिंगल सुपर फॉस्फेट- 99 किलो
 • म्यूरेट ऑफ़ पोटॅश- 27 किलो
 • लागवडीनंतर 30 दिवसांनी
 • युरिया- 17 किलो
 • लागवडीनंतर 45 दिवसांनी
 • युरिया- 17 किलो

सिंचन

 • 10-12  दिवसांच्या अंतराने पाटाने पाणी द्यावे (पावसावर अवलंबून)
 • फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात वेळच्या वेळी देणे जरुरीचे आहे (पावसावर अवलंबून

आंतरमशागत प्रक्रिया

 • नांग्या भरणे लागवडीनंतर 10 दिवसांनी  जेथे बियाणांची उगवण झालेली नाही त्याठिकाणी बियाणे लावावे. 

 • रोपे  15 x 10 सेमी च्या  पॉलीथिन पिशवीत वाढवावीत .

 • पॉलीथिन पिशवी शेणखत व माती यांचे मिश्रण 1:3 या प्रमाणात भरावे .

 • माती मध्ये बियाणांची लागवड करते दिवशीच पॉलीथिन पिशवीत टोकन पध्दतीने बियाणांची लागवड करावी. 

 • रोपाला नियमित पाणी  द्यावे व योग्यरीत्या काळजी घ्यावी. 

 • लागवडीनंतर १० दिवसांनी पॉलीथिन पिशवीतील रोपटे मातीत बियाणे उगवून आले नाहीत त्या ठिकाणी  रोप लावावे.

 • विरळणी- लागवडीनंतर 30 दिवसांनी एका सरीवर 1 रोप ठेवावे . 

 • लागवडी नंतर ९० दिवसांनी झाडाचे शेंडे कापावे ज्याने झाडाची होणारी अनावश्यक वाढ थांबते व बोंड्याची योग्यरीत्या वाढ होते.

तण व्यवस्थापन

3 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऍट्राझीन किंवा पेंडीमिथॅलीन
तणनाशकाचे प्रमाण
200 ग्रॅम प्रति एकर 600 मिली प्रति एकर
30 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ओक्सीफ्लूरोफेन किंवा क्वीझालोफोप इथील
तणनाशकाचे प्रमाण
200 मिली प्रति एकर 400 मिली प्रति एकर

संजीवके

 • फुलांची व बोंडाची गळ थांबण्यासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड 40 मिली प्रति 200 लिटर पाण्यात मिसळवून ह्या मिश्रणाची फवारणी फुले येण्याच्या वेळी करावी.
 • दुसरी फवारणी त्यानंतर 15 – 20 दिवसांनी करावी.

किड आणि रोग व्यवस्थापन

verticillium wilt in cotton
मर
लक्षणे
पाने पिवळी पडतात आणि चुरघरल्यासारखी होतात. पाने मार्जिनला व नसांजवळ वाळतात. संसर्ग झालेल्या झाडाची फांदी गुलाबी रंगाचे होते.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
250 ग्राम प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा
Thrips and jassids in cotton farming
तुडतुडे, मावा,फुलकिडे, पांढरी माशी
लक्षणे
"तुडतुडे- पानाच्या खालील बाजूस चमक दिसते. मावा- पाने दुमडतात आणि आतील बाजूस वळतात. काळ्या रंगाची बुरशी तयार होते ज्यामुळे झाड काळे दिसू लागते. फुलकिडे- ह्या रोगाची लक्षणे देखील तुडतुडे, फुलकिडे इत्यादी सारखे दिसतात. पांढरी माशी- पाने पिवळी पडतात आणि मार्जिन पॅरेण्ट पसरतात."
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
250 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
cotton crop diseases - Spodoptera
पाने कुरतडणारी अळी
लक्षणे
कटवर्म- पाने चुरघरल्यासारखी होतात आणि हि अली संपूर्ण पण खाते ज्यामुळे फक्त नसा राहतात. जास्त प्रभाव झाला असेल तेव्हा शेतामध्ये फक्त खोड राहतात ज्यांना पाने किंवा बोन्डे नसतात. अळ्या लहान लहान छिद्र बनवतात.
पिक निविष्टा प्रमाण
क्लोरँट्रेनिलिप्रोल
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Pink bollworm
गुलाबी बोण्ड अळी
लक्षणे
अळ्या फुलांमधील काही भाग खातात. ह्यामुळे खराब झालेले बोन्डे गळून पडतात. कापसाची क्वालिटी आणि तेलाचे प्रमाण कमी होते.
पिक निविष्टा प्रमाण
फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे)
5 नग
वापर
शेतामध्ये लावा
Spotted Bollworm
ठिपक्यांची बोण्ड अळी
लक्षणे
सुरवातीला संसर्ग झालेले देठ वाळतात व गळून पडतात. संसर्ग झालेले बोन्डे वेळेआधीच उघडतात आणि कापसाचा दर्जा खराब होतो.
पिक निविष्टा प्रमाण
ट्रायको कार्ड्स
5 नग
वापर
शेतामध्ये लावा
Pink bollworm
बोण्ड अळी कॉम्प्लेक्स
लक्षणे
"अमेरिकन बॉलवर्म- कापसावर छिद्र होतात. अळी बोंड्याच्या आतमध्ये शिरते. बोंड्याच्या बाहेरील बाजूस छिद्र दिसतात. ह्यामुळे जास्त प्रमाणात पाने खराब होतात. पिंक बॉलवर्म- आल्या फुलांमधील काही भाग खातात. ह्यामुळे खराब झालेले बोन्डे गाळून पडतात. कापसाची क्वालिटी आणि तेलाचे प्रमाण कमी होते. स्पॉटेड बॉलवर्म- सुरवातीला संसर्ग झालेले देठ वाळतात व गळून पडतात. संसर्ग झालेले बोन्डे वेळेआधीच उघडतात आणि कापसाचा दर्जा खराब होतो."
पिक निविष्टा प्रमाण
बॅसिलस थुरिंजेन्सीस
450 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
American bollworm in cotton farming
अमेरिकन बॉलवर्म
लक्षणे
कापसावर छिद्र होतात. अळी बोंड्याच्या आतमध्ये शिरते. बोंड्याच्या बाहेरील बाजूस छिद्र दिसतात. ह्यामुळे जास्त प्रमाणात पाने खराब होतात.
पिक निविष्टा प्रमाण
एच ए एनपीव्ही
600 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Boll rot of cotton
बोल रॉट
लक्षणे
तपकिरी व काळ्या रंगाचे ठिपके संपूर्ण हिरव्या बोललं वरती दिसतात. बहिरीला किंवा आतील बाजू कुजते. बोन्डे उघडण्याधीच गळून पडतात.
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
Red cotton bug in cotton crop
रेड कॉटन बग
लक्षणे
हे कीटक पानांमधील द्रव्य शोषतात, ह्यामुळे बोन्डे किंवा बियाणे वाढ होण्याआधीच उघडतात. प्रभावित झालेले बोन्डे उघडल्यावर त्यामध्ये कीटकांनी द्रव्य सोडलेले दिसते. कापसाचा दर्जा कमी होतो आणि बियाणे पेरणीसाठी किंवा तेल प्रक्रियेसाठी योग्य राहत नाहीत.
पिक निविष्टा प्रमाण
ऍसिफेट
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा

वेचणी

वेचणीचा कालावधी
वेचणीची वेळ
लागवडीनंतर 130 ते 180 दिवसांनी
एकूण वेचणीची संख्या
4 वेळा होते.
दोन वेचणीतील अंतर
15 दिवस

उत्पादन

उत्पादन
प्रत्येक वेचणीचे उत्पादन
3 क्विंटल प्रति एकर
संपूर्ण उत्पादन
10-12 क्विंटल प्रति एकर

काढणी पश्चात तंत्रज्ञान

 • कापसाच्या बोंडाची तोडणी केल्यानंतर लगेच ती सावलीत वाळवीत. नाहीतर कापसाच्या बोंडाचा रंग बदलामुळे त्याचा बाजार भाव कमी होतो.   
 • कापसाचे बोंड उन्हात वाळवू नये नाहीतर कापसाचा धागा कमकुवत होतो.  
 • जमिनीवर वाळूचा पातळ थर देऊन त्यावर कापूस ठेवावा. 

4 thoughts on “Cotton

 1. Pingback: Cotton - BharatAgri

 2. Pingback: Complete scientific information on cotton farming - BharatAgri

 3. Pingback: Cotton Farming: scientific technique for boosting yield - BharatAgri

 4. Pingback: कपास की खेती: कपास की उन्नत खेती के बारे में सारी जानकारी - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *