टमाटर की खेती

टोमॅटो

अपेक्षा

अपेक्षित काढणी

100 क्विंट्टल प्रति एकर

अपेक्षित कालावधी

 140-145 दिवसानंतर 

अपेक्षित खर्च (रुपये)

91,897

अपेक्षित उत्पन्न (रुपये)

1,20,000

अनुकूल हवामान

हवामान

 • रोपांच्या फळे व फुले येण्याच्या अवस्थेत जास्‍त पाऊस व ढगाळ वातावरण असल्‍यास फूलांची व फळांची गळ जास्‍त होते.
 • अति थंडी आणि जास्त आर्द्रता असल्यास टोमॅटोचे झाड तग धरू शकत नाही. 
 • वातावरणात जास्त आर्द्रता असल्यास फळे कुजतात. 
 • झाडाला फळे येण्याच्या कालावधीत तीव्र सूर्यप्रकाश गडद लाल रंगाचे फळ विकसित करण्यास मदत करतो.

तापमान

 • तापमान 10°C  खाली असल्यास टोमॅटोच्या झाडाची वाढ खुंटते. 
 • तापमान 33°C किंवा जास्त असल्यास फळधारणेवर अनिष्‍ट परिणाम होतो. 
 • पीक वाढीच्या सुरवातीच्या काळात तापमान 38°C किंवा जास्त असल्यास झाडाची वाढ खुंटते.
 • 21 ते 24°C या तापमानास झाडाची वाढ चांगली होते.

पिकाची पाण्याची गरज

 • टोमॅटोचे पीक हे शक्यतो सिंचन क्षेत्रात घेतले जाते. 
 • चांगल्या गुणवत्तेचे टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी, ठिबक सिंचनासह प्लास्टिक मल्चिंगची शिफारस केली जाते. 
 • पीक वाढीच्या काळात (30 दिवसांपर्यंत) मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
 • पाण्याची गरज – टोमॅटोच्या पिकाला 600-1500 मिमी पावसाएवढ्या पाण्याची गरज असते.

अनुकूल मृदा

प्रकार

 • गाळवट माती  व पाणी धरून ठेवणारी माती  निवडावी.

सामू

 • आवश्यक सामू  6.0-7.5
 • जर सामू 6.0 पेक्षा कमी असल्यास तर मातीत चुनखडी टाकावी. 
 • जर सामू 7.5 पेक्षा जास्त  असल्यास तर मातीत जिप्सम टाकावे.

रोपवाटिका तयार करणे

रोपवाटिका तयार करणे

 • पद्धत- 1
 • पुनर्लागवडीसाठी 1 एकर क्षेत्रासाठी 0.08 एकर (3 गुंठा) ची रोपवाटिका तयार करावी. 
 • रोपवाटिका तयार करण्यासाठी 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 15 सेमी. उंच या आकारमानाचे सहा गादीवाफे तयार करावेत. 
 • बियाणाची पेरणी 2-3 सेमी खोल मातीत सरळ रेषेत 10 सेमी. च्या अंतराने करावी व ते मातीने झाकावे.
 • रोपांना रोपवाटिकेमध्ये उगवण होईपर्यंत दिवसभरात दोन वेळा पाणी द्यावे व उगवून आल्यानंतर एक वेळा द्यावे. 
 • रोपांना मजबुती देण्यासाठी पुनर्लागवड करण्याच्या 4-5 दिवस आधी रोपांना पाणी देण्याचे प्रमाण कमी करावे व रोप काढणीच्या 1 दिवस आधी थोड्या प्रमाणात पाणी द्यावे.
 • पद्धत- 2
 • प्रत्येक ट्रे मध्ये 1.2 किलो याप्रमाणे कोकोपीट भरावे.  
 •  ट्रेच्या प्रत्येक कप्प्यात 1 याप्रमाणे बीजप्रक्रिया केलेल्या बियाणाची पेरणी करावी. 
 •  पेरणीनंतर बियाणे कोकोपीट ने झाकावे व ट्रे एकावर एक ठेवून बियाणांची उगवण होईपर्यंत पॉलीथिन पेपर ने झाकावे. (5 दिवस)
 • 6 दिवसांनंतर, अंकुरित झालेल्या बियाणांसहित ट्रे गादीवाफ्यावर स्वतंत्ररित्या शेड नेट मध्ये ठेवावे. 

रोपवाटिका कालावधी

 • कालावधी – 25-30 दिवस
 • रोपाचे देठ मजबूत झाल्यानंतर व पाने गडद हिरवी झाल्यावर रोपांची पुनर्लागवड करावी.
बियाण्यांचे प्रमाण
सुधारित वाण
1 एकर क्षेत्र पूर्नलागवडीसाठी 380-400 ग्रॅम बियाणे
संकरीत
1 एकर क्षेत्र पूर्नलागवडीसाठी 140-150 ग्रॅम बियाणे

रोपवाटिकेसाठी बियाणे प्रक्रिया

 • इमिडाक्लोप्रिड – 4 मिली
 • सूचना – वरील घटक प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे 2 लिटर पाण्यात मिसळुन तयार झालेल्या द्रावणात बियाणे 10 मिनिटासाठी बुडवावेत व नंतर 15 मिनिटासाठी सावलीत वाळवावेत. 
 •  मॅन्कोझेब – 2 ग्रॅम
 • सूचना – बीजप्रक्रिया केलेले बियाणे परत 2 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे बियाणांना चोळावे.

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

जमिनीची मशागत (मुख्य क्षेत्र)

 • नांगरणीची पध्दत – मातीच्या प्रकारानुसार जमीन 1 ते 2 वेळा नांगरून घ्यावी.
 • खालील खते मातीत मिसळून त्याचे योग्य प्रकारे विघटन होण्यासाठी जमीन 1० दिवस खुली ठेवावी.
  • शेणखत – 2 टन
  • कम्पोस्टिंग बॅक्टरीया – 3 किलो 
 • वरील मिश्रण मातीवर पसरवून त्यावर रोटाव्हेटर फिरवावे व माती भुसभुशीत करून घ्यावी.

वाफे तयार करणे

 • गादी वाफा तयार करण्याची पध्दत ट्रॅक्टरच्या सहाय्याने 120 मीटर रुंदीचा  गादी वाफा तयार करावा व दोन गादी वाफ्यांमध्ये 90 सें.मी. चे अंतर ठेवावे.

अंतर आणि रोपांची संख्या

वाण
दोन ओळीतील अंतर
2.9 फूट
दोन रोपातील अंतर
0.9 फूट
रोपांची संख्या
16,858
संकरीत
दोन ओळीतील अंतर
2.4 फूट
दोन रोपातील अंतर
0.9 फूट
रोपांची संख्या
20,370

मुळे बुडवणे प्रक्रिया

 • एका सपाट भांड्यात 20 लिटर पाणी घ्यावे. 
 • त्यामध्ये कार्बनडॅझीम (40 ग्रॅम ) व इमिडाक्लोप्रिड (40 मिली) व प्लांट ग्रोथ प्रमोटिंग रइज़ोबैक्टर (100 ग्राम) एकत्रित करावे.
 • रोपांची मुळे पुर्नलागवडी पूर्वी ह्या द्रावणात बुडवावीत.
 • जर रोपे प्रोट्रे मध्ये असतील तर रोपांसहित प्रोट्रे भांड्यात 5 मिनिटासाठी बुडवावा.

पुनर्लागवड

 • पुर्नलागवड करताना ३० सेमी.च्या अंतरावर गादी वाफे तयार करून रोपांची लागवड करावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • वाणांसाठी एकूण गरज- 80:40:40 एन:पी:के किलो प्रति एकर।
 • पुनर्लागवड करताना –
 • यूरिया- 87 किलो
 • सिंगल सुपर फॉस्फेट- 246 किलो
 • म्युरेट ऑफ पोटॅश- 67 किलो  
 • पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांनी-
 • यूरिया- 44 किलो
 • पुनर्लागवडीनंतर 50 दिवसांनी-
 •  यूरिया- 44 किलो
 • संकरित वाणांसाठी एकूण गरज- 120:60:60 एन:पी:के किलो प्रति एकर
 • पुनर्लागवड करताना –
 • यूरिया- 130 किलो
 • सिंगल सुपर फॉस्फेट- 375 किलो
 • म्युरेट ऑफ पोटॅश- 100 किलो  
 • पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांनी
 • यूरिया- 65 किलो
 • पुनर्लागवडीनंतर 50 दिवसांनी-
 • यूरिया- 65 किलो

सिंचन

 •  8 ते 10  दिवसांच्या अंतराने पाटाने पाणी द्यावे (हिवाळ्यात) व 6-8 दिवसांच्या अंतराने उन्हाळ्यात पाणी द्यावे.
 • ठिबक सिंचन- एक दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • तुषार सिंचनाने रोपाला पाणी देणे टाळावे. त्यामुळे बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता असते आणि संभाव्यत: जीवाणूमुळे फळसड यांसारख्या मोठया  समस्या होऊ शकतात. 
 • रोपाला फुले येण्याच्या कालावधीत गरजे पेक्षा जास्त पाणी दिल्यास फुल गळ जास्त होते व फळ धारणा कमी होते. 
 • पाण्याचा ताण व जमिनीत दीर्घकाळ कोरडेपणा टाळावा. त्यामुळे फळसड होऊ शकते.

आंतरमशागत प्रक्रिया

तण व्यवस्थापन

सूचना – पानांवर तणनाशक योग्यरीत्या पसरण्यासाठी त्यात स्टिकर टाकावे.

3 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
पेंडीमिथॅलीन किंवा फ्लूक्लोरॅलींन
तणनाशकाचे प्रमाण
400 मिली प्रति एकर 400 मिली प्रति एकर
30 दिवस पुनर्लागवडीनंतर
पद्धत
फवारणी
तणनाशकाचे नाव
ओक्सीफ्लूरोफेन
तणनाशकाचे प्रमाण
100 ग्रॅम प्रति एकर

संजीवके

 • फुलांची लागण वाढवण्यासाठी ट्रायकॉन्टेनॉल 1.25 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित करून पुनर्लागवडीनंतर 20, 40, 60 व्या दिवशी फवारणी करावी. 
 • फुलांची गळ थांबण्यासाठी व फळ लागण वाढवण्यासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड 10 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित करून पुर्नलागवडीनंतर 60 आणि 90 व्या दिवशी फवारणी करावी.

किड आणि रोग व्यवस्थापन

टमाटर की खेती के रोग एवं उपचार
लवकर येणार करपा
लक्षणे
"पानांवर लहान ठिपके येतात. ठिपके तपकिरी रंगाचे व वर्तुळ आकाराचे असतात."
पिक निविष्टा प्रमाण
मॅंकोझेब
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
टमाटर के पौधों में रोग - फळे पोखरणारी अळी
फळे पोखरणारी अळी
लक्षणे
फळे पोखरणारी अळी - अंड्यातून बाहेर आल्यावर अळी विकसित होणाऱ्या फळात भोक पाडते आणि त्यामधून विकसित होणारे बीज खाते. प्रभावित फळांची नंतर बुरशी आणि रोगांच्या सूक्ष्म जंतूंमुळे कूज होते. नुकसानीचे लक्षण म्हणजे आक्रमक वास, प्रवेश छिद्रांमधून येणारे अळीचे उत्सर्जन व छिद्रांच्या आसपास जमलेला कचरा.
पिक निविष्टा प्रमाण
इंडोक्साकार्ब + नोवालूरॉन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
टमाटर की खेती के रोग - मोझॅक व्हायरस
मोझॅक व्हायरस
लक्षणे
पाने वरील बाजूस गुंडाळतात.
पिक निविष्टा प्रमाण
डायमेथोएट
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
टमाटर का पांढरी भुरी रोग
पांढरी भुरी
लक्षणे
पावडरी मिल्डयू हा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग झाल्यावर पानांवर पांढरा रंग दिसतो. हा रोग खूप लवकर पानांवर आणि देठांवर पसरतो.
पिक निविष्टा प्रमाण
सल्फर
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
टमाटर के रोग एवं उपचार - रसशोषक किडी
रसशोषक किडी
लक्षणे
पाने पिवळी पडतात व दुमडतात.
पिक निविष्टा प्रमाण
असिटामॅप्रिड
200 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
टमाटर की खेती के रोग - मर रोग
मर रोग
लक्षणे
झाडे कमकुवत होतात आणि वाळतात.
पिक निविष्टा प्रमाण
मेटॅलिक्सिल
250 ग्राम प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
टमाटर के पौधों में रोग - उशिरा येणारा करपा
उशिरा येणारा करपा
लक्षणे
लेट ब्लाईट हा रोग डाउनी मिल्डिवच्या बूरशीमुळे होतो - फायटोथ्रोरा इन्फस्टन्स, पानाच्या ज्या भागावर पाण्याचे दव आहेत तो भाग तपकिरी काळा होतो व पान मरते. हवामान बर्याचदा थंड, ओले हवामानात होतो आणि हवामान वाढल्यास ते वेगाने पसरू शकते. झाडे गंभीर प्रकरणात मरतात आणि फळ गंभीरपणे प्रभावित होऊ शकतात. विशेष संक्रमणांमध्ये झाड कोरडे होते आणि वनस्पती मरू शकते.
पिक निविष्टा प्रमाण
क्लोरोथॅलोनील
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
टमाटर की बीमारी - पाने खाणारी अळी
पाने खाणारी अळी
लक्षणे
अळी पानांच्या मध्ये आढळून येते. पूर्ण विकसित अळी हिरव्या रंगाचे असतात. संक्रमणांचा पत्ता त्या अळीच्या उपस्थितिपासून लागतो जे पानांवरती छोटे तपकिरी रंगाचे डाग असतात.अळीचे आकार वेगवेगळे असतात जे लार्वाच्या अवस्थेवर अवलंबून असतात. गंभीर संक्रमणाच्या वेळ पूर्ण पान तपकिरी होते आणि सुकून जाते."
पिक निविष्टा प्रमाण
लेम्बडा- सायहॅलोथ्रीन
200 मिली प्रति एकर
वापर
पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.

काढणी

काढणीचा कालावधी
काढणीचा कालावधी
पुनर्लागवडीनंतर 70 - 110 दिवसांनी
तोडणीतील अंतर
टोमॅटो ची तोडणी 8 -10 वेळा होते.
दोन तोडणीतील अंतर
3 दिवस

उत्पादन

उत्पादन
प्रत्येक तोड्याचे उत्पादन
10 क्विंटल प्रति एकर
संपूर्ण उत्पादन
100 क्विंटल प्रति एकर

1 thought on “टमाटर की खेती

 1. Pingback: Tomato - BharatAgri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *