बियाणे खरेदीतील फसवणूकीपासून सावधान !! हे 10 नियम लक्षात ठेवा.

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼

🤝🏼 भारतअ‍ॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨‍🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻

🌟 भारतअ‍ॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱

✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨‍🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपला भेट देऊ शकता.

🔰 येत्या खरीप हंगाम 2021 मध्ये पेरणी पूर्वी बीज खरेदी करताना तुम्हाला खालील बाबी लक्षात घेणे खूप आवश्यक आहे. कारण बियाणे निवडच ठरेल तुमच्या यशस्वी खरीप हंगामाची पहिली पायरी:

💡 सर्व पिकांचे वाण निवडतांना ते वाण आपल्‍या वातावरणात येणारे, आपल्‍या जमिनीच्‍या मगदुरानुसार, किड व रोगास कमी बळी पडणारे व सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे जास्‍तीत जास्‍त उत्‍पन्‍न देणारे असावे.
⭕ प्रत्‍येक बियाण्‍याच्‍या पिशवीवर टॅग आहे की नाही हे बघून घ्‍यावे. टॅगवरील लॉट नंबर छापलेला आहे की अस्‍पष्‍ट आहे ते बघूनच ती पिशवी खरेदीसाठी निवडावी.
💡 बियाणे खरेदी करतांना सर्वात महत्‍वाची बाब म्हणजे परवानाधारक विक्रेत्‍याकडूनच बियाणे खरेदी करावे.
⭕ त्‍यानंतर बियाण्‍याची पिशवी ही सिलबंद असली पाहीजे, म्‍हणजे त्‍यामधून बियाणे बाहेर आलेले नसावे. कारण सिलबंद वेष्टनातील लेबल असलेले बियाणे हे कायद्याच्या मापदंडानुसार तयार करण्यात येते, त्यामुळे बियाण्याची गुणवत्ता उत्तम असते.
💡 बियाण्‍याचे पिशवीवर लेबल असले पाहीजे. त्या लेबलवरची छपाई स्‍पष्‍ट असावी व त्यावर बीज प्रमाणीकरणाचे न्यूनतम मानके मापदंडानुसार आहेत की नाही हे तपासून घ्यावे.
⭕ मापदंडानुसार उत्तम उगवणशक्‍ती असलेले, चांगल्‍या प्रतिचे सुधारीत कीड व रोगापासून मुक्‍त असलेले बियाणे निवडावे.
💡 बियाणे खरेदी करतांना वैध मुदतीची खात्री करून घ्‍यावी व वैध मुदतीच्‍या आतील बियाणेच खरेदी करावे. पिशवीवर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्‍त दराने बियाणे खरेदी करू नये.
⭕ बियाणे खरेदी करतांना विक्रेत्याकडून संपूर्ण विवरणासह बिल अवश्य घ्यावे.
💡 संपूर्ण तपशील जसे की पिक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, वजन, बियाणे ज्‍या कंपनीचे आहे त्‍या कंपनीचे नाव, बियाण्याची किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्‍याचे नाव व सही इत्‍यादी नमूद असलेली रोखी अथवा उधारीची पावती घ्‍यावी.
⭕ बियाणे खरेदीची पावती, वेष्‍टन (बॅग) पिशवी व त्‍यावरील लेबल (टॅग) इत्‍यादी जपून ठेवावे.

🔰 या खरीप हंगामात भारतअ‍ॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍

तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *