Coriander

कोथिंबीर

अपेक्षा

अपेक्षित काढणी

6000 जुड्या प्रति एकर

अपेक्षित कालावधी

पेरणीच्या 30-40 दिवसांनी

अपेक्षित खर्च (रुपये)

12,384

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

30,000

अनुकूल हवामान

हवामान
 • थंड आणि दमट हवामानात चांगले वाढते.
 • हे पीक हिम सहन करू शकत नाही.
तापमान
 • 20-30°C तापमान श्रेणीत कोथिंबीर चांगली येते.
 • जास्त तापमान अंकुरणाची टक्केवारी आणि शाखीय वाढ कमी करते.
पिकाची पाण्याची गरज
 • पाण्याची गरज- 75-100 मिमी पावसाइतकी .
 • अंकुरण झाल्यावर शेतात पाणी साठू देऊ नका.

अनुकूल मृदा

प्रकार
 • सिंचन व्यवस्था असेल तर या पिकाची भरपूर सेंद्रिय घटक असलेल्या  कोणत्याही प्रकारच्या मातीत लागवड करता येते.
 • पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या गाळाच्या किंवा लोम मातीत चांगली वाढते.
 • आम्लारीयुक्त, वालुकामय आणि हलकी माती कोथिंबीरीसाठी योग्य नाही.
सामू
 • आवश्यक श्रेणी- 6-8
 • जर सामू < 6.0 असेल तर चुनखडी घाला.
 • जर सामू > 8.0 असेल तर जिप्सम घाला.

लागवडीसाठी साहित्य

कोकण कस्तुरी
कालावधी
35-40 दिवस
खास वैशिष्ट्य
चांगला वास, रुंद पाने, 30-40 सेमी उंची
हंगाम
रब्बी
उत्पादन
36 क्विंटल प्रति एकर
अर्क ईशा
कालावधी
70 दिवस
खास वैशिष्ट्य
अनेकदा कापता येणाऱ्या प्रकारची, रुंद पाने, चांगला वास, चांगली टिकवण क्षमता (फ्रीजमध्ये 21 दिवस), क जीवनसत्वाने समृद्ध (167 मिलीग्राम / 100 ग्रॅम एफडब्ल्यू)
हंगाम
रब्बी
उत्पादन
12 क्विंटल प्रति एकर
बियाण्यांचे प्रमाण
सिंचित पीक
4 - 4.8 किग्रॅ/एकर
जिरायती पीक
8 – 10 किग्रॅ/एकर

बियाणे प्रक्रिया

 • व्यवस्थित अंकुरणासाठी पेरणीपूर्वी  बियाणे पाण्यात 12 तास भिजवा.
 • बियाण्याला याची प्रक्रिया करा- 

               कॉपर ऑक्सीक्लोराईड – 2 ग्रॅम   

               इमिडाक्लोप्रीड – 2 मिली

सूचना– एक किलो बियाण्यासाठी वरील प्रमाणात मिसळा. वरील सर्व गोष्टी एका भांड्यात  बियाण्यासह घाला आणि बियाण्याला या पावडरचा थर लागेपर्यंत सर्व मिसळा.

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
 1. नांगरणी पद्धत – मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 किंवा 2 वेळा नांगरा.
 2. खालील गोष्टी शेतात मिसळा आणि व्यवस्थित कुजण्यासाठी 10 दिवस मोकळी हवा लागू द्या –  

               शेणखत – 2 टन

              विघटन करणारे जीवाणू – 3 किग्रॅ

           3. वरील मिश्रण मातीवर पसरवा आणि संपूर्ण शेतावर रोटाव्हेटर फिरवा म्हणजे जमीन नांगरल्यासारखी मऊ होईल.

वाफे तयार करणे
 1. वाफे तयार करणे- ट्रॅक्टरच्या मदतीने सोयीच्या लांबीचे आणि उंचीचे वाफे तयार करा. नंतर बियाणे वाहून जाऊ नये म्हणून एका कोपऱ्यात छोटे बांध घाला.

पेरणी

 • बियाणे वाफ्यांवर एकसारखे फेकून द्या.
 • 8-15 दिवसात बियाणे उगवून येईल.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • एकूण गरज-  8:16:8 एन:पी:के किग्रॅ/एकर 
 • पेरणीच्या वेळी द्या- 

               युरीया- 9 किग्रॅ

               सिंगल सुपर फॉस्फेट – 98 किग्रॅ

               म्युरेट ऑफ पोटॅश- 13 किग्रॅ 

 • पेरणीनंतर 30 दिवस-

              युरीया- 9 किग्रॅ 

सिंचन

 • तुषार सिंचन- दररोज
 • आठवड्यातून एकदा (जमिनीच्या प्रकारानुसार)  पाटाने पाणी द्यावे.
 • पहिले सिंचन पेरणीनंतर लगेच
 • दुसरे सिंचन तिसऱ्या दिवशी

 

आंतरमशागत प्रक्रिया

 • विरळणी – पेरणीनंतर 20-25 दिवसांनी रोपांची विरळणी केली जाते आणि काढून टाकलेली रोपे पालेभाजी म्हणून वापरली जातात. 
 • खास पद्धती – सुमारे 4 इंच उंचीवर एक छाटणी केल्यास फांद्यांना चालना मिळेल

तण व्यवस्थापन

लागवडीनंतर 3 दिवसांनी
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ऑक्झीफ्लुरोफेन + क्विझालोफॉप इथाईल (500 मिली + 250 मिली/एकर)

संजीवके

 • अधिक चांगल्या वाढीसाठी आणि उंची वाढण्यासाठी अंकुरणानंतर लगेच जिब्रालिक आम्ल @ 0.5 मिली/1 लिटर पाण्यात घालून फवारा.

किड आणि रोग व्यवस्थापन

बियाणांमार्फत होणारे रोग
लक्षणे
बियाण्याची कमी उगवण किंवा बियाणे उगवून येत नाही
पिक निविष्टा प्रमाण
कार्बेन्डाझिम
120 ग्रॅम प्रति एकर
वापर
बीजप्रक्रिया
बुरशीजन्य रोग
लक्षणे
रोगग्रस्त पानांवर लहान गडद तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात त्यांचा कालांतराने आकार मोठा होतो, त्यामुळे पाने मरतात
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
100 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा
मर, मूळकूज
लक्षणे
पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. मुळांना नुकसान पोचवतात. झाडांची पाने वाळायला सुरुवात होते.
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
200 मिली प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा.
मावा
लक्षणे
झाडावर लहान काळे किडे येतात हे किडे पानातील रस शोषतात त्यामुळे रोप कमकुवत होते.
पिक निविष्टा प्रमाण
स्पिनोसॅड
100 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
पांढरी भुरी
लक्षणे
हा रोग झाल्यावर पानांवर पांढरा रंग दिसतो. हा रोग खूप लवकर पानांवर आणि देठांवर पसरतो.
पिक निविष्टा प्रमाण
सल्फर
100 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.

कापणी

कापणीचा कालावधी
पीक कालावधी
35-40 दिवस

उत्पादन

उत्पादन
काढलेले एकूण उत्पादन
21-25 क्विन्टल/एकर ( प्रती एकर 6000 जुड्या)

3 thoughts on “Coriander

 1. Pingback: Coriander – LeanAgri

 2. Pingback: Coriander – BharatAgri

 3. Drkalyani Reply

  Best Info:
  मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 किंवा 2 वेळा नांगरा
  बियाणांमार्फत होणारे रोग
  बुरशीजन्य रोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *