भारतॲग्री सुपर सोबत आता करा सुपर स्मार्ट शेती

Smart agriculture service - BharatAgri SUPER - MH

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

खरीप हंगाम सुरू झाला आहे. यावर्षीही चांगले पीक घेण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. पावसाळ्यामुळे शेतकर्‍यांना कधी आनंद होतो तर कधी दुःखाला सामोरे जावे लागते. जर योग्य वेळी पाऊस पडला नाही तर शेतकरी त्रस्त होतात आणि जास्त पाऊस पडला तरी पिकाचे नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बदलत्या हवामानामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. या नुकसानापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी भारतॲग्री अ‍ॅप रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत भारतॲग्री अ‍ॅपने आपल्या स्मार्ट शेतकऱ्यांसाठी सुपर सर्व्हिस आणली आहे. भारतॲग्री सुपर सेवेद्वारे पुढील तीन दिवसाच्या हवामानाची माहिती शेतकऱ्यांना मिळते. याद्वारे शेतकरी भविष्यात होणारे नुकसान टाळू शकतो. यासह त्याच्या पिकाच्या अनुषंगाने हवामानावर आधारित गतिमान सल्लाही शेतकऱ्यांना भारतॲग्रीकडून दिला जातो. 

भारतॲग्री सुपर सेवेमध्ये शेतकरी सॅटेलाईटच्या म्हणजेच उपग्रहाच्या मदतीने घरबसल्या आपल्या पिकांची स्थिती पाहू शकतो. त्याला स्मार्ट फोनवरच पिकाच्या बाह्य वृद्धी निर्देशांकाबद्दल माहिती मिळते. उदाहरणार्थ, जर आपल्या मोबाईलवर दाखविण्यात आलेल्या सॅटेलाईट छायाचित्रात हिरवा रंग दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या पिकाची वाढ चांगली असून आपले पीकही चांगले आहे. जेव्हा आपल्या शेतात पिवळा रंग दाखवला जातो तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपल्या पिकाची बाह्य वाढ मध्यम आहे आणि आपल्याला पिकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या शेताच्या सॅटेलाईट चित्रात लाल रंग दाखविला गेला तर याचा अर्थ असा होतो की आपल्या पिकाच्या बाह्य वाढीचा निर्देशांक खूपच कमी असून आपल्याला त्वरित पाहणी करून कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. 

जर आपल्या शेतात लाल रंग दिसत असेल तर आपण भारतॲग्री सुपर सेवेतील इतर सेवा जसे की कॉल, चॅट किंवा व्हिडिओ कॉलद्वारे भारतॲग्री कृषिडॉक्टरांशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कृषिडॉक्टर व्हिडीओ कॉलद्वारे थेट आपल्या शेताची पाहणीच करतात आणि योग्य त्या उपाययोजनाही देतात. 

यासह, संपूर्ण हंगामाचे पीक सूचना कॅलेंडर शेतकऱ्यांना मिळणार आहे. याद्वारे पिकासंदर्भातील प्रत्येक माहिती आणि कोणत्या पिकासाठी, कोणती खते आणि कीटकनाशके चांगली असतील याची संपूर्ण माहिती देखील उपलब्ध करून दिली जाते. 

बदलत्या काळाबरोबर महागाईही वाढली आहे. अशा परिस्थितीत बियाणे, खते आणि औषधे खरेदीसाठी शेतकऱ्यांना बराच खर्च करावा लागतो. पण, भारतॲग्री सुपर सेवा आता शेतकऱ्यांचा हा खर्चही कमी करत आहे. भारतॲग्री सुपर सर्व्हिस घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला बियाणे, खते आणि औषधे खरेदीवर विशेष सवलत मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे ही सूट मिळण्यासाठी शेतकर्‍यांना कोठेही जावे लागणार नाही तर घरबसल्या ऑर्डर करून या साऱ्या गोष्टी घरपोच देण्याची सोयही भारतॲग्रीने केली आहे. 

आता शेतकऱ्यांचा दुप्पट फायदा पक्का आहे. कारण आता भारतॲग्री सुपर सेवा घेणाऱ्या शेतकऱ्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधीही दिली जाणार आहे. यामध्ये शेतकरी बक्षिसे जिंकू शकतात आणि स्मार्ट शेतकरी होऊन अधिक फायदा करून घेऊ शकतात. 

आता शेतकर्‍यांचे आयुष्य बदलणार आहे. शेतकरी भारतअ‍ॅग्री सुपर सेवेद्वारे स्वतःची प्रगती करीत आहे. ही सेवा अगदी सहज उपलब्ध आहे यासाठी तुम्हाला फक्त भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल आणि भारतअ‍ॅग्रीची सुपर सेवा घ्यावी लागेल. ज्याद्वारे आपल्या सर्व चिंता मिटतील. म्हणूनच तर म्हणलं जात आहे की भारतअ‍ॅग्री सुपर सेवा ही शेतकर्‍यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही… 

भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि स्मार्ट शेतकरी व्हा -https://bharatagriapp.onelink.me/ydvW/5bacd119

या खरीप हंगामात भारतअ‍ॅग्री सुपर घ्या आणि एक सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवाद या बटणावर क्लिक करून थेट भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी संपर्क साधा!

2 thoughts on “भारतॲग्री सुपर सोबत आता करा सुपर स्मार्ट शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *