तूर पिकातील फुलोरा व्यवस्थापन

तूर पिकातील फुलोरा व्यवस्थापन


🚩 महाराष्ट्रात तूर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते परंतु राज्याचे प्रति एकर उत्पादन खूप कमी आहे. पिकाची लागवड होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. 🌱 काही ठिकाणी पिकामध्ये फुलोरा येण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी शेंगा लागायला सुरुवात झाली आहे.

☁️ सध्याच्या वातावरणामुळे फुलांची गळ, फुलांमधील/शेंगांमधील आळी, आकस्मित मर या सारख्या समस्यांना शेतकरी बांधवांना तोंड द्यावे लागत हे आहे. त्यामुळे फुलोरा काळातील व्यवस्थापन महत्वाची भूमिका बजावते.

*वरील तिन्ही समस्येची लक्षणे पुढील प्रमाणे-

अ) फुलांची गळ- फुलांची गळ होण्याची कारणे वेगवेगळी आहेत त्यामध्ये सततच्या पावसामुळे पिकाची मुळे ब्लॉक झाल्यास पिकाला अन्नद्रव्ये कमी प्रमाणात मिळतात, जर फुलांमधील अळीचा प्रादुर्भाव असेन तरी सुद्धा फुलांची गळ होते.

ब) फुलांमधील/शेंगांमधील आळी- अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने, कळ्या व शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगांना नुकसान करून आपली आवस्था पूर्ण करते. या अळीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यात पूर्ण होतो.

क) आकस्मित मर- रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडून ती जमिनीकडे झुकतात. सुरवातीस काही फांद्या आणि नंतर संपूर्ण झाडच वाळून जाते.खोडाचा व मुळाचा आतील भाग काळा पडतो आणि मर झालेल्या खोडावर तांबूस रंगाचे पट्टे दिसतात.


👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

🌸फुलांची गळ होण्याची कारणे वेगवेगळी आहेत त्यामध्ये सततच्या पावसामुळे पिकाची मुळे ब्लॉक झाल्यास पिकाला अन्नद्रव्ये कमी प्रमाणात मिळतात, जर फुलांमधील अळीचा प्रादुर्भाव असेन तरी सुद्धा फुलांची गळ होते.
🔸 मुळांचे ब्लॉकेज काढण्यासाठी ह्यूमिक ऍसिड ५०० ग्राम + सिलिकॉन २०० मिली प्रति
एकर २०० ली पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करावी.
🔹 फुलामध्ये/शेंगांमध्ये अळी दिसून येत असेन तर त्यासाठी क्विनॉलफॉस २५ इसी (धानुलक्स
-धानुका)- २८ मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ एसजी (धानुका – इएम १) ८ ग्राम किंवा
स्पिनोसॅड ४५ एस सी (ट्रेसर- डाऊ) ३ मिली किंवा फ्लूबेन्डायमाईड ३९.३५ एस सी (फेम) ८
मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५ एस सी (कोराजन/ धानुका कव्हर) ३ मिली किंवा
इंडोक्साकार्ब् १५.८ एस सी (इंडोक्सा- जीपीसी) ७ मिली किंवा ल्युफेन्यूरॉन ५.४ ईसी
(सिंजेंटा- सिग्ना) १२ मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३ + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४.६ झेड सी
(सिंजेंटा अँप्लिगो) प्रति १५ ली पंप या प्रमाणात फवारणी करा.
🔸 जर वरीलपैकी दोन्ही कारणे नसतील तर, ०.५२.३४ – ४५ ग्राम + कॅल्सीबोर -१५ ग्राम प्रति
१५ ली पंप या प्रमाणात फवारणी करावी.

⭕आकस्मित मर नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १२%+ मॅंकोझेब ६३% डब्लूपी (धानुका- सिक्सर) ४०० ग्राम किंवा थायोफिनेट मिथाईल ७०% डब्लूपी (बायोस्टॅडट- रोको) ४०० ग्राम प्रति एकर या सारख्या बुरशीनाशकांची आळवणी केल्यास फायदेशीर ठरते.

▶️ फुलांची संख्या वाढवण्यासाठी बूम फ्लावर १८ मिली प्रति १५ ली पंप या प्रमाणात फवारणी करा.

🔰 फवारणी करताना १५ मिली स्टिकर प्रति पंप प्रमाणात वापरावे.

✅ फवारणी/ आळवणी करताना भारतॲग्री कृषिडॉक्टरांना संपर्क करावा.

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *