डाळिंब लागवड : पानगळ व हस्त बहार व्यवस्थापन

डाळिंब लागवड : पानगळ व हस्त बहार व्यवस्थापन

⭕ हस्त बहारामध्ये किडींचे व रोगांचे प्रमाण खूप कमी असते, तसेच संरक्षित पाण्याची उपलब्धता असल्याने हस्त बहार धरणे फायदेशीर ठरते.

👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

⭕ हस्त बहार कालावधी- ऑगस्ट ते फेब्रुवारी

⭕ आवश्यक कामे-

⭕ बागेची साफसफाई- मागील बहाराची खराब फळे, फांद्या किंवा झाडाचे अवशेष गोळा करून बाग स्वच्छ करून घ्यावी.
⭕ बागेची छाटणी- मागील बहाराच्या काढणीनंतर छाटणी केली नसेल तर हलकी छाटणी करून बोर्डो मिश्रणाची (१%) फवारणी करावी.
विश्रांती काळातील फवारण्या- विश्रांती काळात १२.६१.००, मायक्रोन्यूट्रिएंट आणि सिलिकॉन यांची फवारण्या केल्या जातात.
⭕ ताण- हलक्या जमिनीसाठी ३०-४५ दिवस, मध्यम ते भारी जमिनीसाठी ४०-५० दिवस पाण्याचा ताण दिला जातो. यामध्ये ०.५२.३४ – ५ ग्राम + मायक्रोन्यूट्रिएंट १.२५ ग्राम, ०.०. ५० – ५ ग्राम + मायक्रोन्यूट्रिएंट १. २५ ग्राम प्रति ली पाणी यांच्या एका आठवड्याच्या अंतराने ४ फवारण्या कराव्यात.
⭕ ह्या काळात आवश्यकतेप्रमाणे योग्य त्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी.
पानगळ आणि इथेरल फवारणी- नैसर्गिकपणे ५० टक्के जुन्या पानांची पानगळ होणे बहाराच्या दृष्टीने आवश्यक असते. ४०% नैसर्गिक पानगळ झाल्यास २ मिली, ६०% पानगळ झाल्यास १ मिली प्रमाणात इथेरलची प्रति ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आणि ८०% पेक्षा जास्त पानगळ करू नये.
⭕ इथेरल ची फवारणी करण्याआधी १ दिवस थोड्या वेळ पाणी देणे आवश्यक असते.
पानगळ करण्यासाठी इथेरल व्यतिरिक्त इतर कोणत्याही रसायनाची फवारणी करू नये.

🍀 ताण सोडणे –
ताण सोडताना इथेरलची फवारणी झाल्यानंतर १० दिवसांनी पहिले पाणी दिले जाते. त्याआधी बागेत झाडांजवळची माती चाळून घ्यावी व झाडांना शिफारशीनुसार खतांची मात्रा द्यावी. सुरुवातीला पाणी देताना सुरुवातीचे २ पाणी ४५ मिनिटे द्यावे व त्यानंतर पाट पाणी द्यावे.

🍀 ताण सोडतानाचा पहिला बेसल डोस-
डाळिंबाच्या पूर्ण वाढ झालेल्या झाडांना ३२५ ग्राम २५० ग्राम २५० ग्रॅम नत्र – स्फुरद – पालाश प्रति झाड पहिले पाणी देते वेळी द्यावे.

🌟 अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *