या पद्धतीने द्या टोमॅटोच्या झाडांना आधार

टोमॅटो लागवड पद्धत 

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो 🙏🏼

🤝🏼 भारतअ‍ॅग्री वापरणारे हजारो शेतकरी आज कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन 👨‍🌾 स्मार्ट शेती करत आहेत. तुम्हालाही स्मार्ट शेतकरी होता यावे म्हणून आम्ही 👉 रोज शेतीविषयक नवनवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटायला येत आहोत. ✅ ही माहिती तुमच्या शेतीसाठी उपयुक्त आहे, तेंव्हा संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि स्मार्ट शेतकरी व्हा! 👍🏻

🌟 भारतअ‍ॅग्री ही शेतकऱ्यांना स्मार्ट बनवणारी एक चळवळ आहे. 👍 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या गरजेनुसार 🌱 माती परीक्षण, पाणी परीक्षण तसेच 🛰️ सॅटेलाईट मॅपिंग सेवा इ. विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज ही येथे मिळतो. 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपचा वापर करणाऱ्या अनेक स्मार्ट शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच शिवाय पिकांची आणि जमिनीची गुणवत्ता देखील चांगली राहते. 🌱

✅ तुमच्या शेतीसाठी आवश्यक अशा काही स्मार्ट टिप्स घेऊन आम्ही 👨‍🌾 आता तुम्हाला रोज भेटणार आहोत. त्यासाठी तुम्ही रोज न चुकता येथे भेट देत राहा. 🔽 तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 👉 भारतअ‍ॅग्री अ‍ॅपला भेट देऊ शकता.

टोमॅटो पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात त्यामुळे त्यांना आधाराची आवश्यकता असते.
🔻आधार दिल्यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते.
⭕ फळे भरपूर लागतात.
🔻फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्याशी संपर्क येत नाही.
⭕ त्यामुळे फळे सडण्याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते.
त्याचप्रमाणे खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे इ. कामे सुलभतेने करता येतात.

तुम्हाला ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

🍅 टोमॅटोच्या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो.

🔰 बांबू पद्धत-
प्रत्येक झाडाजवळ दिड ते दोन मीटर लांबीची व अडीच सेमी जाडीची काठी रोवून झाडाच्या वाढीप्रमाणे काठीला बांधत जावे.

🔰 मंडप पद्धत-
💡 या प्रकारात तारा आणि बांबू किंवा काठयांचा वापर करून ताटी केली जाते आणि या ताटीच्या आधारे झाडे वाढविली जातात.
⭕ सरीच्या बाजूने प्रत्येक १० फूट अंतरावर पहारीने दर घेऊन त्यात दिड ते दोन मीटर उंचीच्या आणि अडीच सेमी जाडीच्या काठया घट्ट बसवाव्यात.
💡 सरीच्या दोन्ही टोकांना जाड लाकडी डांब बांधाच्या दिशेने तिरपे रोवावेत.
⭕ प्रत्येक डांबाच्या समोर जमिनित जाड खुंटी रोवून डांब खुंटीशी तारेच्या साहाय्याने ओढून बांधावेत.
💡 त्यानंतर १६ गेज ची तार जमिनीपासून ४५ सेमी वर एका टोकाकडून बांधत जाऊन प्रत्येक काठीला वेढा आणि ताण देऊन दुस-या टोकापर्यंत ओढून घ्यावे
⭕ अशा प्रकारे दुसरी ९० से.मी. वर व तिसरी १२० से.मी. अंतरावर बांधावी.
💡 या तारेंना रोपांच्या वाढणाऱ्या फांद्या सुतळी किंवा नॉयलॉनच्या दोरीने बांधाव्यात.
⭕ टोमॅटोची बांधणी करताना झाडाच्या प्रत्येक फांदीला स्वतंत्रपणे सूर्यप्रकाश मिळेल हे पाहावे.
💡 टोमॅटोचे खोड मजबूत करण्यासाठी झाडाला वळण देणे आवश्यक असते.

🔰 या खरीप हंगामात भारतअ‍ॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍

🔻 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री अ‍ॅप डाऊनलोड ⏬ करा आणि भारतअ‍ॅग्रीशी आपले शेत जोडून 🤝🏼 आजच स्मार्ट शेतकरी बना! 👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *