चॅट आणि कॉल देणार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Agriculture technology - Chat and Call Feature

भारतॲग्री ॲप देणार सर्वोत्तम उपाय

🙏 नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो
🌱 खरीप हंगाम सुरू झाला आहे काही शेतकरी अजूनही खरीप हंगामाची तयारी करत आहेत. खरीप हंगामात 🌱 सोयाबीन व कापसाची लागवड सर्वाधिक होते. परंतु मागील वर्षी सोयाबीनवर पिवळ्या मोज़ेक रोगामुळे 👨‍🌾 शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. परंतु असे असले तरी काही शेतकऱ्यांनी यावर्षी देखील लागवड करण्याचा 🤔 विचार केला आहे. अशा 👨‍🌾 शेतकऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की, यावर्षी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण 🌟 भारतॲग्री ॲप तुम्हाला देणार आहे सर्वोत्तम मार्गदर्शन!

आज आपण अशाच एका शेतकऱ्याला भेटणार आहोत ज्याने मागील हंगामात सोयाबीन पिकामध्ये मोठे नुकसान सोसले होते… पाहुयात आता तो कोणतं पीक घ्यायचा विचार करतोय?
सचिन आणि गोपाळ या दोन्ही शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन शेतीचा विचार केला आहे. एकीकडे सचिन खरिफ हंगामाची तयारी करत आहे तर दुसरीकडे गोपाळ मात्र चिंतेत आहे… अशावेळी या दोघांची भेट होते आणि त्यांच्यात काय चर्चा होते हे पाहुयात…

सचिन: अरे भाऊ काय झालं? एवढा चिंतेत का दिसत आहेस?
गोपाळ: काय सांगू तुला, यावर्षीच्या खरीप हंगामाचं लैच टेंशन आलं रे…

सचिन: कसलं टेंशन?
गोपाळ: अरे मागच्या वर्षी सोयाबीन पिकात त्यो यलो मोझेक रोग आला… आणि माझं लैच नुकसान झालं गड्या… आता यावर्षी काय होतंय कुणास ठाऊक?

सचिन: अरे भाऊ टेंशन का घेतो आपलं भारतॲग्री ॲप आहे ना!
गोपाळ: भारतॲग्री ॲप?

सचिन: होय, आपला सच्चा साथी भारतॲग्री ॲप! याच्या मदतीने आज अनेक शेतकरी तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्ट शेती करत आहेत. मी सुद्धा आता एक स्मार्ट शेतकरी झालो आहे. भारतॲग्री ॲपच्या मदतीने माझी कमाई दुप्पट झाली आहे आणि पीक ही चांगलं येत आहे.
गोपाळ: हे भारतॲग्री ॲप वापरायचं कसं रे भाऊ?

सचिन: अरे खूपच सोप्प आहे… सगळयात पहिल्यांदा तर भारतॲग्री ॲप डाउनलोड कर. त्यानंतर भारतॲग्रीशी तुझं शेत जोड, शेत जोडल्यानंतर तुला काही गोष्टी मोफत मिळतील. पण भारतॲग्रीची सुपर सेवा घेण्यासाठी तुला एक माफक शुल्क भरावे लागेल. या सेवेमुळे तू घरबसल्या तुझ्या शेतावर लक्ष ठेऊ शकशील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गरज पडेल तेंव्हा तू चॅट आणि कॉलच्या माध्यमातून कृषिडॉक्टरांशी थेट संवाद साधू शकतोस. कृषिडॉक्टर तुला शेतीशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील.
गोपाळ: अरे वाह! हे तर फारच चांगले आहे. स्मार्ट फोनवरच आपल्याला पूर्ण माहिती मिळत आहे याहून अधिक काय हवं! अरे भाऊ, भारतॲग्री ॲपमध्ये आणखी कशाबद्दल माहिती दिली जाते.

सचिन: भारतॲग्री ॲपमध्ये पेरणीपासून ते कापणीपर्यंतची संपूर्ण माहिती दिली जाते. त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी कुठले खत चांगले आहे याचीही माहिती दिली जाते.
गोपाळ: भारतॲग्री ॲप तर फारच छान आहे. पण एक अडचण आहे ?

सचिन: कसली अडचण?
गोपाळ: आपण भारतॲग्रीच्या कृषिडॉक्टरांशी चॅट आणि कॉलद्वारे बोलू. परंतु, आपले शेत न पाहता ते आपल्याला सल्ला कसे देतील?

सचिन: अरे दादा, यासाठी देखील एक सोपा मार्ग आहे.
गोपाळ: कुठला?

सचिन: व्हिडिओ कॉल सेवा. व्हिडीओ कॉलच्या सहाय्याने शेतकरी भारतॲग्रीच्या कृषिडॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. यासाठी, प्रथम शेतकऱ्याला भारतॲग्री ॲपच्या संवादमध्ये व्हिडिओ कॉल हवा असल्याचे सांगावे लागेल. यानंतर भारतॲग्रीचे कृषिडॉक्टर शेतकऱ्यांचे व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करतात. तसेच, कृषिडॉक्टरांना शेतात कुठले कीटक किंवा रोग आढळून आले तर ते त्यावर उपाय देखील सांगतात.
गोपाळ: हे तर खरोखरच शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार आहे. स्मार्ट फोनवरच शेतकर्‍यांना त्यांच्या शेताची संपूर्ण माहिती मिळत आहे हे खरंच भारी आहे. चल मी आत्ताच भारतॲग्री ॲप डाउनलोड करुन कृषी सेवेचा लाभ घेतो.

सचिन: भाऊ तू योग्य निर्णय घेत आहेस. भारतॲग्री ॲपच्या सहाय्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. विशेष म्हणजे, भारतॲग्री ॲप समजायला फार सोपे आहे. आणि कमी खर्चात शेतकऱ्यांचा जास्त फायदा करून देणारे ॲप आहे.

👨‍🌾 शेतकरी बंधूंनो, मग वाट कशाची पाहत आहात?
भारतॲग्री अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि स्मार्ट शेतकरी व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *