
🔰 तुर हे डाळवर्गीय पीकापैकी एक प्रमुख पिक आहे. 🌱 पिकावर पडणाऱ्या किडी व रोग यांच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे उत्पादन कमी होते.
तूर पिकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी अशा महत्वाच्या किडींचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे किडी व रोगांचे वेळेवर आणि एकात्मिक व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.
👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
तूर पिकावर प्रमुख कीड-
शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer) –
अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने, कळ्या व शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगांना नुकसान करून आपली आवस्था पूर्ण करते. या अळीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यात पूर्ण होतो.
शेंगमाशी (Pod Fly) –
सुरुवातीस या माशीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. परंतु वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडून माशी बाहेर पडल्यावरच नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. अळी शेंगेत प्रवेश करून अर्धवट दाणे खाते आणि हे दाणे खाण्यास व बियाणे म्हणून वापरण्यास उपयुक्त ठरत नाही.
पिसारी पतंग –
अळीच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरवडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते.
पाने व फुले जाळी करणारी अळी –
या किडीचा प्राद्रुर्भाव पीक फुलोऱ्यात आणि जास्त आर्द्रता असतांना आढळून येतो. अळी पाने, फुले व कळी यांचा एकत्रित गुच्छ तयार करून त्यात लपून बसते. पीक फुलोऱ्यात आल्यानंतर अळी शेंगांमधील दाण्यांवर प्रादुर्भाव करते.
तूर पिकावर प्रमुख रोग –
मर रोग –
रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडून ती जमिनीकडे झुकतात. सुरवातीस काही फांद्या आणि नंतर संपूर्ण झाडच वाळून जाते.
खोडाचा व मुळाचा आतील भाग काळा पडतो आणि मर झालेल्या खोडावर तांबूस रंगाचे पट्टे दिसतात.
तूर पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन –
- मर रोगाच्या प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा उदा. फुले राजेश्वरी, विपुला.
- मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ लिटर किंवा ३ किलो प्रति एकर किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कार्बेन्डाझिम ५० डब्लू पी (धानुस्टीन) ४०० ग्राम किंवा कार्बेन्डाझिम १२%+ मॅंकोझेब ६३% डब्लू पी ग्राम या प्रमाणात आळवणी करावी.
- पीक कळी आणि फुलोरा अवस्थेत असताना कीड रोगाच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे निरीक्षण फायदेशीर ठरते. त्यासाठी आठवड्यातून एकदा शेतामधील ७-१० ठिकाणी निरीक्षण करावे.
- कळी आणि शेंगामधील अळीच्या प्रादुर्भावाच्या निरीक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा एकरी ५ या प्रमाणात लावावेत. त्यामध्ये २४ तासामध्ये ८-१० पाकळ्या भेटल्यास कीटकनाशकांची गरज पडते.
- शेतामध्ये पक्षांना आकर्षित करण्यासाठी शेतात १०-१२ ठिकाणी पक्षीथांबे उभारावे.
- किडींच्या प्रादुर्भावासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी (धानुलक्स- धानुका) २५ मिली किंवा इंडोक्साकार्ब् १४. ५% (किंगडोक्सा-घरडा केमिकल)- १० मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५%एसजी (इएम-१- धानुका) ८ ग्राम किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी (कव्हर-धानुका) ६ मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १०% एससी+ लेम्बडा सायहॅलोथ्रीन ५% जेडी (सिजेंटा -अँप्लिगो) ८ मिली प्रति १५ ली पंप या प्रमाणात कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
🌱 शेतीविषयक अधिक माहितीसाठी तुम्ही भारतॲग्री कृषिडॉक्टरांशी 💬 चॅटद्वारे संपर्क करू शकता. ✅
🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअॅग्री अॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻