रडविणारा कांदा हसवू लागला तर…

कांदा म्हणलं की अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं… काहींना कांदा कापायचा विचार करून तर काहींना कांदा आपल्या खिशाला कापणार हा विचार करून. दरवर्षी सुरु असलेला हा खेळ सध्याही मोठा रंगात आला आहे. भाववाढीमुळे शेतकरी आनंदात असतील असं अनेकांना वाटत असलं तरी काहींच्या मते याचा खरा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यालाच झाला आहे.

कांद्याच्या नीचांकी भावाने शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा गाडाच मोडून गेला होता. यंदाही अतिवृष्टी आणि उशिरापर्यंत राहिलेल्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांचे कांदा पीक सडविले. त्यामुळे कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आणि याचमुळे झालेल्या भाववाढीमुळे कांद्याने अनेकांना रडविले.

कांद्याच्या पीक उत्पादनासाठी बी, मशागत, शेणखत, रासायनिक खते, कीटकनाशके, वीजबिल, लागवड, काढणी, मजुरी यासाठी येणारा खर्च कमी करून उत्पादनात वाढ करणे शक्य आहे असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर?

खरं वाटत नाही ना? 

पण भारतॲग्रीच्या साहायाने हा खर्च कमी करून तुम्ही उत्पादनात वाढ करू शकता. हो हे खरं आहे…

सर्वसाधारण शेतकरी एका एकरामागे रब्बी हंगामात १० टन इतके उत्पादन घेतो पण भारतॲग्रीच्या सल्याने शेती केली तर तुम्हाला रब्बी हंगामात सुमारे ११ ते १२ टन इतके उप्तादन मिळू शकते. तुम्हाला ऐकताना ही गोष्ट पटणार नाही पण तुम्ही आमच्या मॉडेल फार्मला भेट देऊन आणि आमच्या कृषिडॉक्टरांशी चर्चा करून याची खात्री करून घेऊ शकता.

शेतकऱ्यांनी भारतॲग्रीची सेवा वापरल्यास त्यांना रडविणारा कांदा त्यांना खळखळून हसवेल, त्यांच्या कांद्याची गुणवत्ता आणि मिळणारा भाव बघून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील याची आम्हाला खात्री आहे.

भारतॲग्रीची सेवा आत्तापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी वापरली असून सर्वांनाच याचा फायदा झाला आहे. सेवा वापरलेल्यांची शेते बहरली आहेत आणि डौलात उभी आहेत. पीके उत्तम येत असून उत्पादनातही घसघशीत वाढ झाली आहे. तेंव्हा तुम्हीदेखील लवकरात लवकर भारतॲग्रीच्या या परिवारात सामील व्हा आणि प्रगतीच्या या नव्या वाटेवर आमच्यासोबत चला.

🌱कुशलतेने उगवा, अधिक उगवा!🌱

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *