
नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼
🤝🏼 भारतअॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻
🌟 भारतअॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअॅग्री अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअॅग्री अॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱
✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअॅग्री अॅपला भेट देऊ शकता.
👷♂ शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांमुळे फार नुकसान होते. 😎 वन्य प्राणी शेतातील पिकांची नासधूस करतात. तुम्ही देखील 😎 वन्य प्राण्यांपासून त्रासले आहात. तर घाबरू नका. आम्ही घेऊन आलो आहो तुमच्यासाठी एक भन्नाड जुगाड. 😅या जुगाड ने तुम्ही सोप्या पद्धतीने वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करू शकतात. 👍
- गावठी डुकरांची विष्ठा पसरविणे-यामध्ये स्थानिक रानडुकरांपासून गोळा केलेल्या विष्ठेचे द्रावण तयार करून मातीवर शिंपडले जाते. ज्याचे अंतर पिकांपासून एक फूट एवढे असते. त्यामुळे रानडुकरांमध्ये आपण इतर डुकरांच्या सीमेत प्रवेश केला आहे, याचा भास होतो. त्यामुळे ते प्रादेशिकवाद टाळण्यासाठी तेथून काढता पाय घेतात.
- मानवी केसांचा श्वास रोधक म्हणून वापर- स्थानिक केस कापण्याच्या दुकानातून मानवी केस गोळा करून आपण रानडुकरांचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकतो. ही पद्धत अत्यंत कमी खर्चाची आहे. शेतात हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरविल्याने अन्नाच्या शोधात येणाऱ्या रानडुकरांच्या श्वसन नलिकेत हे केस अडकतात आणि ते सैरावैरा धावायला लागतात. अनेक शेतकरी हा प्रयोग करत आहेत.
- रंगीत साड्या पिकांभोवती बांधणे-या पद्धतीत विविध रंगांच्या साड्या पिकांच्या भोवती रोवल्या जातात. त्यामुळे रानडुकरांना शेतात कुणीतरी मानव असल्याचा भास होतो. त्यामुळे ते शेतात प्रवेश करू शकत नाही.
- वाळलेल्या शेणाच्या गौऱ्या जाळणे-स्थानिक डुकरांपासून किंवा त्यांच्या विष्ठेपासून तयार केलेल्या गौऱ्या मातीच्या भांड्यात जाळून व त्याचा धूर करून सुद्धा आपण रानडुकरांना पळवू शकतो. या पद्धतीत धूर हळूहळू पसरून रानडुकरांना पळविले जाते. या पद्धतीचा वापर मुख्यतः सायंकाळी केला जातो.
- आवाज निर्मिती- फटाक्यांचा वापर, स्थानिक ड्रम, रिकामे कॅन पत्राचे भांडे, जाळ करणे आणि जोरजोरात ओरडणे या पद्धतींचा वापर करतात.
- श्वानांचा वापर-काही वेळेस शेतकरी पिकांचे वन्य प्राणी आणि रानडुकरांपासून रक्षण करण्यासाठी पारंपरिक स्थानिक कुत्रे पाळतात. ज्यांच्या मदतीने या रानडुकरांना पळविले जाते व पिकांचे नुकसान टाळले जाते.
👆 तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरदेखील करा. 👍
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻