
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
🛡️ ह्यूमिक ऍसिड हे खत नसून खूप कमी प्रमाणातील सूक्ष्म अन्नद्रव्य व मुख्य अन्नद्रव्य असून ते जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाते. तसेच पिकांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी ह्यूमिक ऍसिड महत्वाचे असते.
🛡️ सध्या पीक उत्पादन वाढीच्या स्पर्धेमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे, तसेच शेतीच्या खर्चात वाढ झालेली आहे. त्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात तयार करता येईल आणि जमिनीचे आरोग्य सुधारतील अशा विविध पर्यायांपैकी एक आहे ते ह्यूमिक ऍसिड. हे घरच्या घरी कसे करायचे ते पाहुयात –
👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
➡️ आवश्यक साधने –
⭕ ५-७ किलो गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, ४० लिटर पाणी २०० ग्राम बेसन पीठ, १ किलो दही , १ किलो गूळ , ४० लिटर क्षमतेचा ड्रम
➡️ तयार करण्याची पद्धती –
1️⃣ २० लिटर पाण्यात शेणाच्या गोवऱ्या टाका, त्यामध्ये १ किलो दही, १ किलो गुळ, २०० ग्राम बेसन पीठ मिसळून घ्या.
2️⃣ राहिलेले पाणी त्यामध्ये मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या.
3️⃣ हा ड्रम सावलीमध्ये १०-१५ दिवसापर्यंत ठेवावा. दिवसातून एकदा ते मिश्रण गोलाकार ढवळा.
4️⃣ १०-१५ दिवसांनी ते मिश्रण कापडाच्या साहाय्याने गाळून तुम्ही आळवणीसाठी वापरू शकता.
➡️ वापरण्याच्या पद्धती-
⭕ १-२ लिटर प्रति एकर या प्रमाणात ड्रीप वाटे किंवा पाटाच्या पाण्यावाटे पिकाला द्यावे.
🌟 अधिक माहितीसाठी भारतअॅग्री अॅप डाउनलोड करा आणि संवाद बटणावर क्लिक करून भारतअॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻