Brinjal

वांग

अपेक्षा

अपेक्षित काढणी

60 क्विंटल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

लागवडीनंतर 140-150  दिवस

अपेक्षित खर्च (रुपये)

39,166

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

60,000

अनुकूल हवामान

हवामान
  • वांगी हे उबदार हवामानातील पीक आहे आणि त्याला दीर्घकाळ उबदार हंगाम वाढीसाठी आवश्यक असतो. 
  • हे हिमाला अतिशय बळी पडते.
तापमान
  • दिवसाचे तापमान 35oC पेक्षा कमी असेल आणि रात्रीचे तापमान 16oC पेक्षा जास्त असेल तर ते पिकासाठी सर्वांत योग्य आहे.
  • 15oC पेक्षा कमी तापमान असेल तर पिकाची वाढ तसेच फळाची गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होतो.
  • 13-21oC दरम्यानचे तापमान वांग्यासाठी आदर्श आहे.
  • कमी आर्द्रता आणि जास्त तापमानामुळे खूप फूल गळ होऊ शकते आणि फळधारणा व्यवस्थित होत नाही.
पिकाची पाण्याची गरज
  • पाण्याची गरज- 600-1000 मिमी पावसाइतकी.
  • विशेषत: फुलोऱ्याच्या आणि फळधारणेच्या हंगामात खूप जास्त पाऊस या पिकाला सहन होत नाही.
  • जास्त पावसामुळे पाने गळतात, मरतात आणि रोप कुजते.

अनुकूल मृदा

प्रकार
  • पाणी धारण करण्याची क्षमता असलेली वालुकामय लोम माती आणि भारी चिकणमाती.
  • पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि सुपीक माती या पिकासाठी जास्त योग्य आहे.
सामू
  • आवश्यक श्रेणी- 6.5-7.5
  • जर सामू < 6.5 असेल तर चुनखडी घाला.
  • जर सामू > 7.5 असेल तर जिप्सम घाला.

लागवडीसाठी साहित्य

मांजरी (वांगे)
कालावधी
60-65 दिवस
खास वैशिष्ट्य
जांभळा रंग लांबट गोल फळे उशिरा हंगाम असलेले वाण
हंगाम
खरीप
उत्पादन
55-70 क्विंटल प्रति एकर
पुसा संकरीत-5
कालावधी
80-85 दिवस
खास वैशिष्ट्य
काटे नसलेले, निम्न-ताठ फांद्या. फळे लांब, चमकदार आकर्षक, गडद जांभळी, अंशत: ठिपके असलेला देठ, वजन सुमारे 100 ग्रॅम प्रत्येकी
हंगाम
खरीप
उत्पादन
100-110 क्विंटल प्रति एकर
पंत ऋतुराज
कालावधी
75-85 दिवस
खास वैशिष्ट्य
फळे जवळजवळ गोल असतात. आकर्षक जांभळा रंग, मऊ, कमी बिया असलेले आणि चांगला स्वाद असलेले जीवाणूजन्य मर रोगाला क्षेत्र प्रतिकारक्षमता असते.
हंगाम
खरीप
उत्पादन
130-140 क्विंटल प्रति एकर

रोपवाटिका तयार करणे

रोपवाटिका तयार करणे
  • पद्धत- 1

    • 1 एकर क्षेत्रफळात पुनर्लागवड करण्यासाठी, 0.1 एकर (4 गुंठा) रोपवाटिका आवश्यक आहे.
    • 7.2 मी लांबी X 1.2 मी रुंदी X 10 सेमी उंचीचे चार वाफे तयार करा.
    • ओळीत 5 सेमी अंतरावर बिया पेरा आणि मातीने झाकून टाका.
    • रोपवाटिकेतील रोपांना अंकुरण होईपर्यंत दिवसातून दोनदा  आणि अंकुरण झाल्यावर दिवसातून एकदा पाणी घाला.
    • पुनर्लागवडीपूर्वी दहा दिवस आधी वाफ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करा म्हणजे रोपे मजबूत होतील.
    • रोपांचे ओली मर रोगापासून संरक्षण होण्यासाठी रोगापासून बियांचे अंकुरण झाल्यावर 3 दिवसांनंतर रीडोमिल @ 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घालून बियाण्याच्या वाफ्याची आळवणी करा.
    • 19:19:19 @ 5 ग्रॅम + थायमेथोक्झाम @ 0.25 ग्रॅम 1 लिटर पाण्यात घालून पेरणीपूर्वी 25 दिवस फवारा.

    पद्धत – 2

    • प्रत्येक ट्रेमध्ये प्रती ट्रे @ 1.2 किग्रॅ कोकोपीट घालून प्रो ट्रे भरा. 
    • प्रो ट्रेमध्ये प्रत्येक खड्ड्यात @ 1 या प्रमाणात प्रक्रिया केलेले बी पेरा.
    • बी कोकोपीटने आच्छादित करा आणि ट्रे एकावर एक ठेवा आणि अंकुरण सुरू होईपर्यंत पॉलीथिन कागद घालून झाकून ठेवा (5 दिवस)
    • 6 दिवसांनंतर, अंकुरीत झालेल्या बिया असलेले प्रो ट्रे वेगवेगळे करून शेड नेटमध्ये गादी वाफ्यांवर ठेवा.
रोपवाटिका कालावधी
  • 30-35 दिवस
  • रोपांची उंची 15 सेमी झाली आणि त्यांना 2-3 खरी पाने आली की रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.
बियाण्यांचे प्रमाण
वाण
1 एकर जागेत पुनर्लागवड करण्यासाठी 160 ग्रॅम बियाणे
संकरीत
1 एकर जागेत पुनर्लागवड करण्यासाठी 80 ग्रॅम बियाणे

बियाणे प्रक्रिया

 बियाण्याला याची प्रक्रिया करा

           इमिडाक्लोप्रीड – 4 मिली

  • सूचना- एक किलो बियाण्यासाठी वरील प्रमाणात दोन लिटर पाण्यात मिसळा. बियाणे द्रावणात 10 मिनिटे बुडवा आणि नंतर सावलीत 15 मिनिटे वाळवा.

           कार्बेन्डॅझिम – 2 ग्रॅम

  • सूचना- प्रक्रिया केलेल्या बियाण्यावर पुन्हा 2 ग्रॅम कार्बेन्डॅझिम 1 किग्रॅ बियाण्यासाठी या प्रमाणात प्रक्रिया करावी

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)
  1. नांगरणी पद्धत – मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 किंवा 2 वेळा नांगरा.
  2. खालील गोष्टी शेतात मिसळा आणि व्यवस्थित कुजण्यासाठी 10 दिवस मोकळी हवा लागू द्या –  

               शेणखत – 2 टन

               विघटन करणारे जीवाणू – 3 किग्रॅ

             3. वरील मिश्रण मातीवर पसरवा आणि संपूर्ण शेतावर रोटाव्हेटर फिरवा म्हणजे जमीन नांगरल्यासारखी मऊ होईल.

वाफे तयार करणे
  1. वाफे तयार करणे- ट्रॅक्टरच्या मदतीने 2 फूट किंवा 3 फूट अंतरावर सरी आणि वरंबे तयार करा.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
2 फूट
दोन रोपातील अंतर
2 फूट
रोपांची संख्या
11,000
संकरीत
दोन ओळीतील अंतर
3 फूट
दोन रोपातील अंतर
2 फूट
रोपांची संख्या
7,333

मुळे बुडवणे प्रक्रिया

  • सपाट भांड्यात 20 लिटर पाणी घ्या.
  • 40 ग्रॅम कार्बेंडॅझिम + 40 मिली इमिडाक्लोप्रीड मिसळा. 
  • पुनर्लागवडीपूर्वी मुळे द्रावणात 5 मिनिटे बुडवा.
  • प्रो ट्रेतील रोपांसाठी – प्रो ट्रे 5 मिनिटे डब्यात बुडवा. 

पुनर्लागवड

  • वरंब्यावर 60 सेमी अंतरावर रोपांची पुनर्लागवड करा. 
  • हवेच्या पोकळ्या काढून टाकण्यासाठी मुळांच्या भोवती माती घट्ट दाबा.
  • तीव्र उन्हापासून संरक्षण होण्यासाठी रोपांची पुनर्लागवड संध्याकाळच्या वेळी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • एकूण गरज: 100:50:30 एन:पी:के किग्रॅ प्रती एकर. 
  • पेरणीच्या वेळी द्या-

               युरीया- 109 किग्रॅ

               सिंगल सुपर फॉस्फेट – 308 किग्रॅ

               म्युरेट ऑफ पोटॅश – 50 किग्रॅ

  • पुनर्लागवडीनंतर 30 दिवस – 

               युरिया- 54 किग्रॅ

  • पुनर्लागवडीनंतर 45 दिवस –   

               युरिया- 54 किग्रॅ

सिंचन

  • ठिबक – एक आड एक दिवस
  • पाटपाणी- आठवड्यातून एकदा (पावसानुसार)

               उन्हाळी हंगाम – 3-4 दिवस अंतर

               वांग्याच्या प्रत्येक काढणीनंतर एक सिंचन दिले पाहिजे.

आंतरमशागत प्रक्रिया

  1. मातीची भर देणे- पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांनी (फुलोऱ्याच्या वेळी) मुळे मातीने झाका. 

तण व्यवस्थापन

3-5 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
अट्राझिन (100 ग्रॅम प्रती एकर) किंवा पेंडीमेथालिन (300 ग्रॅम प्रती एकर)
45 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
2,4-D (400 ग्रॅम प्रती एकर)

संजीवके

  • फुलोरा आणि उत्पादन सुधारण्यासाठी पुनर्लागवडीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोन्टानॉल @ 1.25 मिली + बोरॅक्स 0.3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात घालून फवारा. 
  • फूलगळ कमी करण्यासाठी आणि फळधारणा वाढवण्यासाठी नेप्थालिन ऍसिटिक आम्ल 2 मिली प्रती 1 लिटर पाण्यात घालून पुनर्लागवडीनंतर 45 व्या आणि 60 व्या दिवशी फवारा.

किड आणि रोग व्यवस्थापन

मातीद्वारे प्रसारित होणारे रोग
लक्षणे
पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. मुळांना नुकसान पोचवतात. झाडांची पाने वाळायला सुरुवात होते.
पिक निविष्टा प्रमाण
ट्रायकोडर्मा व्हिरीडी
40 ग्रॅम प्रति एकर
वापर
लावणीआधी मुळे मिश्रणामध्ये बुडवून घ्या.
फळ आणि देठ पोखरणारी अळी
लक्षणे
फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे) प्रौढ कीटकांना आकर्षित करतात.
पिक निविष्टा प्रमाण
फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे)
5 ट्रॅप्स प्रति एकर
वापर
शेतामध्ये लावा.
फळ आणि देठ पोखरणारी अळी
लक्षणे
देठावर आणि फळांवर अळीने केलेले छिद्र दिसतात आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात.
पिक निविष्टा प्रमाण
इमामेक्टिन बेन्झोएट
100 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
पानांवरील ठिपके
लक्षणे
पानांवर अनियमित आकाराचे डाग दिसतात जास्त प्रभावित झालेली पाने गळून पडतात ज्यामुळे फळांचे उत्पन्न कमी होते.
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
200 ग्रॅम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
बोकड्या आणि पर्णगुच्छ
लक्षणे
पानांची वाढ खुंटते फुलांचा भाग देखील झुडुपासारखा दिसू लागतो हा रोग मायकोप्लास्मा मुळे होतो आणि रोगाचा प्रसार तुडतुड्यांमुळे होतो.
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
मर रोग
लक्षणे
नवीन रोपं कमकुवत होतात, सहजपणे ओढली जातात आणि मुळे डॅमेज होतात.
पिक निविष्टा प्रमाण
कॉपर ऑक्सिक्लोराईड
250 ग्रॅम प्रति एकर
वापर
मुळांजवळ आळवणी करा.

कापणी

कापणीचा कालावधी
कापणीचा कालावधी
70 ते 130 दिवस पुनर्लागवडीनंतर
एकूण काढण्यांची संख्या
8 ते 10
काढणीतील अंतर
5 दिवस

उत्पादन

उत्पादन
प्रत्येक काढणीचे प्रमाण
6 क्विंटल प्रति एकर
काढलेले एकूण उत्पादन
60 क्विंटल प्रति एकर

2 thoughts on “Brinjal

  1. Pingback: Brinjal_English – LeanAgri

  2. Pingback: Brinjal – BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *